Search This Blog

Sunday, 1 November 2020

महाराष्ट्र राज्यातून वाहणाऱ्या सर्वात लांब 7 नद्या

  रसिकहो नमस्कार आज आपण महाराष्ट्र राज्यातून वाहणाऱ्या सर्वात लांब 7 नद्या पाहणार आहोत  


7 तापी नदी  208

महाराष्ट्रातुन वाहणाऱ्या सर्वात लांब नद्यांच्या यादीमध्ये ७ व्या क्रमांकाची नदी आहे तापी नदी 


तापी 

खानदेश । उत्तर महाराष्ट्रातून वाहणारी ही एक महत्त्वाची नदी आहे .

तापी नदीचा उगम मध्यप्रदेश राज्यातील  बैतुल जिल्ह्यात सातपुडा पर्वत रांगेतील मुल्ताई डोंगरावर होतो 

भारतातील पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहणारी हि एक महत्वाची नदी आहे

तापी नदीची एकूण लांबी ७२४ किलोमीटर आहे, त्या पैकी २०८ किलोमीटर ही नदी महाराष्ट्रातून वाहते.

 

तापी ज्या भागातून वाहते तो खचदरीचा भाग आहे . या नदीने खोल दरी निर्माण केली आहे . ही पश्चिमवाहिनी नदी असून अमरावती , जळगांव , धुळे , नंदुरबार जिल्हयातून वाहत जाऊन गुजरातमध्ये प्रवेश करते नंतर ती सुरत या शहराजवळ अरबी सागराला जाऊन मिळते . तापी नदी उगमानंतर नैऋत्येस वाहत जाऊन अमरावती जिल्ह्याच्या उत्तर सिमेवरुन सुमारे ४८ किमी पर्यंत वाहते . पुढे ती मध्यप्रदेशात प्रवेश करते तेथुन बुहाणपुर जवळून वाहत जाऊन जळगांव जिल्ह्यातील रावेरच्या पूर्वेकडे महाराष्ट्रात प्रवेश करते . तापीच्या उत्तरेस कालीभीत डोंगर व दक्षिणेस मेळघाट व गाविलगड डोंगर आहेत . नंदुरबार जिल्ह्यातील तळोद्याकडून वाहत जाऊन ती गुजरात राज्यात प्रवेश करते . ही महाराष्ट्रातील सर्वाधिक लांबीची पश्चिम वाहिनी नदी आहे तसेच सर्वाधिक गाळाचा विस्तार असलेले नदी खोरे आहे



महाराष्ट्रामध्ये तापी नदीला डाव्या बाजूने पूर्णा उपनदी येऊन मिळते , म्हणून या दोन्ही नदीच्या संयुक्त खोऱ्याला तापी - पूर्णा खोरे म्हणतात . या नदीला अनेक उपनद्या येऊन मिळतात . तापीला डावीकडून पूर्णा , वाघूर , गिरणा , पांझरा , बुराई इत्यादी उपनद्या मिळतात . काटेपूर्णा , मोरणा व नळगंगा या पूर्णा नदीच्या सहाय्यक उपनद्या आहेत तर उजवीकडून आणेर , गोमती या उपनद्या येऊन मिळतात . पुर्णा ही तापीची मुख्य उपनदी असून ती गाविलगडच्या डोंगरात उगम पावते . पुर्णा नदी अमरावती व अकोला जिल्ह्यात पश्चिमेकडे वाहत जाऊन जळगांव जिल्ह्यात चांगदेव येथे तापी नदीस मिळते . गिरणा , बोरी , पांझरा , बुराई या उपनद्या सह्याद्रीमध्ये उगम पावतात व तापी नदीला मिळतात.वाघुर नदी अजिंठ्याच्या डोंगरात उगम पावन व भुसावळच्या पश्चिमेस तापी नदीला मिळते.नंदुरबार जिल्ह्याच्या पश्चिम भागात महाराष्ट्राची सिमा ओलांडून गुजरातमध्ये प्रवेश करतांना उत्तरेस अस्तंभा व दक्षिणेस गाळणा डोंगर या मधून वाहतांना तापी खोरे केवळ ५० किमी रुंद आहे . तापी नदी खोरे क्षेत्रामध्ये अमरावती अकोला , बुलडाणा , जळगाव , धुळे व नंदुरबार या जिल्ह्यांचा समावेश होतो . अनेक घळ्यांमुळे हा प्रदेश दुर्गम स्वरुपाचा बनला असून तेथे खोल घळयांमधून बिहड निर्मिती झाली आहे . तापी आणि तिच्या उपनद्यांनी ३१,२०० चौ.कि.मी. ( भारतातील एकूण ५८ हजार चौ किमी ) प्रदेश व्यापलेला असून हा प्रदेश भारतातंत्र एकूण क्षेत्राच्या ५३.७ ९ टक्के इतके क्षेत्र महाराष्ट्रात आहे . हा भाग अत्यंत सुपीक आहे . तापीच्या खोऱ्यात काटेपूर्णा , नळगंगा गिरणा या नद्यांवर धरणे बांधली आहेत . सुपीक जमिनीमुळे या नदीच्या खोऱ्यात ऊस , कापूस , केळीची मोठया प्रमाणात लागवड होते . तापी नदीच्या खोऱ्यात अमरावती , जळगाव , धुळे ही प्रमुख शहरे आहेत

तापी आणि तिच्या उपनद्या वरील धरणे

हतनूर, भाम, प्रकाशन बॅरेज, धनेर, सुलवडे बॅरेज, वाडीशेवाडी, देहाली

तापी नदीवरील उकाई हे मोठे धरण गुजरात राज्यात आहे

वाघूर नदीवरील वाघूर धरण 

गिरणा नदीवरील गिरणा धरण



6 कृष्णा नदी 282

महाराष्ट्रातुन वाहणाऱ्या सर्वात लांब नद्यांच्या यादीमध्ये 6 व्या क्रमांकाची नदी आहे कृष्णा नदी


