🚩दरेकर घराण्याचा इतिहास 🚩
ऐतिहासिक कार्य:- कऱ्हे पठारावरील अनेक कर्तबगार घराण्याप्रमाणे दरेकर घराणे शिवकाळापासून सरदारकी करून कार्यरत होते. शिवाजी महाराजांच्या हशम मावळे पायदळाचे सरदारांच्या यातील दरेकरांचे चार सरदार होते. १)गणोजी दरेकर 2) येसाजी दरेकर (3) बाळाजीराव (बाजीराव) दरेकर (4) राणोजी दरेकर यांचे वारस सुभानजी, गोरखोजी, मानाजी ,गोरोजी यांना अनेक गावांचे मोकासे होते.
छत्रपती शाहू महाराजांनी सयाजी दरेकर यांना भोसरे, वडखळ, लोणी, महिमानगड, वर्धन गड तसेच खटाव
खातगुन आणि सुभान जी दरेकर यांना आंबळे हे वतन दिले होते
दरेकर हे शाहूंच्या दरबारात हरी मोरेश्वर राजाज्ञा यांच्या सैन्यात शिलेदार होते. महाड च्या ठाण्यावर बंदोबस्तास बालकोजीराव यांना ठेवल्याचा उल्लेख आढळतो.
*इ. स. १७५६ मध्ये कर्नाटकातील कड्डपावर केलेल्या स्वारीपासून खंडेराव दरेकर यांचे नाव विशेष प्रसिद्धीस आले*
*कड्डपाचा नवाब मजीद खान याने खंडणी देण्यास नकार दिल्यामुळे सप्टेंबर १७५७ रोजी मराठ्यांनी किल्ल्यावर मोर्चे लावले*
*यावेळी पाऊस असतानाही, मराठ्यांच्या बाजूने सरदार खंडेराव दरेकर यांनी पराक्रमाची शर्थ केली.*
*व मराठ्यांनी कड्डपा घेतला या युद्धात माजीदखान गोळी लागून ठार झाला*
*यानंतर पानिपतच्या हालचाली सुरु झाल्या या मोहिमेत तरुण दादाजी दरेकर यांच्या नेतृत्वाखाली दरेकरांचे पथक होते.*
*ते भाऊसाहेब पेशव्यांच्या अनेक सल्लामसलती मध्ये सहभागी होते पानिपतावर पराक्रमाची शर्थ करून दादाजी दरेकर यांनी* *पानिपतावर देह ठेवला.*
*इतिहासामध्ये प्रसिद्ध असलेले बारभाई (मराठा मंडळातील प्रमुख १२ सरदार) यात, दरेकर हे बारभाईकडे वळले होते.*
*नारायणराव यांच्या वधानंतर*
*राघोबादादा आणि यांच्यात संघर्ष सुरू झाला. राघोबादादाचा पाठलाग सेनापती फडके यांनी केला, याच वेळी राघोबादादांच्या*
*सरदारांनी आता राघोबा दादांच्या बरोबर जाण्यात अर्थ नाही असा सांगावा केला,*
*त्यानंतर सरलष्कर खंडेराव दरेकर ,बजाबा पुरंदरे, अप्पा मेहंदळे हे सगळे आपापले सैन्य व तोफा घेऊन तापी तीरावर चांगदेव या*
*गावी हरिपंत फडके यांना येऊन मिळाले.*
खंडेराव दरेकर हे १७६८ ते १७९२ या पेशवे काळात २४ वर्ष सरलष्कर होते
*खंडेराव दरेकर यांचा शिक्का श्री खंडेराव दरेकर पानिपतच्या युद्धात मृत्यू पावलेल्या दादजी दरेकर यांचे नातू, व सयाजी दरेकर यांचे पुत्र होते*
*||श्री चरणी तत्पर सयाजीसुत खंडेराव सरलष्कर || सन १७९५ मध्ये निजामा बरोबर झालेल्या खर्ड्याच्या लढाईत खंडेराव दरेकर *यांचे सुपुत्र हनुमंतराव दरेकर यांनी पराक्रम केला*
*खंडेराव दरेकर यांनी पिसाळलेल्या हत्तीपासून माधवराव पेशवे यांचा जीव वाचवला पेशवे काळातच पानिपत, खर्डा, उदगीर, राक्षसभुवन, कर्नाटक खान्देश येथे झालेल्या मराठ्यांच्या लढायात प्रमुख सरदारमध्ये दरेकर यांचा समावेश होता. दरेकर यांचा सरंजाम:- दरेकरांकडे इसवीसन सतराशे ९५ मध्ये एक लक्ष सोळा हजार ८५ रुपयांचा सरंजाम होता. यामध्ये त्यांच्याकडे मामले बीड व पाथरी येथील चौथाई अंमल आणि पुणे प्रांतातील आंबळे हा गाव इनाम मौजे जळगाव, उंडवडी तालुका बारामती तसेच नायगाव तालुका पुरंदर या तीन गावांचा मोकासा भडोच येथील अंबड पैकी चौथाई अमक, माळवा सागर परभणी येथील तरेपरड इत्यादी गावातील एकूण सरंजाम होता.*
दरेकर यांचा वाडा:- आजही आंबळे येथे सरदार दरेकर यांचा ऐतिहासिक वाडा आहे वाडा उत्तराभिमुख असून त्याची उंची 25 फूट आहे प्रवेशद्वाराची कमान आजही भक्कम स्थितीत असून शीसम लाकडाचा दरवाजा आहे. गडी सासवड पासून 16 किलोमीटर वर आहे वाड्याच्या दरवाज्या शेजारी दोन बुरुज असून समोरील बाजूस नगारखाना व दुमजली वाडा आहे वाड्याचे बुरुज व तटबंदी आजही मोठ्या प्रमाणात शिल्लक आहे येथे तळघरात भाले आणि तलवारी सापडल्या त्या पुरातत्व खात्याकडे जमा केल्या, तळघरात ध्यानमंदिर आहे दगडी कारंजे सापडले ते आजही मुख्य दरवाज्यात ठेवले आहे.
देऊळवाडा :
*मुख्य वाड्याच्या समोर पूर्वेस विस्तृत जागेत काही मंदिरे असून त्यांच्या भोवती तटबंदी होती प्रथम तुळजाभवानी व श्रीराम मंदिर लागते यातील मूर्ती पेशव्यांनी दरेकरांना दिल्या आहेत श्रीराम मंदिराच्या बाजूस श्री विष्णू व लक्ष्मी यांची गरुडा रूढ अशी एकत्र सुंदर व दुर्मिळ संगमरवरी मूर्ती आहे*
*अशाप्रकारे मराठेशाहीचे जहाज तरण्यासाठी व रक्षणासाठी दरेकर यांचे मोठे योगदान आढळते*
|| जय भवानी जय शिवराय ||
माहिती संकलन
सरदार दरेकर घराणे
स्वराज्य रथ आयोजक
सचिन वसंत दरेकर
प्रशांत अरविंद दरेकर
अश्विनी सूरज दरेकर
Comments
Post a Comment