Search This Blog

Monday, 29 January 2018

सिंहगड

सिंहगड
हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे.
पुण्याच्या नैर्ऋत्येला साधारण २५ कि.मी अंतरावर असणारा हा किल्ला समुद्रसपाटीपासून सुमारे ४४०० फूट उंच आहे. सह्याद्रीच्या पूर्व शाखेवर पसरलेल्या भुलेश्वराच्या रांगेवर हा गड आहे. दोन पायऱ्यासारखा दिसणारा खंदकाचा भाग आणि दूरदर्शनचा उभारलेला मनोरा यामुळे पुण्यातून कुठूनही तो लक्ष वेधतो.. पुरंदर, राजगड, तोरणा, लोहगड, विसापूर, तुंग असा प्रचंड मुलुख या गडावरून दिसतो.
याचे आधीचे नाव कोंढाणा. पूर्वी हा किल्ला आदिलशाहीत होता. [[दादोजी कोंडदेव]] हे आदिलशहाकडून सुभेदार म्हणून नेमले होते. पुढे इ.स. १६४७ मध्ये गडावर आपले लष्करी केंद्र बनवले. पुढे [[इ.स. १६४९]] मध्ये शहाजी राजांच्या यांच्या सुटकेसाठी शिवाजी राजांनी हा किल्ला परत आदिलशहाला दिला. पुरंदरच्या तहात जे किल्ले मोगलांना दिले त्यामध्ये कोंडाणापण होता. मोगलांतर्फे उदेभान राठोड हा कोंडाण्यावरचा अधिकारी होता. हा मूळचा राजपूत पण नंतर मुसलमान झाला होता.


पुणे दरवाजा
सिंहगडचे मूळ नाव कोंढाणा होते आणि [[छत्रपती शिवाजी महाराज|शिवाजी महाराजांच्या]] काळात त्यांचे विश्वासू सरदार आणि बालमित्र तानाजी मालुसरे आणि त्यांच्या मावळ्यांनी(मावळ प्रांतातून भरती झालेल्या सैनिकांनी) हा किल्ला एका चढाई दरम्यान जिंकला. या लढाईत तानाजींना वीरमरण आले आणि प्राणाचे बलिदान देऊन हा किल्ला जिंकल्यामुळे शिवाजी महाराजांनी "गड आला पण सिंह गेला" हे वाक्य उच्चारले. पुढे त्यांनी गडाचे कोंडाणा हे नाव बदलून सिंहगड असे ठेवले. सिंहगड हा मुख्यतः तानाजी मालुसरे यांच्या बलिदानामुळे प्रसिद्ध आहे.

पहा सिंहगडाची लढाई


आजचा सिंहगड
या युद्धाबाबत सभासद

बखरीत खालीलप्रमाणे उल्लेख आहे.
तानाजी मालुसरा म्हणून हजारी मवळियांचा होता. त्याने कबूल केले की, 'कोंडाणा आपण घेतो', असे कबूल करून वस्त्रे, विडे घेऊन गडाचे यत्नास ५०० माणूस घेऊन गडाखाली गेला. आणि दोघे मावळे बरे, मर्दाने निवडून रात्री गडाच्या कड्यावरून चढवले. गडावर उदेभान रजपूत होता. त्यास कळले की, गनिमाचे लोक आले. ही खबर कळून कुल रजपूत कंबरकस्ता होऊन, हाती तोहा बार घेऊन, हिलाल (मशाल), चंद्रज्योती लावून बाराशे माणूस तोफाची व तिरंदाज, बरचीवाले, चालोन आले. तेव्हा मावळे लोकांनी फौजेवर रजपुतांचे चालून घेतले. मोठे युद्ध एक प्रहर झाले. पाचशे रजपूत ठार जाले. उदेभान किल्लेदार खाशा त्याशी व तानाजी मालुसरा यांशी गाठ पडली. दोघे मोठे योद्धे, महशूर, एक एकावर पडले. तानाजीचे डाव्या हाताची ढाल तुटली. दुसरी ढाल समयास आली नाही. मग तानाजीने आपले डावे हाताची ढाल करून त्याजवर वोढ घेऊन, दोघे महरागास पेटले. दोघे ठार झाले. मग सूर्याजी मालुसरा (तानाजीचा भाऊ), याने हिंमत धरून, कुल लोक सावरून उरले राजपूत मारिले. किल्ला काबीज केला.
शिवाजी महाराजांना गड जिंकल्याची पण तानाजी पडल्याची बातमी मिळाली तेव्हा ते म्हणाले, 'गड आला, पण सिंह गेला'.
माघ वद्य नवमी दि. ४ फेब्रुवारी १६७२ च्या रात्री हे युद्ध झाले.