कृष्णा : कृष्णा नदी सातारा जिल्हयात सहयाद्री पर्वतात महाबळेश्वर येथे उगम पावते . या नदीचा उगम समुद्र सपाटीपासून १२२० मीटर उंचीवर होतो . हे स्थान अरबी समुद्रापासून ६५ किमी अंतरावर आहे . या नदीच्या उत्तरेला शंभूमहादेवाच्या डोंगर रांगा आहेत . हो नदी महाराष्ट्र , कर्नाटक , तेलंगाना व आंध्रप्रदेशातून वाहत जाऊन दिवी बेटाजवळ बंगालच्या उपसागराला मिळते . कृष्णेची भारतातील एकूण लांबी १२८० किमी असून त्यापैकी २२ % म्हणजे २८२ किमी लांबीचा प्रवाह महाराष्ट्रात आहे . कृष्णेच्या खोऱ्याचे एकूण क्षेत्र २ लाख ५ ९ हजार चौ . किमी असून त्यापैकी २८ हजार ७०० चौ . किमी . महाराष्ट्रात ( ११ % ) आहे . • महाराष्ट्रातील कृष्णा खोऱ्याच्या भागाचा उल्लेख वरचे कृष्णा खोरे असा केला जातो . सातारा जिल्हयात माहुली येथे कृष्णा व वेण्णा यांचा संगम होतो . कराड येथे कृष्णा व कोयना यांचा संगम होतो कोयनेचा उगम महाबळेश्वर वेद होतो व ती सह्याद्रीच्या मुख्य शिरोधारा व बामनोली डोंगर या मधून दक्षिणेस ६५ किमी पर्यंत वाहत जाते . तेथे हेळवाक स्वळ कोयना धरण बांधण्यात आलेले आहे . हेळवाक पासून पूर्वेकडे वाहत देऊन कोयना नदी कृष्योला कराड येथे यऊन मिळते . या संगमाला महाराष्ट्रात प्रितीसंगम असे म्हणतात . सह्याद्रीमध्ये प्रचितगड येथे उगम पावणारी वारणा नदी हरिपूर येथे कृष्णेला मिळते 



• कुंभी , कासारी , भोगावती , तुळशी , ( गुप्त - सरस्वती ) या नद्या मिळून तयार होणारी पंचगंगा नदी कोल्हापुर शहरातून वाहत जाऊन कोल्हापुर जिल्ह्यातील नरसोबाचीवाडी जवळ कृष्णेस मिळते . कृष्णा नदीच्या खोऱ्यात कोयना व राधानगरी येथे वीज निर्माण केली जाते . महाराष्ट्राच्या दक्षिण भागातील दुधगंगा व वेदगंगा यांचा संयुक्त प्रवाह दंतवाड जवळ कृष्णेला मिळतो . सर्वात दक्षिण भागात घटप्रभा नदी असून हिरण्यकेशी ही तिची उपनदी आहे . घटप्रभा कर्नाटकात वाहत जाऊन बागलकोटच्या उत्तरेस कृष्णेला मिळते कृष्णेच्या सर्व उपनद्या डोंगराळ प्रदेशातून वाहतात व फार मोठ्या प्रमाणावर खननकार्य करतात . • कृष्णेला वेण्णा , कोयना , वारणा , पंचगंगा , दूधगंगा इत्यादी उपनद्या उजवीकडून येऊन मिळतात . कृष्णेला डावीकडून येणारी एकमेव नदी येरळा ही सांगली जिल्ह्यात भिलवडी जवळ कृष्णेला येऊन मिळते . कृष्णेच्या खोऱ्यात वाई , सातारा , सांगली , कराड , मिरज , कोल्हापूर ही प्रमुख शहरे आहेत . कृष्णा नदीवर सातारा जिल्ह्यात वाईजवळ धोम धरण , कोयना नदीवर कोयना धरण , वारणा नदीवर चांदोली धरण , भोगावती नदीवर राधानगरी धरण आहे . दूधगंगा नदीवर कळम्मावाडी येथे धरण बांधले आहे . वरील जलसिंचन योजनेमुळे या नदीच्या खोऱ्यात ऊसाची मोठ्या प्रमाणात लागवड होत आहे . . 

नदीसंगमावरील गावे : 

१ ) कृष्णा व वेण्णा - माहुली ( सातारा ) 

४ ) कृष्णा व येरळा - भिलवडी ( सांगली ) 

२ ) कृष्णा व कोयना - कराड ( सातारा ) 

५ ) कृष्णा व पंचगंगा - नरसोबाची वाडी ( कोल्हापुर ) 

३ ) कृष्णा व वारणा - हरिपुर ( सांगली ) 

६ ) कृष्णा व दुधगंगा - दंतवाड ( कोल्हापूर ) 


. वैशिष्ट्ये : 

 कृष्णानदीला महाराष्ट्रातील सर्वाधिक पाणी वाहून नेणारे नदीखोरे म्हणतात . ( ७६ ९टि.एम.सी . ) 

२ ) या नदीखोऱ्यातील पंचगंगा ही सर्वात प्रदूषित नदी आहे . 

३ ) या नदीखोऱ्याला दक्षिण महाराष्ट्र असेही म्हणतात . 

४ ) महाबळेश्वर येथे पुढील पाच नद्यांचा उगम होतो - कृष्णा , कोयना , वेन्ना ( पठारावरील नद्या ) , सावित्री , गायत्री ( कोकणातील नद्या ) 

५ ) कोल्हापूर जिल्ह्यातील पंचगंगा नदी पुढील पाच नद्यांच्या संगमातून तयार होत असते ( कासारी , कुंभी , तुळशी , भोगावती सरस्वती ( गुप्त नदी ) ) 



5 वैनगंगा  295

महाराष्ट्रातुन वाहणाऱ्या सर्वात लांब नद्यांच्या यादीमध्ये 5 व्या क्रमांकाची नदी आहे वैनगंगा नदी


वैनगंगा ही नदी महाराष्ट्राचा विदर्भातून वाहणारी एक महत्वाची नदी आहे 

वैनगंगा ही प्रमुख दक्षिण वाहीनी नदी आहे . ही उत्तरेस मध्य प्रदेशातील मैकल डोंगरात सिवनी येथे उगम पावते . दक्षिणेस महाराष्ट्रात गोंदिया , भंडारा , चंद्रपूर , गडचिरोली जिल्हयातून वाहत जाऊन वर्धा नदीस मिळते ही नदी वैनगंगा ही नदी चंद्रपुर आणि गडचिरोली जिल्ह्याच्या सिमेवरुन वाहते

महाराष्ट्रात वैनगंगेची लांबी २ ९ ५ कि मी आहे . या नदीला डावीकडून वाघ , चुलबन , गढवी इत्यादी तर उजवीकडून कन्हान , अंथारी मुल या उपनद्या मिळतात वैनगंगा व तिच्या उपनद्यांनी ( ३८,००० चौ . कि मी . ) इतका प्रदेश व्यापलेला आहे . वैनगंगेच्या उपनद्या वाघ व कन्हान या नदीवर धरणे बांधण्यात आली आहेत . भंडारा जिल्हयात या नदीच्या खोऱ्यात भातशेतीचा विकास झालेला आहे . या नदीच्या खोऱ्यात गोंदिया , नागपुर , भंडारा , गडचिरोली व चंद्रपूर ही महत्त्वाची शहरे आहेत . 


