Search This Blog

Saturday, 18 November 2023

भारतातील सर्वात उंच 6 धरणे

            भारतातील सर्वात उंच 6 धरणे Click here for 👉 youtube video



नमस्कार मित्रांनो आज आपण भारतातील सर्वात उंच 6 धरणे पाहणार आहोत 


 
6 श्रीशैलम धरण


6 श्रीशैलम धरण

भारतातील सर्वात उंच धरणांच्या यादी मध्ये सहाव्या क्रमांकाचे धरण आहे श्रीशैलम  

हे धरण आंध्र प्रदेश राज्यातील कर्नुल जिल्ह्यात आहे


भारतातील सर्वात ज्यास्त वीजनिर्मिती करणाऱ्या प्रकल्पांच्या यादीमध्ये  श्रीशैलम धरणाचा  3 रा क्रमाला येतो 

हे धरण तेलंगणा आणि आंध्रप्रदेश ह्या दोन राज्यांचा सीमेवर आहे


श्रीशैलम धरण कृष्णा  ह्या नदीवर 1960 ते 1981 साली बांधण्यात आलेले आहे


याधरणाची उंची 145.10 मीटर  म्हणजे 476 फूट आहे 

या धरणाची लांबी 512 मीटर  म्हणजे 1680 फूट आहे 


श्रीशैलम या धरणाची पाणी साठवण्याची क्षमता 308 टीएम सी असून हे भारतातील ६ व्या क्रमांकाचे सर्वात ज्यास्त  पाणीसाठा असलेले धरण आहे 


श्रीशैलम याधरणावर 1670 मेगावॉट इतकी वीजनिर्मिती केली जाते त्यामुळे हा प्रकल्प भारतातील सर्वात मोठा 4 थ्या क्रमांकाचा  जलविद्युत प्रकल्प आहे 


श्रीशैलम मल्लिकार्जुन हे १२ ज्योतिर्लिंग मधील २ रे ज्योतिर्लिंग आहे 

तसेच ह्याठिकाणाचे अजून एक महत्व म्हणजे इ सण 1677 मध्ये छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा दक्षिण दिग्वियाच्या स्वरासाठी गेले होते तेव्हा त्यांनी ह्या मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंग ह्याठिकाणी आवर्जून भेट दिली होती तसे काही दिवस मुक्काम हि केला होता 

ह्यापरिसरात छत्रपती शिवाजी महाराजांचे एक मंदिर देखील बांधण्यात आलेले आहे 


^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^
5 रणजित सागर धरण




5 रणजित सागर धरण

भारतातील सर्वात उंच धरणांच्या यादी मध्ये पाचव्या क्रमांकाचे धरण आहे रणजित सागर धरण 

हे धरण जम्मू आणि काश्मीर आणि पंजाब ह्या दोन राज्यांच्या सीमेवर असून 

हे पंजाबमधील पठाणकोट आणि जम्मू काश्मीरमधील कठुआ जिल्ह्यात येते 


रणजित सागर धरण रावी  ह्या नदीवर 1981 ते 2000 साली बांधण्यात आले



याधरणाची उंची 147 मीटर  म्हणजे 482 फूट आहे 

या धरणाची लांबी 617 मीटर  म्हणजे 2024 फूट आहे 


या धरणाची पाणी साठवण्याची क्षमता 115.83 टीएम सी आहे 


याधरणावर 600 मेगावॉट इतकी वीजनिर्मिती केली जाते


^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^

4 सरदार सरोवर धरण


4 सरदार सरोवर धरण


भारतातील सर्वात उंच धरणांच्या यादी मध्ये चौथ्या क्रमांकाचे धरण आहे सरदार सरोवर धरण

हे धरण गुजरात राज्यात नावागाम शेजारी आहे


हे धरण भारतातील सर्वात ज्यास्त पाणीसाठ्यामध्ये तसेच उंचीमध्ये देखील ४था क्रमांकावर आहे 


हे धरण नर्मदा नदीवर 1987 ते 2017 साली बांधण्यात आले


याधरणाची उंची 163 मीटर  म्हणजे 534 फूट आहे 

या धरणाची लांबी 1210 मीटर  म्हणजे 3969 फूट आहे 


या धरणाची पाणी साठवण्याची क्षमता 335.49 टीएम सी आहे 


याधरणावर 1450 मेगावॉट इतकी वीजनिर्मिती केली जाते





^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^

 

इडुक्की (Eb)/इडुक्की आर्क



इडुक्की (Eb)/इडुक्की आर्क


भारतातील सर्वात उंच धरणांच्या यादी मध्ये ३ ऱ्या क्रमांकाचे धरण आहे इडुक्की धरण 


इडुक्की (Eb)/इडुक्की आर्क


हे धरण केरळ राज्यात इडुक्की जिल्ह्यात आहे


हे धरण पेरियार नदीवर 1963 ते 1976 साली बांधण्यात आले


याधरणाची उंची 169.00 मीटर  म्हणजे 554 फूट आहे

या धरणाची लांबी 365.85 मीटर  म्हणजे 1200 फूट आहे 


या धरणाची पाणी साठवण्याची क्षमता 70.5 टीएम सी आहे 


याधरणावर 780 मेगावॉट इतकी वीजनिर्मिती केली जाते



^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^

2 भाक्रा धरण


2 भाक्रा धरण


भारतातील सर्वात उंच धरणांच्या यादी मध्ये दुसऱ्या क्रमांकाचे धरण आहे भाक्रा धरण 

हे धरण हिमाचल प्रदेश राज्यात बिलासपूर जिल्ह्यात आहे


हे धरण भारतातील सर्वात ज्यास्त पाणीसाठ्यामध्ये ५ व्या तसेच उंचीमध्ये 2 ऱ्या क्रमांकावर आहे 


हे धरण सतलज नदीवर 1948 ते 1963 साली बांधण्यात आले


याधरणाची उंची 225.55 मीटर  म्हणजे 739 फूट आहे 

या धरणाची लांबी 518.18 मीटर  म्हणजे 1700 फूट आहे 


या धरणाची पाणी साठवण्याची क्षमता 339.76 टीएम सी आहे 


याधरणावर 1325 मेगावॉट इतकी वीजनिर्मिती केली जाते



^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^

तेहरी (टिहरी) धरण



तेहरी (टिहरी) धरण

भारतातील सर्वात उंच धरणांच्या यादी मध्ये पहिल्या क्रमांकाचे धरण आहे तेहरी (टिहरी) धरण


हे धरण उत्तराखंड राज्यातील तेहरी गढ़वाल जिल्ह्यातील नवीन टिहरी शहराजवळ बांधलेले आहे 



तेहरी हे धरण भारतातील सर्वात मोठ्या गंगा नदीची उपनदी भागीरथी ह्या नदीवर 

१९७८ ते २००६ दरम्यान बांधण्यात आलेले आहे


याधरणाची उंची 260.50 मीटर  म्हणजे 855  फूट आहे

या धरणाची लांबी 575 मीटर  म्हणजे 1,886 फूट आहे


धरणाची पाणी साठवण्याची क्षमता 125 टी एम सी आहे


याधरणावर 1000 मेगावॉट इतकी वीजनिर्मिती केली जाते

भविष्यात ह्यधरणाची एकूण वीजनिर्मिती क्षमता २४०० मेगावॉट इतकी होणार आहे


>छत्रपती शिवाजी महाराज: एक परस्परसंवादी गाथा

छत्रपती शिवाजी महाराज: एक परस्परसंवादी गाथा ...