Search This Blog

Monday, 7 September 2020

मुळा धरण

  रसिकहो नमस्कार आज आपण महाराष्ट्र राज्यातील अहमदनगर जिल्ह्यातील एक महत्वाचे धरण पाहणार आहोत ते म्हणजे मुळा धरण 

या धरणाला ज्ञानेश्वर सागर धरण असेही म्हणतात 


हे धरण मुळा नदीवर 1972 ते 1974 दरम्यान बांधण्यात आले


हे धरण राहुरी ह्या तालुक्याच्या ठिकाणापासून साधारण 10 किलोमीटर तसेच अहमदनगर शहरापासून 38 किलोमीटर अंतरावर आहे 


 मुळा धरणाची उंची 48.17 मीटर  म्हणजेच 158 फूट आहे

या  धरणाची   लांबी  2856 मीटर  म्हणजेच 9370 फूट आहे 

या  धरणाची पाणी साठवण्याची क्षमता 26 टीएमसी म्हणजेच 26 हजार दशलक्ष घनफूट इतकी आहे


मुळा धरणाच्या पाण्याचा उपयोग शेतीसाठी होतो तसेच नगर शहराला पाणीपुरवठा आणि आजूबाजूच्या गावांना देखील पाणीपुरवठा करण्याच्या हेतूने हे धरण बांधण्यात आले आहे 


मुळा धरणा शेजारी महात्मा फुले कृषी विद्यापीठ आहे 

मुळा धरण परिसर पर्यटकांचे खास आकर्षण आहे


मुळा धरणातून दोन कालवे जातात डावा कालवा  आणि उजवा कालवा याकालव्यांमुळे नगर जिल्यातील बराच  भाग बागायत झाला आहे 






No comments:

Post a Comment

>छत्रपती शिवाजी महाराज: एक परस्परसंवादी गाथा

छत्रपती शिवाजी महाराज: एक परस्परसंवादी गाथा ...