जिल्ह्यांच्या सिमा तयार करणाऱ्या नद्या 

१ नागपूर आणि भंडारा वैनगंगा 

2 भंडारा आणि गोंदीया वैनगंगा 

३ भंडारा आणि चंद्रपूर वैनगंगा 

4 चंद्रपूर आणि यवतमाळ पैनगंगा 

५ चंद्रपूर आणि गडचिरोली वैनगंगा . 


नदीसंगमावरील गाव : 

१ ) काढाणी व वैनगंगा • गडचिरोली 

प्राणहिता नदी : वैनगंगा व वर्धा या दोन नद्यांचा गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्याच्या सिमेवर चपराळा ( गडचिरोली ) येथे संगम होतो . त्यांच्या संयुक्त प्रवाहास प्राणहिता नदी असे म्हणतात . पुढे प्राणहिता नदी महाराष्ट्र व तेलंगनाच्या सिमेवरुन १२० किमी वाहत जाते . गडचिरोली जिल्हा व तेलंगणा यांच्या सिमेवर सिरोंचा जवळ ती गोदावरीला मिळते 

वैनगंगा नदीवरील गोसीखुर्द हे मोठे आणि महत्त्वाचे धरण आहे

सिरपूर, पुजारीटोला हि धरणे वैनगंगेची उपनदी बाग नदीवर 

पेंच आणि तोतलाडोह हि धरणे वैनगंगेच्या उपनद्यांवर बांधलेली आहेत 

बावनथड़ी (राजीव सागर) हे धरण बावनथड़ी नदीवर



4 भिमा नदी : 451

महाराष्ट्रातुन वाहणाऱ्या सर्वात लांब नद्यांच्या यादीमध्ये 4 थ्या व्या क्रमांकाची नदी आहे भिमा नदी


भिमा नदीचा उगम पुणे जिल्ह्यातील सह्याद्री पर्वत रांगेतील भिमाशंकर येथे होतो . 

हे ठिकाण सुमारे ९७५ मी . उंचीवर आहे व अरबी समुद्रापासुन ७० किमी अंतरावर आहे . भिमा नदी उगमाजवळ पूर्व वाहिनी आहे . परंतु खेड पासून पुढे ती आग्नेयेस वाहते . उगमाजवळ भिमा खोल घळईतून वाहते , परंतु पुढे तिचे पात्र रुंद आहे . भिमाशंकर पासून कर्नाटक मधील कुरगुडी पर्यंतची भिमेची एकूण लांबी ८६० किमी आहे , त्यापैकी ४५१ किमी लांबी महाराष्ट्रातून वाहते . या नदीखोन्याने ७७ हजार जी किमी क्षेत्र व्यापलेले आहे , त्यापैकी ६० टक्के ( ४६,१८४ ची , किमी ) महाराष्ट्रात आहे . भीमा नदी काही क्षेत्रात पुणे आणि सोलापूर व पुणे आणि अहमदनगर जिल्हयाची नैसर्गिक सीमा तयार करते . ही नदी आग्नेय दिशेला सोलापुर जिल्ह्यातून वाहत जाऊन कर्नाटकात रायचुर जवळ कुरगुडी येथे कृष्णोला मिळते . इंद्रायणी , मुळा , मुठा , निरा आणि मांड इत्यादी उपनद्या भीमेला उजवीकडून मिळतात तर घोड , कुकडी व सीना या डावीकडून मिळणाऱ्या प्रमुख उपनद्या आहेत . या सर्व नद्यांनी ४६,१८४ चौ.कि.मी. चा प्रदेश व्यापलेला आहे
उत्तरेस हरिश्चंद्र - बालाघाट डोंगर व दक्षिणेस शंभु महादेवाचे डोंगर या मध्ये भिमेचे खोरे 

असून या खोऱ्यात पुणे व सोलापुर हे संपूर्ण जिल्हे , सातारा जिल्ह्याचा उत्तर भाग , अहमदनगर जिल्हाचा दक्षिण भाग तसेच बीड व उस्मानाबाद जिल्ह्याचा काही भाग येतो 

महाराष्ट्राच्या पठारावर भीमा नदीचे खोरे कृष्णा नदीपासून अलग असल्यामुळे भीमा खोयांचा स्वतंत्र उल्लेख केला जातो . उगमाकडे भीमा नदी खोल दरीतून वाहते . पुढे तिचे पात्र रुंद होते . 

 

पंढरपूरजवळ भिमा नदीचे पात्र चंद्रकोरीसारखे दिसते , म्हणून तिला चंद्रभागा म्हणतात . भीमेच्या खोऱ्यात पश्चिमेस सहयाद्री पर्वत व पायथ्यास मावळ खोरे येते . या नदीच्या खोऱ्यात भिमाशंकर , देहू , आळंदी , पंढरपूर , तुळजापूर इत्यादी धार्मिक स्थळे आहेत तसेच पुणे , अहमदनगर , सोलापूर ही महत्त्वाची शहरे आहेत . भीमेच्या खोऱ्यात जमीन सुपीक असून तेथे जलसिंचनाचा बराच प्रसार झाला आहे 


सीना नदी अहमदनगर शहराजवळ उगम पावते आणि भोगावती व बोरी या उपनद्यासह सोलापुर जिल्ह्यात भिमेस मिळते . वेळ ही उपनदी सह्याद्रीत उगम पावून तळेगांव ढमढेरे येथे भिमेस मिळते . घोड नदी घासले गावाजवळ उगम पावते व मिना व कुकडीसह शिरुर जवळ संगम होतो . इंद्रायणी लोणावळ्या जवळ कुरबुडे येथे उगम पावते व तुळापूर जवळ भिमेस मिळते . सह्याद्रीत उगम पावणाऱ्या मुळा व मुठा यांचा संगम पुणे या शहरात होतो तर निरा नदी पुणे जिल्ह्यात निरा नरसिंगपुर येथे भिमा नदीला जाऊन मिळते 


भीमा नदीवरचे उजनी धरण , मुठा नदीवरचे खडकवासला , मुळा नदीवर मुळशी धरण , घोड नदीवर डिंभे प्रकल्प , निरा नदीवर वीर , निरा देवघर व वेळवंडी नदीवर भाटघर धरण इत्यादी पाटबंधारे योजना महत्त्वाच्या आहेत . या परिसरात ऊसाची मोठ्या प्रमाणात लागवड होते . 


