Skip to main content

पुरंदर किल्ला

पुरंदर किल्ला 

स्वराज्यातील एक महत्वाचा किल्ला म्हणजेच पुरंदर किल्ला 

स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराजांचे जन्मस्थान म्हणजेच पुरंदर किल्ला 


पुरंदर हा किल्ला पुणे शहरापासून 41 किलोमीटर अंतरावर तसेच हा किल्ला सासवड ह्या तालुक्याच्या ठिकाणापासून 15 किलोमीटर अंतरावर आहे


पुरंदर ह्या किल्ल्याचे सर्वात मोठे ऐतिहासिक महत्त्व म्हणजे या किल्यावर स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज यांचा  जन्म झाला होता


सह्याद्रीच्या दक्षिणोत्तर पसरलेल्या मूळ रांगेतून काही फाटे पूर्व दिशेकडे फुटले आहेत.


त्यापैकी एक फाटा २४ किलोमीटर अंतरावर भुलेश्वर पर्यंत बसलेला आहे 

त्याच फाट्यावर  सिंहगड, पुरंदर, वज्रगड वसलेले आहेत


पुरंदर किल्यावर पुण्याहून जाण्यासाठी कात्रज, बापदेव, आणि दिवे या घाटातून पुरंदरच्या पायथ्याशी जात येते 

किल्ल्याच्या चौफेर माच्या आहेत. 


पुरंदरच्या वायव्येला 42  किलोमीटर अंतरावर सिंहगड किल्ला तसेच पश्चिमेला 54 किलोमीटर अंतरावर   राजगड आणि 60 किलोमीटर अंतराव तोरणा किल्ला हे किल्ले आहेत.


पुरंदर किल्ला तसा विस्ताराने मोठा आहे. किल्ला मजबूत असून बचावाला जागा उत्तम आहे. गडावर मोठी शिबन्दी राहू शकते. दारुगोळा व धान्याचा मोठा साठा करून गड दीर्घकाळ लढवता येऊ शकत असे. एक बाजू सोडली तर गडाच्या इतर सर्व बाजू दुर्गम आहेत. गडावरून सभोवारच्या प्रदेशावर बारीक नजर ठेवता येते.


हा किल्ला सन १४८९ च्या सुमारास निजामशाही चा सरदार मलिक अहमद याने जिंकून घेतला. पुढे शके १५५० मध्ये तो आदिलशाहीत आला. इ.स. १६४९ मध्ये आदिलशहाने शहाजीराजांना कैदेत टाकले. त्याच वेळी शिवाजी महाराजांनी अनेक आदिलशाही किल्ले आपल्या ताब्यात घेतले. म्हणून शिवरायांचा बन्दोबस्त करण्यासाठी आदिलशहाने फत्तेखानास रवाना केले. परिस्थिती फारच बिकट होती. एकीकडे आपले वडील कैदेत होते तर दुसरीकडे फत्तेखानाच्या स्वारीमुळे स्वराज्य धोक्यात येणार होते. महाराजांनी यावेळी लढाईसाठी पुरंदर किल्ल्याची जागा निवडली. मात्र यावेळी गड मराठ्यांच्या ताब्यात नव्हता. महादजी निळकण्ठराव यांच्या ताब्यात किल्ला होता. त्यांच्या भावाभावांमधील भांडणाचा फायदा उठवून महाराजांनी किल्ल्यात प्रवेश करण्यात यश मिळवले. या पुरंदर किल्ल्याच्या साहाय्याने मराठ्यांनी फत्तेखानाशी झुंज दिली आणि लढाई जिंकली. शिवाजी महाराजांना या पहिल्या लढाईतच मोठे यश प्राप्त झाले. सन १६५५ मध्ये शिवाजीराजांनी नेताजी पालकर यास गडाचा सरनौबत नेमले. १४ मे १६५७ गुरुवार या दिवशी संभाजी राजांचा जन्म पुरंदरावर झाला. छत्रपती संभाजी महाराजांनी नखशिखांत, नायिकाभेद, सातशतक व बुधभूषण हे ग्रन्थ लिहिले. 

पुरंदरचा तह

सन १६६५ मध्ये मोगल सरदार मिर्झाराजा जयसिंहने पुरंदरला वेढा घातला.

