Skip to main content

Posts

Showing posts from November, 2020

महाराष्ट्र राज्यातून वाहणाऱ्या सर्वात लांब 7 नद्या

   रसिकहो नमस्कार आज आपण महाराष्ट्र राज्यातून वाहणाऱ्या सर्वात लांब 7 नद्या पाहणार आहोत   7 तापी नदी  208 महाराष्ट्रातुन वाहणाऱ्या सर्वात लांब नद्यांच्या यादीमध्ये ७ व्या क्रमांकाची नदी आहे तापी नदी  तापी  खानदेश । उत्तर महाराष्ट्रातून वाहणारी ही एक महत्त्वाची नदी आहे . तापी नदीचा उगम मध्यप्रदेश राज्यातील  बैतुल जिल्ह्यात सातपुडा पर्वत रांगेतील मुल्ताई डोंगरावर होतो  भारतातील पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहणारी हि एक महत्वाची नदी आहे तापी नदीची एकूण लांबी ७२४ किलोमीटर आहे, त्या पैकी २०८ किलोमीटर ही नदी महाराष्ट्रातून वाहते.   तापी ज्या भागातून वाहते तो खचदरीचा भाग आहे . या नदीने खोल दरी निर्माण केली आहे . ही पश्चिमवाहिनी नदी असून अमरावती , जळगांव , धुळे , नंदुरबार जिल्हयातून वाहत जाऊन गुजरातमध्ये प्रवेश करते नंतर ती सुरत या शहराजवळ अरबी सागराला जाऊन मिळते . तापी नदी उगमानंतर नैऋत्येस वाहत जाऊन अमरावती जिल्ह्याच्या उत्तर सिमेवरुन सुमारे ४८ किमी पर्यंत वाहते . पुढे ती मध्यप्रदेशात प्रवेश करते तेथुन बुहाणपुर जवळून वाहत जाऊन जळगांव जिल्ह्यातील रावेरच्या पूर्वेकडे महाराष्ट्रात प्रवेश करते . तापीच

भारतातील सर्वात ज्यास्त वीजनिर्मिती करणारे 10 जलविद्युत प्रकल्प

  नमस्कार मित्रांनो आज आपण भारतातील सर्वात ज्यास्त वीजनिर्मिती करणारे 10 जलविद्युत प्रकल्प आणि त्यासाठी बांधलेली धरणे पाहणार आहोत  जगामध्ये भारताचा जलविद्युत निर्मिती करणाऱ्या देशाच्या यादी मध्ये  सातवा क्रमांक येतो  भारतात तब्बल ४७०५७ मेगावॉट इतकी वीजनिर्मिती जलविद्युत प्रकल्पांद्वारे केली जाते  10 नागार्जुन सागर धरण जलविद्युत प्रकल्प भारतातील सर्वात ज्यास्त वीजनिर्मिती करणाऱ्या जलविद्युत प्रकल्पांच्या यादीमध्ये  १० व्या क्रमांकाचा प्रकल्प आहे नागार्जुन सागर जलविद्युत प्रकल्प हा प्रकल्प तेलंगणा आणि आंध्रप्रदेश ह्या दोन राज्यांचा सीमेवर हैद्राबाद शहरापासून १५२ किलोमीटर अंतरावर आहे  हे धरण बांधण्याची संकल्पना इंग्रजांच्या काळात १९०३ मध्ये केली होती नागार्जुन सागर धरणाच्या बांधकामाचे भूमिपूजन भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी हस्ते १९५५ मध्ये करण्यात आहे  ह्या धरणाचे बांधकाम १९६६ मध्ये पूर्ण करण्यात आले  नागार्जुन सागर धरणाचे उदघाटन तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हस्ते झाले  नागार्जुन सागर धरण कृष्णा नदीवर बांधण्यात आलेले आहे  याधरणाची उंची 124 मीटर  म्हणजे 40