नदीसंगमावरील गावे : १ ) मुळा व मुठा पुणे 

५ ) निरा व भिमा निरा नरसिंगपुर ( पुमो 

२ ) कुकडी व घोड शिरुर ( पुणे ) 

६ ) वेळ व भिमा तळेगावडमदर ( पुणे ) 

३ ) इंद्रायणी व भिमा तुळापूर / आळंदी ( पुयो ) 

७ ) मुठा व भिमा वाळकी ( पुणे ) 

४ ) सिना व भिमा कुडल ( सालापूर 


नदीकाठावरील गावे 

१ ) भिमा ;- राजगुरुनगर , दौड , पंडरपुर 

५ ) निरा :- भोर , निरा नरसिंगापुर 

२ ) कन्हा :- बारामती, जजुरी 

६ ) कुकडी :- जुन्नर 

३ ) इंद्रायणी:-  देह , आळंदी 

७ ) घोड:- आबेगाव , घोडगाव , शिरुर 

४ ) सिना :- अहमदनगर




3 वर्धा 455

महाराष्ट्रातुन वाहणाऱ्या सर्वात लांब नद्यांच्या यादीमध्ये 3 ऱ्या क्रमांकाची नदी आहे वर्धा नदी


वर्धा : वर्धा नदीचे खोरे हे विदर्भातील सर्वात मोठे नदीखोरे आहे तसेच ही नदी महाराष्ट्रातील सर्वाधिक लांबीची दक्षिण वाहिनी नदी आहे . ही नदी उत्तरेस मध्य प्रदेशात सातपुडा पर्वताच्या दक्षिण उतारावर उगम पावते , नंतर ती अमरावती , वर्धा , यवतमाळ व चंद्रपूर जिल्हयातून वाहत जाऊन गडचिरोली जिल्ह्यात चपराळा येथे वैनगंगेला जाऊन मिळते . या नदीची महाराष्ट्रातील लांबी ४५५ कि.मी. आहे . या नदीला डावीकडून वेन्ना , धाम , इरई आणि उजवीकडून विदर्भा , खोलोट , पैनगंगा या उपनद्या मिळतात . वर्धा व तिच्या उपनद्यांच्या खोऱ्यांचा विस्तार ४६,१८२ चौ . कि.मी. आहे . वर्धेची उपनदी वेन्ना नदीला ' बोर ' नावाची नदी मिळते . वर्धा नदीच्या खोऱ्यात वर्धा , पुलगाव , हिंगणघाट इत्यादी महत्त्वाची शहरे आहेत . 

• नदीसंगमावरील गावे : १. वर्धा व वैनगंगा - चपराळा ( गडचिरोली ) 

जिलगांच्या सिमा तयार करणाऱ्या नद्या 

क्र . जिल्हे नदी क्र . जिल्हे नदी 

1 अमरावती आणि नागपूर वर्धा  नदी 

2 अमरावती आणि वर्धा वर्धा  नदी 

3 वर्धा आणि यवतमाळ वर्धा नदी 

4 चंद्रपूर आणि यवतमाळ  वर्धा नदी 

५ चंद्रपूर आणि वर्धा वेना  नदी 

६ नागपूर आणि वर्धा कार  नदी 


वर्धा आणि तिच्या उपनद्या वरील धरणे

नळ-दमयन्ती सागर  म्हणजेच अप्पर वर्धा , लोअर वर्धा,  बेंबाला ही  धरणे  वर्धा नदीवर आहे




2 पैनंगगा 495

महाराष्ट्रातुन वाहणाऱ्या सर्वात लांब नद्यांच्या यादीमध्ये 2 ऱ्या व्या क्रमांकाची नदी आहे पैनंगगा नदी

पैनंगगा ही महाराष्ट्रात विदर्भाच्या दक्षिण भागातून वाहणारी एक नदी आहे . ही बुलढाणा जिल्हयात अजिंठाच्या डोंगरात उगम पावून बुलढाणा , हिंगोली , वाशिम , नांदेड व यवतमाळ जिल्हयातून वाहत जाऊन वर्धा नदीला चंद्रपुर जिल्ह्यातील वढा येथे मिळते . त्या अगोदर ही नदी महाराष्ट्र व तेलंगणाच्या सिमेवरुन वाहले या नदीची लांबी सुमारे ४ ९ ५ कि.मी. आहे . ही विदर्भातील सर्वाधिक लांबीत्री नदी आहे . या नदीस डाव्या बाजूने पुस , अरुणावती , खूनी , अडाण , वांघाडी या नद्या येऊन मिळतात तर उजव्या बाजूने कयाधु ही नदी येऊन मिळते . ही नदी बहुतांश उंच - सखल भागातून वाहते . या नदीवर नांदेड जिल्हयात सहखकुंड नावाचा मोठा धबधबा आहे . 


या नदीवर यवतमाळ जिल्हयात इसापूरजवळ एक मोठे धरण बांधण्यात आले आहे . या धरणातून कालवे काढून हिंगोली , नांदेड , यवतमाळ जिल्ह्यातील जमिनीस पाणीपुरवठा केला आहे . या नदीची उपनदी पुस या नदीवर देखील धरण बांधले आहे . या नदीच्या खोऱ्यातील उमरखेड , पुसद , पांधरकवडा इत्यादी शहरे आहेत . 


नदीसंगमावरील गावे : १ ) पैनगंगा व वर्धा वढा ( चंद्रपूर ) २ ) पैनगंगा - मेहकर 

अप्पर आणि लोअर पूस ही  धरणे पूस ह्या पैनगंगेचा उपनदीवर आहेत 

अरुणावती धरण पैनगंगेची उपनदी अरुणावती नदीवर 

पैनगंगा ही नदी वर्धा नदीची उपनदी आहे 

पैनगंगा ह्या नदीवर महाराष्ट्रातील सर्वात मोठे ४ थ्या क्रमांकाचे इसापूर हे धरण आहे 

वर्धा आणि वैनगंगा ह्या नद्या एकत्र मिळून गोदावरी नदीला मिळतात गोदावरीला मिळण्या अगोदर च्या प्रवाहाला प्राणहिता नदी असे म्हणतात 




1 गोदावरी 668

महाराष्ट्रातुन वाहणाऱ्या सर्वात लांब नद्यांच्या यादीमध्ये 1 ल्या व्या क्रमांकाची नदी आहे  गोदावरी नदी

गोदावरी नदीला दक्षिण गंगा असे हि म्हटले जाते

गोदावरीचा उगम नाशिकजवळ त्र्यंबकेश्वर या ठिकाणी ब्रह्मगिरी पर्वतावर होतो 

नाशिक जिल्ह्यातील हे स्थान अरबी समुद्रापासून ८० किलोमीटर पूर्वेस आहे 

गोदावरी नदीची लांबी 1465 किलोमीटर आहे.