दिलेरखानाने वज्रगड ताब्यात घेतला तसेच पुरंदरावर हल्ला केला आणि पुरंदर माचीचा ताबा घेतला. माचीवर खानाचे आणि मुरारबाजीचे घनघोर युद्ध झाले. मुरारबाजी पडले आणि त्याच बरोबर पुरंदरही पडला. हे वर्तमान जेव्हा राजांना कळले तेव्हा त्यांनी जयसिंहाशी तहाचे बोलणे सुरू केले आणि ११ जून १६६५ साली इतिहासप्रसिद्ध 'पुरंदरचा तह' झाला. यात २३ किल्ले राजांना मोगलांना द्यावे लागले. त्यांची नावे अशी,



८ मार्च १६७० मध्ये निळोपन्त मुजुमदाराने किल्ला स्वराज्यात आणला. संभाजी राजांच्या मृत्यूनन्तर किल्ला औरंगजेबाने जिंकला व त्याचे नाव 'आजमगड' ठेवले. 

पुढे मराठ्यांच्या वतीने शंकराजी नारायण सचिवांनी मोगलांशी भांडून पुरंदर घेतला.. इ.स. १८१८ मध्ये इंग्रजांनी गड आपल्या ताब्यात घेतला.

गडावरील पाहण्यासारखी ठिकाणे

बिनी दरवाजा: पुरंदर माचीवरील हा एकमेव दरवाजा. 

पुरंदरेश्वर मन्दिर: हे मन्दिर महादेवाचे आहे. 

रामेश्वर मन्दिर: पुरंदरेश्वर मन्दिराच्या मागील कोपर्‍यात पेशवे वंशाचे रामेश्वर मन्दिर आहे.

दिल्ली दरवाजा: हा उत्तराभिमुख दरवाजा आहे

खन्दकडा: दिल्ली दरवज्यातून आत शिरल्यावर डावीकडे एक कडा थेट पूर्वेकडे गेलेला दिसतो. हाच तो खन्दकडा. 

पद्मावती तळे: मुरारबाजींच्या पुतळ्यापासून पुढे गेल्यावर पद्मावती तळे लागते.

शेन्दर्‍या बुरूज: पद्मावती तळ्याच्या मागे बालेकिल्ल्याच्या वायव्येस, तटबन्दीच्या बरोबरीने एक बुरूज बान्धला आहे. त्याचे नाव शेन्दर्‍या बुरूज.

केदारेश्‍वर: केदार दरवाजा पाहून मूळ वाटेने १५ मिनिटे चालून गेल्यावर काही पायर्‍या लागतात. त्या आपल्याला थेट केदारेश्‍वर मन्दिरापर्यंत घेऊन जातात. पुरंदरचे मूळ दैवत म्हणजे केदारेश्‍वर. 

पुरंदर माची: आल्या वाटेने माघारी फिरून दिल्ली दरवाज्यातून जाणार्‍या वाटेने थेट पुढे यावे म्हणजे आपण माचीवरील भैरवखिण्डीत जाऊन पोहोचतो. वाटेत वाड्याचे अनेक अवशेष दिसतात.

भैरवगड: याच खिण्डीतून वज्रगडावर जाण्यासाठी वाट आहे. खिण्डीत शिवाजी महाराजांचा पुतळा आहे. या खिण्डीपर्यन्त गाडी रस्ता आलेला असल्याने त्या रस्त्यावरून गेल्यावर वाटेतच उजवीकडे राजाळे तलाव लागतो. पुरंदरमाचीवर याच तलावाचे पाणी वापरले जाते.

वीर मुरारबाजी: बिनी दरवाजातून आत शिरल्यावर उजवीकडे गेल्यावर समोरच मुरारबाजीचा पुतळा दिसतो. इ.स. १९७० मध्ये हा पुतळा उभा केला आहे.

गडावर जाण्याच्या वाटा

  • सासवड वरून नारायणपूर मार्गे गडावर जातायेते

  • पुणे सातारा हायवे वरील कापूरहोळ गावातून २० किलोमीटर अंतरावर पुरंदर किल्ला आहे 

येथे जाताना कोणतेही ओळखपत्र घेऊन जावे (आधार ,पॅन पत्र, मतदान ओळखपत्र इत्यादी)



