Skip to main content

भारतातील सर्वात ज्यास्त वीजनिर्मिती करणारे 10 जलविद्युत प्रकल्प

 नमस्कार मित्रांनो आज आपण भारतातील सर्वात ज्यास्त वीजनिर्मिती करणारे 10 जलविद्युत प्रकल्प आणि त्यासाठी बांधलेली धरणे पाहणार आहोत 

जगामध्ये भारताचा जलविद्युत निर्मिती करणाऱ्या देशाच्या यादी मध्ये  सातवा क्रमांक येतो 

भारतात तब्बल ४७०५७ मेगावॉट इतकी वीजनिर्मिती जलविद्युत प्रकल्पांद्वारे केली जाते 



10 नागार्जुन सागर धरण जलविद्युत प्रकल्प

भारतातील सर्वात ज्यास्त वीजनिर्मिती करणाऱ्या जलविद्युत प्रकल्पांच्या यादीमध्ये  १० व्या क्रमांकाचा प्रकल्प आहे नागार्जुन सागर जलविद्युत प्रकल्प

हा प्रकल्प तेलंगणा आणि आंध्रप्रदेश ह्या दोन राज्यांचा सीमेवर हैद्राबाद शहरापासून १५२ किलोमीटर अंतरावर आहे 

हे धरण बांधण्याची संकल्पना इंग्रजांच्या काळात १९०३ मध्ये केली होती

नागार्जुन सागर धरणाच्या बांधकामाचे भूमिपूजन भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी हस्ते १९५५ मध्ये करण्यात आहे 

ह्या धरणाचे बांधकाम १९६६ मध्ये पूर्ण करण्यात आले 

नागार्जुन सागर धरणाचे उदघाटन तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हस्ते झाले 

नागार्जुन सागर धरण कृष्णा नदीवर बांधण्यात आलेले आहे 

याधरणाची उंची 124 मीटर  म्हणजे 407 फूट आहे 

या धरणाची लांबी 1550 मीटर  म्हणजे 5085 फूट आहे 

या धरणाची पाणी साठवण्याची क्षमता ४०७ टीएम सी आहे 

याधरणावर ११० मेगावॉट चा १ आणि १००.८ मेगावॉट चे ७ टर्बाईन बसवलेले आहेत त्यावरून एकूण ८१६ मेगावॉट इतकी वीजनिर्मिती केली जाते त्यामुळे हा प्रकल्प भारतातील सर्वात मोठा १० व्या क्रमांकाचा  जलविद्युत प्रकल्प आहे 




 9.पंडोह धरण जलविद्युत प्रकल्प

भारतातील सर्वात ज्यास्त वीजनिर्मिती करणाऱ्या जलविद्युत प्रकल्पांच्या यादीमध्ये  9 व्या क्रमांकाचा प्रकल्प आहे पंडोह धरण जलविद्युत प्रकल्प

हे धरण हिमाचल राज्यात मंडी जिल्ह्यात आहे 

पंडोह धरण बीस किंवा व्यास ह्या नदीवर आहे 

ह्या धरणाचे बांधकाम 1977 मध्ये पूर्ण करण्यात आले 


याधरणाची उंची 76 मीटर  म्हणजे 249 फूट आहे 

या धरणाची लांबी 255 मीटर  म्हणजे 837 फूट आहे 

या धरणाची पाणी साठवण्याची क्षमता 1.45 टीएम सी आहे 

याधरणावर 165 मेगावॉट चे 6 टर्बाईन बसवलेले आहेत त्यावरून एकूण 990 मेगावॉट इतकी वीजनिर्मिती केली जाते त्यामुळे हा प्रकल्प भारतातील सर्वात मोठा 9 व्या क्रमांकाचा  जलविद्युत प्रकल्प आहे 




8. इंदिरा सागर  धरण जलविद्युत प्रकल्प

भारतातील सर्वात ज्यास्त वीजनिर्मिती करणाऱ्या जलविद्युत प्रकल्पांच्या यादीमध्ये  8 व्या क्रमांकाचा प्रकल्प आहे 