त्यापैकी महाराष्ट्रातील गोदावरीची लांबी ६६८ किलोमीटर आहे 


गोदावरी हि महाराष्ट्रातील सर्वातमोठी नदीप्रणाली  आहे या नदीचे महाराष्ट्रातील खोरे क्षेत्र  १५३००० चौरस  किलोमीटर आहे हे क्षेत्र भारताच्या १० टक्के तर महाराष्ट्राच्या ४९ टक्के आहे 


महाराष्ट्रातील गोदावरी आणि तिच्या उपनद्यांमधून दरवर्षी  ३८०० कोटी घनमीटर पाणी वाहते 


गोदावरी हि नदी साधारणत: आग्नेय दिशेला वाहून आंध्रप्रदेशातील राजमहेंद्रीजवळ बंगालच्या उपसागरास मिळते.

 दारणा, प्रवरा, वैनगंगा, मांजरा इ. उपनद्या असलेल्या गोदावरीचे राजमहेंद्रीपासून १० किमी अंतरावर व समुद्रापासून ८० किमी अगोदर दोन उपवाहिन्यांमध्ये विभाजन होते. त्यांना गौतमी नदी आणि वसिष्ठा नदी असे म्हणतात.

गोदावरीतील पाणी ऋतूप्रमाणे कमी-अधिक होत असते. नदीतुन वाहणार्‍या पाण्यापैकी ८०% पाणी जुलै ते ऑक्टोंबर या चार महिन्यांतच वाहुन जाते.

नदीच्या प्रवाहाची रुंदी काही ठिकाणी ( पूर्व घाट पार करताना ) २०० मीटर तर काही ठिकाणी समुद्रास मिळण्याआधी ६.५ कि.मी इतकी होते. आपल्या पाण्यामुळे गोदावरीस महाराष्ट्र व आंध्र प्रदेश राज्यांची जीवनवाहिनी समजले जाते 

त्याच सोबत नांदेड शहराला गोदावरीचे नाभी-स्थान म्हणून ओळखले जाते . नाशिकच्या कुंभमेळाव्याला नांदेड च्या नंदी तट,उर्वशी तट इत्यादी ठिकाणच्या  स्नानाचे खुप महत्त्व आहे.


प्रभू रामचंद्रांनी वनवास काळात गोदावरी तटावर आश्रम बांधला होता असा रामायणात उल्लेख आहे

गोदावरी नदीच्या  खोऱ्याने  ३,१२,८१२ चौरस किलोमीटर क्षेत्र व्यापलेले आहे.


जगातील सर्वात लांब नद्यांच्या यादीमध्ये गोदावरी नदीचा ९२ वा क्रमांक लागतो 


गोदावरी नदीच्या उपनद्या पुढील प्रमाणे आहेत


प्रवरा नदी, मुळा नदी, दारणा नदी, 

कर्पुरा नदी, दुधना नदी, यळगंगा नदी, ढोरा नदी, कुंडलिका नदी, सिंदफणा नदी, तेरणा नदी, मनार नदी, तीरू नदी, सुकना नदी, माणेरू नदी, मंजिरा किन्नेरासानी नदी, पूर्णा नदी, मन्याड नदी, आसना नदी, सीता नदी, लेंडी नदी, वाण नदी, बिंदुसरा नदी

इंद्रावती नदी शबरी नदी

मनीर नदी

पैनगंगा ही नदी वर्धा नदीची उपनदी आहे पैनगंगा ह्या नदीवर महाराष्ट्रातील सर्वात मोठे ४ थ्या क्रमांकाचे इसापूर हे धरण आहे 

वर्धा आणि वैनगंगा ह्या नद्या एकत्र मिळून गोदावरी नदीला मिळतात गोदावरीला मिळण्या अगोदर च्या प्रवाहाला प्राणहिता नदी असे म्हणतात 


गोदावरी नदीवरील तसेच तिच्या उपनद्यांवरील धरणे पुढील प्रमाणे आहेत 


गंगापूर धरण हे नाशिक जिल्ह्यात आहे, 

नंदूर मधमेश्वर हे धरण गोदावरी आणि कडवा या दोन नद्यांच्या संगमावर आहे 

जायकवाडी धरण औरंगाबाद जिल्यात आहे

श्रीराम सागर धरण तेलंगणा राज्यातील निज़ामाबाद जिल्यात आहे

येल्लंपल्ली धरण तेलंगणा राज्यातील करीमनगर जिल्यात आहे

डोलेश्वरम ब्रिज आंध्रप्रदेश राज्यातील राजमुंदरी येथे आहे


कश्यपी नदीवरील   कश्यपी धरण, 

आळंदी  नदीवरील  आळंदी धरण

पालखेड, ओझरखेड, कारंजवन,  वाघेड, पुणेगाव, हि धरणे कडवा नदीवर

 दारणा,  अप्पर वैतरणा, मुकणे,  हि धरणे दारणा नदीवर

अप्पर घाटघर, भंडारदरा, निळवंडे, हि धरणे प्रवरा नदीवर

मुळा धरण मुळा नदीवर 

सिंदफणा नदीवरील माजलगाव धरण 

खडकपूर्णा,  येलदरी, सिद्धेश्वर,  हि धरणे पूर्णा नदीवर

दुधना धरण दुधना नदीवर ही पूर्णा नदीची उपनदी नदीवर

निझाम सागर धरण, सिंगूर धरण मंजिरा नदीवर

अप्पर आणि लोअर पूस ही  धरणे पूस ह्या पैनगंगेचा उपनदीवर आहेत 

अरुणावती धरण पैनगंगेची उपनदी अरुणावती नदीवर 

वैनगंगा नदीवरील गोसीखुर्द हे मोठे आणि महत्त्वाचे धरण आहे

सिरपूर, पुजारीटोला हि धरणे वैनगंगेची उपनदी बाग नदीवर 

नळ-दमयन्ती सागर  म्हणजेच अप्पर वर्धा , लोअर वर्धा,  बेंबाला ही  धरणे  वर्धा नदीवर आहे

