बारामती मधील छत्रपती राजाराम महाराज यांचा महाराष्ट्रातील प्रथम शिलालेख तसेच औरंगजेब बादशहा वडगाव निंबाळकर शाखा नवीन वंशावळ वडगाव निंबाळकर समाधी लेख हा शिलालेख पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यातील (कोऱ्हाळे ) जवळ असलेल्या मौजे वडगाव निंबाळकर गावातील गावाच्या वस्ती बाहेर असलेल्या एका वैयक्तिक निंबाळकर घराण्याच्या शेताच्या बांधावर असलेल्या घुमटाच्या समाधी वर प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला कोरलेला आहे .घुमटाचा आकार भव्य मोठा असून त्यावर चोहो बाजूने नक्षी काम केलेले आहे गाभाऱ्यात शिवपिंडी असून आतमध्ये काही देवकोष्ठ कोरलेली आहेत .शिलालेख खोदीव स्वरूपाचा असून ३५ ओळीचा पुरवणी सह दोन भागात विभागाला गेला असून शुद्ध मराठी भाषेत आहेत काळाच्या ओघात शिलालेखाची अक्षरे झिजलेली असून पुसट झालेली आहेत. गावाचे नाव : वडगाव निंबाळकर ता.बारामती , जि. पुणे शिलालेख वाचन शके १६१५ श्रीमुख नाम संवछरे मार्गेश्वर शु घ प्रतिपदेस गुमठ समाप्त. विठोजी राजे निंबाळकर. मोकादम मौजे वडगाव त्या च...
नमस्कार मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनेल आहे आणि ह्या ब्लॉग मार्फत आपणास टेक्स्ट आणि विडिओ स्वरूपात माहिती देण्याचा प्रयत्न आहे