इंदिरा सागर  धरण

हे धरण मध्यप्रदेश राज्यात खंडवा जिल्ह्यात आहे 


इंदिरा सागर  धरण नर्मदा  ह्या नदीवर बांधण्यात आलेले आहे

ह्या धरणाचे बांधकाम 1984 ते 2005 मध्ये पूर्ण करण्यात आले 


याधरणाची उंची 92 मीटर  म्हणजे 302 फूट आहे 

या धरणाची लांबी 653 मीटर  म्हणजे 2142 फूट आहे 

या धरणाची पाणी साठवण्याची क्षमता 430.84 टीएम सी आहे 

इंदिरा सागर याधरणावर 125 मेगावॉट चे 8 टर्बाईन बसवलेले आहेत त्यावरून एकूण 1000 मेगावॉट इतकी वीजनिर्मिती केली जाते त्यामुळे हा प्रकल्प भारतातील सर्वात मोठा 8 व्या क्रमांकाचा  जलविद्युत प्रकल्प आहे 





7.  शरावती धरण जलविद्युत प्रकल्प

भारतातील सर्वात ज्यास्त वीजनिर्मिती करणाऱ्या जलविद्युत प्रकल्पांच्या यादीमध्ये  7 व्या क्रमांकाचा प्रकल्प आहे 

शरावती धरण जलविद्युत प्रकल्प

शिवमोगा जिल्हा,

हा प्रकल्प कर्नाटक राज्यात शिवमोगा जिल्ह्यात आहे 


शरावती प्रकल्प शरावती  ह्या नदीवर बांधण्यात आलेले आहे

हा प्रकल्प लिंगनामाकी धरणापासुन पुढे एक कृत्रिम जलाशय बनवला आहेत त्याचे नाव तलकालले जलाशय आहे 

ह्या जलाशयातून हा प्रकल्प बनवला आहे १० पाईप द्वारे ह्या जलाशयातून खालील बाजूला पाणी सोडण्यात येते त्या द्वारे वीजनिर्मिती केली जाते 

हा प्रकल्प जोग धबधब्या पासून साधारण १० किलोमीटर अंतरावर आहे 


लिंगनामाकी धरण ह्या धरणाचे बांधकाम 1964 मध्ये पूर्ण करण्यात आले 


याधरणाची उंची 193 मीटर  म्हणजे 633. फूट आहे 

या धरणाची लांबी 2400 मीटर  म्हणजे 7874 फूट आहे 

या धरणाची पाणी साठवण्याची क्षमता 151.75 टीएम सी आहे 

शरावती याधरणावर 103.5 मेगावॉट चे 10 टर्बाईन बसवलेले आहेत त्यावरून एकूण 1035 मेगावॉट इतकी वीजनिर्मिती केली जाते त्यामुळे हा प्रकल्प भारतातील सर्वात मोठा 7 व्या क्रमांकाचा  जलविद्युत प्रकल्प आहे 




6. भाकरा धरण जलविद्युत प्रकल्प

भारतातील सर्वात ज्यास्त वीजनिर्मिती करणाऱ्या जलविद्युत प्रकल्पांच्या यादीमध्ये  6 व्या क्रमांकाचा प्रकल्प आहे 

भाकरा धरण जलविद्युत प्रकल्प

हे धरण पंजाब आणि हिमाचल प्रदेश ह्या दोन राज्यांच्या सीमेवर आहे  

भाकरा नांगल धरण सतलज  ह्या नदीवर बांधण्यात आलेले आहे

ह्या धरणाचे बांधकाम 1948 ते 1963 मध्ये पूर्ण करण्यात आले 


याधरणाची उंची 226 मीटर  म्हणजे 741 फूट आहे 

या धरणाची लांबी 520 मीटर  म्हणजे 1700 फूट आहे 

या धरणाची पाणी साठवण्याची क्षमता 339.76 टीएम सी आहे 

भाकरा याधरणावर 108 मेगावॉट चे 5 टर्बाईन आणि 157 चे 5 टर्बाईन बसवलेले आहेत त्यावरून एकूण 1325 मेगावॉट इतकी वीजनिर्मिती केली जाते त्यामुळे हा प्रकल्प भारतातील सर्वात मोठा 6 व्या क्रमांकाचा  जलविद्युत प्रकल्प आहे 





5 सरदार सरोवर धरण जलविद्युत प्रकल्प

भारतातील सर्वात ज्यास्त वीजनिर्मिती करणाऱ्या जलविद्युत प्रकल्पांच्या यादीमध्ये  5 व्या क्रमांकाचा प्रकल्प आहे 