पेंच आणि तोतलाडोह हि धरणे वैनगंगेच्या उपनद्यांवर बांधलेली आहेत 

बावनथड़ी (राजीव सागर) हे धरण बावनथड़ी नदीवर

कडेम धरण तेलंगणा राज्यातील कडेम नदीवर


गोदावरी नदीकिनारी पुढील शहरे आहेत 

१२ ज्योतिर्लिंगांपैकी एक त्र्यंबकेश्वर हे ज्योतिर्लिंग नाशिक जिल्ह्यात गोदावरी नदी तीरावर आहे 

नाशिक शहर 

कोपरगाव शहर 

पैठण हे पौराणिक शहर 

गंगाखेड शहर 

नांदेड शहर 

राजमुंदरी शहर 


मित्रांनो तुम्हाला माहित आहे कि कृष्णा नदी आणि गोदावरी नदी उगमापासून स्वतंत्र पणे  बंगालच्या उपसागरास मिळतात पण आंध्रप्रदेश सरकार ने ह्या दोन्ही नद्यांचा  कृत्रिमरीत्या संगम घडवून आणला आहे त्या प्रकल्पास पट्टीसीमा प्रकल्प असे म्हणतात 

पट्टीसीमा हा प्रकल्प २०१६ साली पूर्ण झाला ह्या प्रकल्पासाठी १६६० कोटी रुपये खर्च आला 

हा कॅनॉल १६० किलोमीटरचा प्रवास करत विजयवाडा शेजारील पवित्रसंगमम येथे कृष्णा नदीला मिळतो 

पोलावरम प्रकल्प हा गोदावरी नदीवर एक महाकाय प्रकल्प चालू आहे 

तो २०२१ मध्ये पूर्ण होण्याची अपेक्षा आहे





Godavari 668

Painganga 495

Vardha 455

Bhima 451

Vainganga 295

Krushna 282

Tapi 208


भारतातील सर्वात ज्यास्त वीजनिर्मिती करणारे 10 जलविद्युत प्रकल्प

 नमस्कार मित्रांनो आज आपण भारतातील सर्वात ज्यास्त वीजनिर्मिती करणारे 10 जलविद्युत प्रकल्प आणि त्यासाठी बांधलेली धरणे पाहणार आहोत 

जगामध्ये भारताचा जलविद्युत निर्मिती करणाऱ्या देशाच्या यादी मध्ये  सातवा क्रमांक येतो 

भारतात तब्बल ४७०५७ मेगावॉट इतकी वीजनिर्मिती जलविद्युत प्रकल्पांद्वारे केली जाते 



10 नागार्जुन सागर धरण जलविद्युत प्रकल्प

भारतातील सर्वात ज्यास्त वीजनिर्मिती करणाऱ्या जलविद्युत प्रकल्पांच्या यादीमध्ये  १० व्या क्रमांकाचा प्रकल्प आहे नागार्जुन सागर जलविद्युत प्रकल्प

हा प्रकल्प तेलंगणा आणि आंध्रप्रदेश ह्या दोन राज्यांचा सीमेवर हैद्राबाद शहरापासून १५२ किलोमीटर अंतरावर आहे 

हे धरण बांधण्याची संकल्पना इंग्रजांच्या काळात १९०३ मध्ये केली होती

नागार्जुन सागर धरणाच्या बांधकामाचे भूमिपूजन भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी हस्ते १९५५ मध्ये करण्यात आहे 

ह्या धरणाचे बांधकाम १९६६ मध्ये पूर्ण करण्यात आले 

नागार्जुन सागर धरणाचे उदघाटन तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हस्ते झाले 

नागार्जुन सागर धरण कृष्णा नदीवर बांधण्यात आलेले आहे 

याधरणाची उंची 124 मीटर  म्हणजे 407 फूट आहे 

या धरणाची लांबी 1550 मीटर  म्हणजे 5085 फूट आहे 

या धरणाची पाणी साठवण्याची क्षमता ४०७ टीएम सी आहे 

याधरणावर ११० मेगावॉट चा १ आणि १००.८ मेगावॉट चे ७ टर्बाईन बसवलेले आहेत त्यावरून एकूण ८१६ मेगावॉट इतकी वीजनिर्मिती केली जाते त्यामुळे हा प्रकल्प भारतातील सर्वात मोठा १० व्या क्रमांकाचा  जलविद्युत प्रकल्प आहे 




 9.पंडोह धरण जलविद्युत प्रकल्प

भारतातील सर्वात ज्यास्त वीजनिर्मिती करणाऱ्या जलविद्युत प्रकल्पांच्या यादीमध्ये  9 व्या क्रमांकाचा प्रकल्प आहे पंडोह धरण जलविद्युत प्रकल्प

हे धरण हिमाचल राज्यात मंडी जिल्ह्यात आहे 

पंडोह धरण बीस किंवा व्यास ह्या नदीवर आहे 

ह्या धरणाचे बांधकाम 1977 मध्ये पूर्ण करण्यात आले 


याधरणाची उंची 76 मीटर  म्हणजे 249 फूट आहे 

या धरणाची लांबी 255 मीटर  म्हणजे 837 फूट आहे 

या धरणाची पाणी साठवण्याची क्षमता 1.45 टीएम सी आहे 

याधरणावर 165 मेगावॉट चे 6 टर्बाईन बसवलेले आहेत त्यावरून एकूण 990 मेगावॉट इतकी वीजनिर्मिती केली जाते त्यामुळे हा प्रकल्प भारतातील सर्वात मोठा 9 व्या क्रमांकाचा  जलविद्युत प्रकल्प आहे 




8. इंदिरा सागर  धरण जलविद्युत प्रकल्प

भारतातील सर्वात ज्यास्त वीजनिर्मिती करणाऱ्या जलविद्युत प्रकल्पांच्या यादीमध्ये  8 व्या क्रमांकाचा प्रकल्प आहे 

इंदिरा सागर  धरण

हे धरण मध्यप्रदेश राज्यात खंडवा जिल्ह्यात आहे 


इंदिरा सागर  धरण नर्मदा  ह्या नदीवर बांधण्यात आलेले आहे

ह्या धरणाचे बांधकाम 1984 ते 2005 मध्ये पूर्ण करण्यात आले 


याधरणाची उंची 92 मीटर  म्हणजे 302 फूट आहे 

या धरणाची लांबी 653 मीटर  म्हणजे 2142 फूट आहे 

या धरणाची पाणी साठवण्याची क्षमता 430.84 टीएम सी आहे 

इंदिरा सागर याधरणावर 125 मेगावॉट चे 8 टर्बाईन बसवलेले आहेत त्यावरून एकूण 1000 मेगावॉट इतकी वीजनिर्मिती केली जाते त्यामुळे हा प्रकल्प भारतातील सर्वात मोठा 8 व्या क्रमांकाचा  जलविद्युत प्रकल्प आहे 





