Skip to main content

Posts

Showing posts from September, 2020
  इसापूर धरण  रसिकहो नमस्कार आज आपण महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ आणि हिंगोली ह्या दोन जिल्यांच्यासीमेवर असलेले इसापूर धरण पाहणार आहोत  महाराष्ट्रातील सर्वात ज्यास्त पाणी साठा असलेल्या धरणांच्या यादी मध्ये इसापूरचा ४ था क्रमांक येतो  इसापूर हे धरण हिंगोली शहरापासून 35 किलोमीटर अंतरावर आहे तसेच हे धरण यवतमाळ शहरापासून १३६ किलोमीटर अंतरावर आणि  नांदेड शहरापासून ८८ किलोमीटर अंतरावर आहे इसापूर हे धरण पैनगंगा नदीवर 1971 ते 1982 साली बांधण्यात आले  पैनगंगा हि नदी वर्धा नदीची उपनदी आहे, वर्धा वैनगंगेला मिळते या प्रवाहास प्राणहिता म्हणतात प्राणहिता ही पुढे गोदावरीला मिळते इसापूर धरणाची उंची 57 मीटर  म्हणजेच 187 फूट आहे या  धरणाची   लांबी  4120 मीटर  म्हणजेच 13517 फूट आहे  इसापूर या  धरणाची पाणी साठवण्याची एकूण क्षमता 44.28 टीएमसी म्हणजेच 44280 दशलक्ष घनफूट इतकी आहे या धरणाची पाणी साठवण्याची प्रभावी क्षमता 33.58 टीएमसी म्हणजेच 33580 दशलक्ष घनफूट इतकी आहे महाराष्ट्रातील प्रभावी किंवा उपयुक्त जलसाठा असलेल्या धरणांच्या  यादीमध्ये इसापूरचा ५ वा क्रमांक येतो  इसापूर धरणाला 15 दरवाजे आहेत  इसापूर धरणात

मुळा धरण

   रसिकहो नमस्कार आज आपण महाराष्ट्र राज्यातील अहमदनगर जिल्ह्यातील एक महत्वाचे धरण पाहणार आहोत ते म्हणजे मुळा धरण  या धरणाला ज्ञानेश्वर सागर धरण असेही म्हणतात  हे धरण मुळा नदीवर 1972 ते 1974 दरम्यान बांधण्यात आले हे धरण राहुरी ह्या तालुक्याच्या ठिकाणापासून साधारण 10 किलोमीटर तसेच अहमदनगर शहरापासून 38 किलोमीटर अंतरावर आहे   मुळा धरणाची उंची 48.17 मीटर  म्हणजेच 158 फूट आहे या  धरणाची   लांबी  2856 मीटर  म्हणजेच 9370 फूट आहे  या  धरणाची पाणी साठवण्याची क्षमता 26 टीएमसी म्हणजेच 26 हजार दशलक्ष घनफूट इतकी आहे मुळा धरणाच्या पाण्याचा उपयोग शेतीसाठी होतो तसेच नगर शहराला पाणीपुरवठा आणि आजूबाजूच्या गावांना देखील पाणीपुरवठा करण्याच्या हेतूने हे धरण बांधण्यात आले आहे  मुळा धरणा शेजारी महात्मा फुले कृषी विद्यापीठ आहे  मुळा धरण परिसर पर्यटकांचे खास आकर्षण आहे मुळा धरणातून दोन कालवे जातात डावा कालवा  आणि उजवा कालवा याकालव्यांमुळे नगर जिल्यातील बराच  भाग बागायत झाला आहे 

भंडारदरा धरण

भंडारदरा धरण  विडिओ   रसिकहो नमस्कार आज आपण महाराष्ट्र राज्यातील अहमदनगर जिल्ह्यातील एक महत्वाचे धरण पाहणार आहोत ते म्हणजे भंडारदरा धरण  या धरणाला विल्सन डैम असेही म्हणता त  हे धरण प्रवरा नदीवर १९१० ते १९२६ दरम्यान बांधण्यात आले हे धरण अकोले ह्या तालुक्याच्या ठिकाणापासून ३६ किलोमीटर तसेच अहमदनगर शहरापासून १५० किलोमीटर अंतरावर आहे  भंडारदरा ध रणाची उंची 82.35 मीटर  म्हणजेच २७० फूट आहे या  धरणाची   लांबी  2717 मीटर  म्हणजेच 8914 फूट आहे  या  धरणाची पाणी साठवण्याची क्षमता ११ टीएमसी म्हणजेच ११ हजार दशलक्ष घनफूट इतकी आहे या धरणाच्या परिसरात कळसुबाई हे महाराष्ट्रातील सर्वातमोठे शिखर आहे तसेच अम्ब्रेला फॉल, रंधा फॉल, रतनवाडी येथील अमृतेश्वराचे पुरातन हेमाडपंथी मंदीर, घाटघर हि पर्यटकांची आवडती ठिकाणे आहेत  या धरणावर १० मेगावॉट वीजनिर्मिती केली जाते  या धरणाच्या पाणीसाठ्याला अर्थुर  जलाशय म्हणतात  ह्या धरण  परिसराला जुन ते ऑक्टोबर ह्या मान्सून काळात हजारो पर्यटक भेट देतात 

महाराष्ट्रातील आणि भारतातील नद्या

  ********* नद्या ******* महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या ५ नद्या   भारतातील   सर्वात मोठ्या १० नद्या पुणे   जिल्ह्यातील  10  नद्या मुळा   मुठा   नदी   पुणे इंद्रायणी   नदी   पूणे पवना   नदी   पुणे   करहा   नदी नीरा   नदी भीमा   नदी भारतातील   नद्या  ——————————— गंगा   नदी गोदावरी   नदी   कृष्णा   नदी   यमुना   नदी सिंधू   नदी नर्मदा   नदी महानदी   नदी कावेरी   नदी ब्रह्मपुत्रा   नदी तापी   नदी