सरदार सरोवर धरण जलविद्युत प्रकल्प


हे धरण गुजरात राज्यात नर्मदा जिल्ह्यात आहे 

सरदार सरोवर धरण नर्मदा  ह्या नदीवर बांधण्यात आलेले आहे

ह्या धरणाचे बांधकाम 1987 ते 2017 मध्ये पूर्ण करण्यात आले 


सरदार सरोवर याधरणाची उंची 163 मीटर  म्हणजे 535 फूट आहे 

या धरणाची लांबी 1210 मीटर  म्हणजे 3970 फूट आहे 

या धरणाची पाणी साठवण्याची क्षमता 335.41 टीएम सी आहे 

सरदार सरोवर याधरणावर 200 मेगावॉट चे 6 टर्बाईन आणि 50 चे 5 टर्बाईन बसवलेले आहेत त्यावरून एकूण 1450 मेगावॉट इतकी वीजनिर्मिती केली जाते त्यामुळे हा प्रकल्प भारतातील सर्वात मोठा 5 व्या क्रमांकाचा  जलविद्युत प्रकल्प आहे 



4 नाथपा झाकरी धरण जलविद्युत प्रकल्प

भारतातील सर्वात ज्यास्त वीजनिर्मिती करणाऱ्या जलविद्युत प्रकल्पांच्या यादीमध्ये  4 थ्या  क्रमांकाचा प्रकल्प आहे 

नाथपा झाकरी धरण जलविद्युत प्रकल्प


हे धरण हिमाचल प्रदेश राज्यात आहे  

नाथपा झाकरी धरण सतलज  ह्या नदीवर बांधण्यात आलेले आहे

ह्या धरणाचे बांधकाम 1993 ते 2004 मध्ये पूर्ण करण्यात आले 


याधरणाची उंची 67.5 मीटर  म्हणजे 221 फूट आहे 

या धरणाची लांबी 185 मीटर  म्हणजे607 फूट आहे 

नाथपा झाकरी या धरणाची पाणी साठवण्याची क्षमता 121.13 टीएम सी आहे 


नाथपा झाकरी  याधरणावर 250 मेगावॉट चे 6 टर्बाईन बसवलेले आहेत त्यावरून एकूण 1500 मेगावॉट इतकी वीजनिर्मिती केली जाते त्यामुळे हा प्रकल्प भारतातील सर्वात मोठा 4 थ्या क्रमांकाचा  जलविद्युत प्रकल्प आहे 





3 श्रीशैलम धरण जलविद्युत प्रकल्प

भारतातील सर्वात ज्यास्त वीजनिर्मिती करणाऱ्या जलविद्युत प्रकल्पांच्या यादीमध्ये  3 ऱ्या   क्रमांकाचा प्रकल्प आहे 

श्रीशैलम धरण जलविद्युत प्रकल्प


हा प्रकल्प तेलंगणा आणि आंध्रप्रदेश ह्या दोन राज्यांचा सीमेवर आहे


श्रीशैलम धरण कृष्णा  ह्या नदीवर बांधण्यात आलेले आहे

ह्या धरणाचे बांधकाम 1960 ते 1981 मध्ये पूर्ण करण्यात आले 


याधरणाची उंची 145.10 मीटर  म्हणजे 476 फूट आहे 

या धरणाची लांबी 512 मीटर  म्हणजे 1680 फूट आहे 

श्रीशैलम या धरणाची पाणी साठवण्याची क्षमता 216 टीएम सी आहे 


श्रीशैलम याधरणावर 150 मेगावॉट चे 6 टर्बाईन आणि 110 चे 7 टर्बाईन बसवलेले आहेत त्यावरून एकूण 1670 मेगावॉट इतकी वीजनिर्मिती केली जाते त्यामुळे हा प्रकल्प भारतातील सर्वात मोठा 4 थ्या क्रमांकाचा  जलविद्युत प्रकल्प आहे 






2. कोयना धरण जलविद्युत प्रकल्प

भारतातील सर्वात ज्यास्त वीजनिर्मिती करणाऱ्या जलविद्युत प्रकल्पांच्या यादीमध्ये 2 ऱ्या  क्रमांकाचा प्रकल्प आहे