7.  शरावती धरण जलविद्युत प्रकल्प

भारतातील सर्वात ज्यास्त वीजनिर्मिती करणाऱ्या जलविद्युत प्रकल्पांच्या यादीमध्ये  7 व्या क्रमांकाचा प्रकल्प आहे 

शरावती धरण जलविद्युत प्रकल्प

शिवमोगा जिल्हा,

हा प्रकल्प कर्नाटक राज्यात शिवमोगा जिल्ह्यात आहे 


शरावती प्रकल्प शरावती  ह्या नदीवर बांधण्यात आलेले आहे

हा प्रकल्प लिंगनामाकी धरणापासुन पुढे एक कृत्रिम जलाशय बनवला आहेत त्याचे नाव तलकालले जलाशय आहे 

ह्या जलाशयातून हा प्रकल्प बनवला आहे १० पाईप द्वारे ह्या जलाशयातून खालील बाजूला पाणी सोडण्यात येते त्या द्वारे वीजनिर्मिती केली जाते 

हा प्रकल्प जोग धबधब्या पासून साधारण १० किलोमीटर अंतरावर आहे 


लिंगनामाकी धरण ह्या धरणाचे बांधकाम 1964 मध्ये पूर्ण करण्यात आले 


याधरणाची उंची 193 मीटर  म्हणजे 633. फूट आहे 

या धरणाची लांबी 2400 मीटर  म्हणजे 7874 फूट आहे 

या धरणाची पाणी साठवण्याची क्षमता 151.75 टीएम सी आहे 

शरावती याधरणावर 103.5 मेगावॉट चे 10 टर्बाईन बसवलेले आहेत त्यावरून एकूण 1035 मेगावॉट इतकी वीजनिर्मिती केली जाते त्यामुळे हा प्रकल्प भारतातील सर्वात मोठा 7 व्या क्रमांकाचा  जलविद्युत प्रकल्प आहे 




6. भाकरा धरण जलविद्युत प्रकल्प

भारतातील सर्वात ज्यास्त वीजनिर्मिती करणाऱ्या जलविद्युत प्रकल्पांच्या यादीमध्ये  6 व्या क्रमांकाचा प्रकल्प आहे 

भाकरा धरण जलविद्युत प्रकल्प

हे धरण पंजाब आणि हिमाचल प्रदेश ह्या दोन राज्यांच्या सीमेवर आहे  

भाकरा नांगल धरण सतलज  ह्या नदीवर बांधण्यात आलेले आहे

ह्या धरणाचे बांधकाम 1948 ते 1963 मध्ये पूर्ण करण्यात आले 


याधरणाची उंची 226 मीटर  म्हणजे 741 फूट आहे 

या धरणाची लांबी 520 मीटर  म्हणजे 1700 फूट आहे 

या धरणाची पाणी साठवण्याची क्षमता 339.76 टीएम सी आहे 

भाकरा याधरणावर 108 मेगावॉट चे 5 टर्बाईन आणि 157 चे 5 टर्बाईन बसवलेले आहेत त्यावरून एकूण 1325 मेगावॉट इतकी वीजनिर्मिती केली जाते त्यामुळे हा प्रकल्प भारतातील सर्वात मोठा 6 व्या क्रमांकाचा  जलविद्युत प्रकल्प आहे 





5 सरदार सरोवर धरण जलविद्युत प्रकल्प

भारतातील सर्वात ज्यास्त वीजनिर्मिती करणाऱ्या जलविद्युत प्रकल्पांच्या यादीमध्ये  5 व्या क्रमांकाचा प्रकल्प आहे 

सरदार सरोवर धरण जलविद्युत प्रकल्प


हे धरण गुजरात राज्यात नर्मदा जिल्ह्यात आहे 

सरदार सरोवर धरण नर्मदा  ह्या नदीवर बांधण्यात आलेले आहे

ह्या धरणाचे बांधकाम 1987 ते 2017 मध्ये पूर्ण करण्यात आले 


सरदार सरोवर याधरणाची उंची 163 मीटर  म्हणजे 535 फूट आहे 

या धरणाची लांबी 1210 मीटर  म्हणजे 3970 फूट आहे 

या धरणाची पाणी साठवण्याची क्षमता 335.41 टीएम सी आहे 

सरदार सरोवर याधरणावर 200 मेगावॉट चे 6 टर्बाईन आणि 50 चे 5 टर्बाईन बसवलेले आहेत त्यावरून एकूण 1450 मेगावॉट इतकी वीजनिर्मिती केली जाते त्यामुळे हा प्रकल्प भारतातील सर्वात मोठा 5 व्या क्रमांकाचा  जलविद्युत प्रकल्प आहे 



4 नाथपा झाकरी धरण जलविद्युत प्रकल्प

भारतातील सर्वात ज्यास्त वीजनिर्मिती करणाऱ्या जलविद्युत प्रकल्पांच्या यादीमध्ये  4 थ्या  क्रमांकाचा प्रकल्प आहे 

नाथपा झाकरी धरण जलविद्युत प्रकल्प


हे धरण हिमाचल प्रदेश राज्यात आहे  

नाथपा झाकरी धरण सतलज  ह्या नदीवर बांधण्यात आलेले आहे

ह्या धरणाचे बांधकाम 1993 ते 2004 मध्ये पूर्ण करण्यात आले 


याधरणाची उंची 67.5 मीटर  म्हणजे 221 फूट आहे 

या धरणाची लांबी 185 मीटर  म्हणजे607 फूट आहे 

नाथपा झाकरी या धरणाची पाणी साठवण्याची क्षमता 121.13 टीएम सी आहे 


नाथपा झाकरी  याधरणावर 250 मेगावॉट चे 6 टर्बाईन बसवलेले आहेत त्यावरून एकूण 1500 मेगावॉट इतकी वीजनिर्मिती केली जाते त्यामुळे हा प्रकल्प भारतातील सर्वात मोठा 4 थ्या क्रमांकाचा  जलविद्युत प्रकल्प आहे 