Comments

Popular posts from this blog

भारतातील आणि जगातील धरणे

******   भारतातील आणि जगातील धरणे    ******** जगातील   सर्वात   मोठी ५    धरणे (संपूर्ण विडिओ पाहण्यासाठी फोटोवर क्लिक करा)  जगातील   सर्वात   मोठे   धरण   करिबा   (संपूर्ण विडिओ पाहण्यासाठी फोटोवर क्लिक करा)  भारतातील सर्वात मोठी ५ धरणे (संपूर्ण विडिओ पाहण्यासाठी फोटोवर क्लिक करा)           इंदिरा   सागर   धरण                                  सरदार   सरोवर   धरण                                   रिहंद   धरण                              भाख्रा   नागल   धरण                                नागार्जुन सागर धरण   इडुक्की   धरण (संपूर्ण विडिओ पाहण्यासाठी फोटोवर क्लिक करा)                                    महाराष्ट्र सर्वात मोठी 5 धरणे (संपूर्ण विडिओ पाहण्यासाठी फोटोवर क्लिक करा)  कोयना   धरण                   उजनी   धरण                   जायकवाडी   धरण           तोतलाडोह धरण                ईसापूर   धरण घोसेखुर्द   धरण पुणे जिल्यातील २८ धरणे      पुणे   जिल्ह्याती    धरणे    फुल्ल           पुणे   जिल्ह्याती   धरणे भाग २           पुणे   जिल्ह्याती धरण भाग   १      ——————————— पुणे   ध

भारतातील सर्वात उंच 6 धरणे

             भारतातील सर्वात उंच 6 धरणे Click here for 👉 youtube video नमस्कार मित्रांनो आज आपण भारतातील सर्वात उंच 6 धरणे पाहणार आहोत    6 श्रीशैलम धरण 6 श्रीशैलम धरण भारतातील सर्वात उंच धरणांच्या यादी मध्ये सहाव्या क्रमांकाचे धरण आहे श्रीशैलम   हे धरण आंध्र प्रदेश राज्यातील कर्नुल जिल्ह्यात आहे भारतातील सर्वात ज्यास्त वीजनिर्मिती करणाऱ्या प्रकल्पांच्या यादीमध्ये  श्रीशैलम धरणाचा  3 रा क्रमाला येतो  हे धरण तेलंगणा आणि आंध्रप्रदेश ह्या दोन राज्यांचा सीमेवर आहे श्रीशैलम धरण कृष्णा  ह्या नदीवर 1960 ते 1981 साली बांधण्यात आलेले आहे याधरणाची उंची 145.10 मीटर  म्हणजे 476 फूट आहे  या धरणाची लांबी 512 मीटर  म्हणजे 1680 फूट आहे  श्रीशैलम या धरणाची पाणी साठवण्याची क्षमता 308 टीएम सी असून हे भारतातील ६ व्या क्रमांकाचे सर्वात ज्यास्त  पाणीसाठा असलेले धरण आहे  श्रीशैलम याधरणावर 1670 मेगावॉट इतकी वीजनिर्मिती केली जाते त्यामुळे हा प्रकल्प भारतातील सर्वात मोठा 4 थ्या क्रमांकाचा  जलविद्युत प्रकल्प आहे  श्रीशैलम मल्लिकार्जुन हे १२ ज्योतिर्लिंग मधील २ रे ज्योतिर्लिंग आहे  तसेच ह्याठिकाणाचे अ

सीदोजी राजेनिंबाळकरांचा गुमठ वडगाव निंबाळकर

 बारामती मधील छत्रपती राजाराम महाराज यांचा महाराष्ट्रातील प्रथम शिलालेख  तसेच औरंगजेब बादशहा वडगाव निंबाळकर शाखा नवीन वंशावळ  वडगाव निंबाळकर समाधी लेख   हा शिलालेख पुणे जिल्ह्यातील बारामती  तालुक्यातील (कोऱ्हाळे  ) जवळ असलेल्या  मौजे वडगाव निंबाळकर  गावातील  गावाच्या वस्ती  बाहेर असलेल्या एका वैयक्तिक निंबाळकर घराण्याच्या शेताच्या बांधावर असलेल्या घुमटाच्या समाधी वर प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला कोरलेला आहे .घुमटाचा आकार भव्य मोठा असून त्यावर चोहो बाजूने नक्षी काम केलेले आहे गाभाऱ्यात  शिवपिंडी असून आतमध्ये काही देवकोष्ठ कोरलेली आहेत .शिलालेख खोदीव स्वरूपाचा असून ३५ ओळीचा पुरवणी सह दोन भागात विभागाला गेला असून शुद्ध मराठी भाषेत आहेत काळाच्या ओघात शिलालेखाची अक्षरे झिजलेली असून पुसट झालेली आहेत.  गावाचे  नाव : वडगाव निंबाळकर   ता.बारामती  , जि. पुणे   शिलालेख वाचन  शके १६१५ श्रीमुख नाम संवछरे मार्गेश्वर शु  घ प्रतिपदेस गुमठ समाप्त. विठोजी राजे निंबाळकर.  मोकादम मौजे वडगाव त्या ची स्त्री रखमाआवा(बाई) त्या  चे पुत्र संताजीराजे त्या  ची स्त्री गुणाआवा(बाई) त्याचे पुत्र सिदोजीराजे त्या ची