कोयना धरण जलविद्युत प्रकल्प


हा प्रकल्प महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यात आहे 

कोयना हे धरण कृष्णेची उपनदी कोयना ह्या नदीवर बांधण्यात आलेले आहे 


ह्या धरणाचे बांधकाम 1956 ते 1964 मध्ये पूर्ण करण्यात आले 


कोयना याधरणाची उंची 103.2 मीटर  म्हणजे 339 फूट आहे 

या धरणाची लांबी 807.2 मीटर  म्हणजे 2648 फूट आहे 

कोयना या धरणाची पाणी साठवण्याची क्षमता 105 टीएम सी आहे 


कोयना याधरणावर 20 मेगावॉट चे 2 टर्बाईन 

70 मेगावॉट चे 4 टर्बाईन

75 मेगावॉट चे 4 टर्बाईन

80 मेगावॉट चे 4 टर्बाईन

250 मेगावॉट चे 4 टर्बाईन

असे एकूण 10

टर्बाईन बसवलेले आहेत त्यावरून एकूण 1960 मेगावॉट इतकी वीजनिर्मिती केली जाते त्यामुळे हा प्रकल्प भारतातील सर्वात मोठा सध्याचा पहिल्या क्रमांकाचा  जलविद्युत प्रकल्प आहे 

तेहरी प्रकल्प जेव्हा पूर्ण क्षमतेने काम करेल तेव्हा कोयना २ ऱ्या क्रमांकावर येईल 



  1. टिहरी धरण धरण जलविद्युत प्रकल्प

भारतातील सर्वात ज्यास्त वीजनिर्मिती करणाऱ्या जलविद्युत प्रकल्पांच्या यादीमध्ये ल्या क्रमांकाचा प्रकल्प आहे

टिहरी धरण धरण जलविद्युत प्रकल्प


टिहरी धरणाचा जगातील सर्वात उंच धरणांच्या यादीमध्ये ११ वा क्रमांक लागतो

हे धरण भारत देशातील उत्तराखंड राज्यातील तेहरी गढ़वाल जिल्ह्यातील नवीन टिहरी शहराजवळ बांधलेले आहे 

तेहरी हे धरण भारतातील सर्वात मोठ्या गंगा नदीची उपनदी भागीरथी ह्या नदीवर बांधण्यात आलेले आहे 

हे धरण १९७८ ते २००६ दरम्यान बांधण्यात आलेले आहे 


हे धरण दिल्ली शहरापासून ३२२ किलोमीटर अंतरावर आहे 

हे धरण देहरादून शहरापासून 112 किलोमीटर अंतरावर आहे 

हे धरण ऋषिकेश शहरापासून 84 किलोमीटर अंतरावर आहे 

टिहरी हे धरण भारतातील सर्वात उंच धरण आहे 


 तेहरी धरणाची उंची 260.5 मीटर म्हणजे फूट 855 आहे 

या धरणाची लांबी 575 मीटर म्हणजे 1,886 फूट आहे  


धरणाची पाणी साठवण्याची क्षमता 139.39 टी एम सी म्हणजेच 139390 दशलक्ष घनफूट आहे 


टिहरी धरणाच्या जलाशयाला रामतीर्थ  सागर म्हणतात

टिहरी धरण हे टिहरी विकास परियोजने मधील  एक धरण आहे

या परी योजनेतील कोटेश्वर हे दुसरे धरण आहे 

हे धरण टिहरी पासून पुढील बाजूस काही अंतरावर आहे 


ही परियोजना पूर्ण झाल्यावर २४०० मेघा व्हॅट इतकी वीजनिर्मिती केली जाणार आहे त्यापैकी सध्या च्या टिहरी धरणावरून १००० मेघा व्हॅट वीजनिर्मिती केली जाते तर कोटेश्वर धरणांमधून ४०० मेघा व्हॅट वीजनिर्मिती केली जाते

आणि अजून १००० मेघा व्हॅट क्षमतेचे टिहरी पंप प्रकल्पाचे काम सुरु आहे 

हे धरण सध्या टी एच डी सी कंपनी च्या ताब्यात आहे     

त्यांचा सांगण्या नुसार हा प्रकल्प डिसेंबर २०२२ पर्यंत पूर्ण होईल


सध्या ह्या धरणा चा वीजनिर्मिती मध्ये भरतामध्ये ५ वा क्रमांक येतो पण ह्याचे पूर्ण काम झाल्यावर हे धरण भारतातील सर्वातज्यस्त म्हणजे २४०० मेगावॉट इतकी वीजनिर्मिती करणारे देशातील पहिल्या क्रमांकाचे धरण किंवा हा प्रकल्प येईल