3 श्रीशैलम धरण जलविद्युत प्रकल्प

भारतातील सर्वात ज्यास्त वीजनिर्मिती करणाऱ्या जलविद्युत प्रकल्पांच्या यादीमध्ये  3 ऱ्या   क्रमांकाचा प्रकल्प आहे 

श्रीशैलम धरण जलविद्युत प्रकल्प


हा प्रकल्प तेलंगणा आणि आंध्रप्रदेश ह्या दोन राज्यांचा सीमेवर आहे


श्रीशैलम धरण कृष्णा  ह्या नदीवर बांधण्यात आलेले आहे

ह्या धरणाचे बांधकाम 1960 ते 1981 मध्ये पूर्ण करण्यात आले 


याधरणाची उंची 145.10 मीटर  म्हणजे 476 फूट आहे 

या धरणाची लांबी 512 मीटर  म्हणजे 1680 फूट आहे 

श्रीशैलम या धरणाची पाणी साठवण्याची क्षमता 216 टीएम सी आहे 


श्रीशैलम याधरणावर 150 मेगावॉट चे 6 टर्बाईन आणि 110 चे 7 टर्बाईन बसवलेले आहेत त्यावरून एकूण 1670 मेगावॉट इतकी वीजनिर्मिती केली जाते त्यामुळे हा प्रकल्प भारतातील सर्वात मोठा 4 थ्या क्रमांकाचा  जलविद्युत प्रकल्प आहे 






2. कोयना धरण जलविद्युत प्रकल्प

भारतातील सर्वात ज्यास्त वीजनिर्मिती करणाऱ्या जलविद्युत प्रकल्पांच्या यादीमध्ये 2 ऱ्या  क्रमांकाचा प्रकल्प आहे


कोयना धरण जलविद्युत प्रकल्प


हा प्रकल्प महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यात आहे 

कोयना हे धरण कृष्णेची उपनदी कोयना ह्या नदीवर बांधण्यात आलेले आहे 


ह्या धरणाचे बांधकाम 1956 ते 1964 मध्ये पूर्ण करण्यात आले 


कोयना याधरणाची उंची 103.2 मीटर  म्हणजे 339 फूट आहे 

या धरणाची लांबी 807.2 मीटर  म्हणजे 2648 फूट आहे 

कोयना या धरणाची पाणी साठवण्याची क्षमता 105 टीएम सी आहे 


कोयना याधरणावर 20 मेगावॉट चे 2 टर्बाईन 

70 मेगावॉट चे 4 टर्बाईन

75 मेगावॉट चे 4 टर्बाईन

80 मेगावॉट चे 4 टर्बाईन

250 मेगावॉट चे 4 टर्बाईन

असे एकूण 10

टर्बाईन बसवलेले आहेत त्यावरून एकूण 1960 मेगावॉट इतकी वीजनिर्मिती केली जाते त्यामुळे हा प्रकल्प भारतातील सर्वात मोठा सध्याचा पहिल्या क्रमांकाचा  जलविद्युत प्रकल्प आहे 

तेहरी प्रकल्प जेव्हा पूर्ण क्षमतेने काम करेल तेव्हा कोयना २ ऱ्या क्रमांकावर येईल 



  1. टिहरी धरण धरण जलविद्युत प्रकल्प

भारतातील सर्वात ज्यास्त वीजनिर्मिती करणाऱ्या जलविद्युत प्रकल्पांच्या यादीमध्ये ल्या क्रमांकाचा प्रकल्प आहे

टिहरी धरण धरण जलविद्युत प्रकल्प


टिहरी धरणाचा जगातील सर्वात उंच धरणांच्या यादीमध्ये ११ वा क्रमांक लागतो

हे धरण भारत देशातील उत्तराखंड राज्यातील तेहरी गढ़वाल जिल्ह्यातील नवीन टिहरी शहराजवळ बांधलेले आहे 

तेहरी हे धरण भारतातील सर्वात मोठ्या गंगा नदीची उपनदी भागीरथी ह्या नदीवर बांधण्यात आलेले आहे 

हे धरण १९७८ ते २००६ दरम्यान बांधण्यात आलेले आहे 


हे धरण दिल्ली शहरापासून ३२२ किलोमीटर अंतरावर आहे 

हे धरण देहरादून शहरापासून 112 किलोमीटर अंतरावर आहे 

हे धरण ऋषिकेश शहरापासून 84 किलोमीटर अंतरावर आहे 

टिहरी हे धरण भारतातील सर्वात उंच धरण आहे 


 तेहरी धरणाची उंची 260.5 मीटर म्हणजे फूट 855 आहे 

या धरणाची लांबी 575 मीटर म्हणजे 1,886 फूट आहे  


धरणाची पाणी साठवण्याची क्षमता 139.39 टी एम सी म्हणजेच 139390 दशलक्ष घनफूट आहे 


टिहरी धरणाच्या जलाशयाला रामतीर्थ  सागर म्हणतात

टिहरी धरण हे टिहरी विकास परियोजने मधील  एक धरण आहे

या परी योजनेतील कोटेश्वर हे दुसरे धरण आहे 

हे धरण टिहरी पासून पुढील बाजूस काही अंतरावर आहे 


ही परियोजना पूर्ण झाल्यावर २४०० मेघा व्हॅट इतकी वीजनिर्मिती केली जाणार आहे त्यापैकी सध्या च्या टिहरी धरणावरून १००० मेघा व्हॅट वीजनिर्मिती केली जाते तर कोटेश्वर धरणांमधून ४०० मेघा व्हॅट वीजनिर्मिती केली जाते

आणि अजून १००० मेघा व्हॅट क्षमतेचे टिहरी पंप प्रकल्पाचे काम सुरु आहे 

हे धरण सध्या टी एच डी सी कंपनी च्या ताब्यात आहे     

त्यांचा सांगण्या नुसार हा प्रकल्प डिसेंबर २०२२ पर्यंत पूर्ण होईल


सध्या ह्या धरणा चा वीजनिर्मिती मध्ये भरतामध्ये ५ वा क्रमांक येतो पण ह्याचे पूर्ण काम झाल्यावर हे धरण भारतातील सर्वातज्यस्त म्हणजे २४०० मेगावॉट इतकी वीजनिर्मिती करणारे देशातील पहिल्या क्रमांकाचे धरण किंवा हा प्रकल्प येईल


>छत्रपती शिवाजी महाराज: एक परस्परसंवादी गाथा

छत्रपती शिवाजी महाराज: एक परस्परसंवादी गाथा ...