नमस्कार मित्रांनो! आज आपण पुण्यातील एका अद्भुत आणि भव्य ठिकाणी आलो आहोत. हे ठिकाण म्हणजे BAPS श्री स्वामीनारायण मंदिर! हे मंदिर पुणे शहरातील सर्वात मोठे मंदिर आहे हे मंदिर नऱ्हे गावाशेजारी आंबेगाव बुद्रुक मध्ये पुणे बंगलोर हायवे शेजारी आहे पूर्ण माहितचा व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा स्वामी नारायण मंदिर, पुणे व्हिडिओ हे मंदिर बघून तुम्ही नक्कीच थक्क व्हाल! हे केवळ 24 महिन्यांत बांधले गेले आहे आणि त्याची भव्यता बघण्यासारखी आहे. श्रीस्वामीनारायण यांना समर्पित असलेले हे विलक्षण सुंदर मंदिर फेब्रुवारी २०१७ मध्ये पूर्ण झाले ह्या मंदिराचा परिसर खूपच स्वच्छ आणि छान आहे संध्याकाळच्या वेळी हे मंदिर अत्यंत सुंदर दिसते या मंदिराची सर्वात खास गोष्ट म्हणजे ते पूर्णपणे दगडात कोरलेले आहे, त्यात स्टीलचा वापर अजिबात केलेला नाही. मंदिरात गुलाबी सँडस्टोन आणि लाल दगड वापरलेले दिसतात राजस्थानमधील कुशल कारागिरांनी ही सुंदर शिल्पकला तयार केली आहे. मंदिराची रचना प्रसिद्ध सोमपुरा स्थापत्यशैलीत केली आहे. इथे 140 कोरीव खांब, 109 सुंदर तोरण आणि 10,269 हून अधिक कोरीव शिल्पे आणि मूर्ती आहेत, ...
श्री क्षेत्र तुळापूर: शौर्य, श्रद्धा आणि बलिदानाचा त्रिवेणी संगम पूर्ण माहितचा व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा तुळापूर व्हिडिओ महाराष्ट्राच्या मातीत इतिहासाच्या अनेक पाऊलखुणा दडलेल्या आहेत. त्यापैकीच एक महत्त्वाचं स्थान म्हणजे तुळापूर. जिथे शौर्य, श्रद्धा आणि बलिदानाचा त्रिवेणी संगम पाहायला मिळतो. भीमा, भामा आणि इंद्रायणी नद्यांच्या संगमावर वसलेल्या या पवित्र भूमीला ऐतिहासिक आणि धार्मिक महत्त्व आहे. तुळापूरचं मुख्य आकर्षण म्हणजे संगमेश्वर मंदिर. यादव आणि मराठा स्थापत्यशैलीचा उत्कृष्ट नमुना असलेलं हे शिवमंदिर १६३३ मध्ये सरदार मुरार जगदेव यांनी बांधलं. मंदिरातील कोरीव खांब, नंदीमंडप आणि शांत वातावरण मनाला शांती देतं. महाशिवरात्री आणि त्रिपुरी पौर्णिमेला येथे मोठी यात्रा भरते. या त्रिवेणी संगमावर स्नान केल्याने पुण्य मिळतं, अशी भाविकांची श्रद्धा आहे. अनेक साधुसंतांनी येथे तपश्चर्या केली आहे. संगमावर दानधर्म केल्याने हजारो पटींनी पुण्य मिळतं, असं मानलं जातं. १६८९ साली याच पवित्र भूमीवर स्वराज्याचे दुसरे छत्रपती, धर्मवीर संभाजी महाराजांनी आपल्या प्राणांचं बलिदान दिलं. औरंगजेबाने त्यांना...