Comments

Popular posts from this blog

दरेकर घराण्याचा इतिहास

🚩सरदार दरेकर घराण्याचा इतिहास 🚩 ऐतिहासिक कार्य:- कऱ्हे पठारावरील अनेक कर्तबगार घराण्याप्रमाणे दरेकर घराणे शिवकाळापासून सरदारकी करून कार्यरत होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या हशम मावळे पायदळाचे सरदारांच्या यातील दरेकरांचे चार सरदार होते. १)गणोजी दरेकर 2) येसाजी दरेकर (3) बाळाजीराव (बाजीराव) दरेकर (4) राणोजी दरेकर यांचे वारस सुभानजी, गोरखोजी, मानाजी ,गोरोजी यांना अनेक गावांचे मोकासे होते. *२ एप्रिल १६६३ रोजी मोरो त्रिंबक पेशवे व निळोपंत सोनदेव यांनी शिवाजी महाराजांना सिंहगडावरील फितव्याबाबत सावधतेचा इशारा दिला. या पत्रात सिंहगडाच्या सुरक्षेसाठी दरेकर सरदारांचा तानाजी, कोंढाजी, कमळोजी यांच्यासह स्पष्ट उल्लेख आहे.* *शके १६१४ (इ.स. १६९२) मध्ये छत्रपती राजाराम महाराजांनी रायगड हस्तगत मोहिमेसाठी दरेकर, जाऊळकर, मावळे व इतर पायदळांना थेट आज्ञा केली होती.* *या आदेशातून दरेकर हे स्वराज्याच्या लष्करी मोहिमेत सक्रिय व विश्‍वासू सरदार होते, हे स्पष्ट होते.* छत्रपती शाहू महाराजांनी सयाजी दरेकर यांना भोसरे, वडखळ, लोणी, महिमानगड, वर्धन गड तसेच खटाव खातगुन आणि सुभान जी दरेकर यांना आंबळे हे वतन दिले हो...

भारतातील आणि जगातील धरणे

******   भारतातील आणि जगातील धरणे    ******** जगातील   सर्वात   मोठी ५    धरणे (संपूर्ण विडिओ पाहण्यासाठी फोटोवर क्लिक करा)  जगातील   सर्वात   मोठे   धरण   करिबा   (संपूर्ण विडिओ पाहण्यासाठी फोटोवर क्लिक करा)  भारतातील सर्वात मोठी ५ धरणे (संपूर्ण विडिओ पाहण्यासाठी फोटोवर क्लिक करा)           इंदिरा   सागर   धरण                                  सरदार   सरोवर   धरण                                   रिहंद   धरण                              भाख्रा   नागल   धरण                                नागार्जुन सागर धरण   इडुक्की  ...

शनिवार वाडा

शनिवार वाडा शनिवार वाडा  (बोली मराठीत शनवारवाडा) ही  महाराष्ट्रातील   पुणे  शहरातील ऐतिहासिक वास्तू आहे.  इ.स.च्या १८व्या शतकात  हा वाडा  मराठा साम्राज्याचे  पंतप्रधान, अर्थात  पेशवे  यांचे निवासस्थान व कार्यालय होते. भारत सरकारने शनिवारवाड्याला दिनांक १७ जून, इ.स. १९१९ रोजी महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक  म्हणून घोषित केलेले आहे. [१] शनिवारवाड्याच्या पायाभरणीचे काम १० जानेवारी १७३० रोजी सुरू झाले, तर २२ जानेवारी १७३२ रोजी शनिवारवाड्याची वास्तुशांत करण्यात आली. १७३२ नंतरही या वाड्यात वारंवार नवीन बांधकामे, बदल होत राहिले. बुरुजाचे दरवाजाचे काम होण्यास १७६० हे वर्ष उजाडले. १८०८, १८१२, १८१३ या वर्षी छोट्या-मोठ्या आगी लागल्याच्या नोंदी सापडतात, तर १७ नोव्हेंबर १८१७ ला वाड्यावर ब्रिटिशांचे निशाण लागले. त्यानंतर येथे काही काळ पुण्याचा पहिला कलेक्‍टर हेन्‍री डंडास रॉबर्टसन राहत होता. त्यानंतर वाड्यात तुरुंग, पंगुगृह, पोलिसांची निवासस्थाने होती. १८२८ मध्ये वाड्यास मोठी आग लागली व आगीत बहुतेक सर्व इमारती जळाल्या. पुढे त...