सिंहगडावरील माहितीफलकानुसार[संपादन]
सिंहगडाचे मूळचे नाव कोंढाणा, इसामी नावाच्या कवीने फुतुह्स्सलातीन किंवा शाहनामा-इ-हिंद या फार्शी काव्यात (इ. १३५०) मुछ्म्द तुघलकाने इ.१६२८ मध्ये कुंधीयाना किल्ला घेतल्याची माहिती येते. त्यावेळेस हा किल्ला नागनायक नावाच्या कोळ्याच्या ताब्यात होता.
अहमदनगरच्या निजामशाही कारकिर्दीतील कोंढाण्याचे उल्लेख इ.१४८२, १५५३, १५५४ व १५६९ च्या सुमारसचे आहेत. इ.१६३५ च्या सुमारास कोंढाण्यावर सीडी अवर किल्लेदार असताना मोगल व आदिलशाह यांनी मिळून कोंढाणा घेतला. यावेळेस (इ.१६३६) आदिलशाहचा खजिना डोणज्याच्या खिंडीत निजामाचा सरदार मुधाजी मायदे याने लुटला.
शहाजी राज्यांच्या काळात सुभेदार दादोजी कोंडदेव मालवणकर यांच्या ताब्यात कोंढाणा असल्याचा उल्लेख आदिलशाही फर्मानात आहे.
दादोजी कोंडदेव आदिलशाहीचे नोकर असले तरी ते शहाजी राजांशी एकनिष्ठ असल्याने शिवाजी राजांनी त्यांच्या मृत्यूपर्यंत (इ.१६४७) कोंढाणा घेण्याचा प्रयत्‍न केला नाही. त्यानंतर लगेचच हा गड राजांनी ताब्यात घेतला.
इतिहासकार श्री.ग.ह. खरे यांच्या मते तानाजी प्रसंग घडण्यापूर्वीच कोंढाण्याचे नाव 'सिंहगड' झाल्याचे कागदोपत्री पुरावे आहेत. कै.ह.ना. आपटे यांच्या कादंबरीतील मात्र तानाजी प्रसंगानंतर या किल्ल्याचे नाव सिंहगड झाले असा उल्लेख आहे..
शिवाजी राजांच्या काळात व त्यानंतर हा किल्ला कधी मराठ्यांकडे तर कधी मोगलांकडे ताब्यात होता.
गडावरील ठिकाणे[संपादन]
दारूचे कोठार : दरवाजातून आत आल्यावर उजवीकडे जी दगडी इमारत दिसते तेच दारू कोठार. दि. ११ सप्टेंबर १७५१ मध्ये या कोठारावर वीज पडली. ह्या अपघातात गडावरील त्यावेळच्या फडणिसांचे घर उद्‌ध्वस्त होऊन घरातील सर्व माणसे मरण पावली.

टिळक बंगला : रामलाल नंदराम नाईक यांच्याकडून खरेदी केलेल्या जागेवरच्या ह्या बंगल्यात बाळ गंगाधर टिळक येत असत. १९१५ साली महात्मा गांधी व लोकमान्य टिळक यांची भेट याच बंगल्यात झाली.

कोंढाणेश्वर : हे मंदिर शंकराचे असून ते यादवांचे कुलदैवत होते. आत एक पिंडी व सांब असणारे हे मंदिर यादवकालीन आहे.

श्री अमृतेश्वर भैरव मंदिर' : कोंढाणेश्वराच्या मंदिरावरून थोडे पुढे गेले की डावीकडे हे अमृतेश्वराचे प्राचीन मंदिर लागते. भैरव हे कोळ्यांचे दैवत आहे. यादवांच्या आधी ह्या गडावर कोळ्यांची वस्ती होती. मंदिरात भैरव व भैरवी अशा दोन मूर्ती दिसतात. भैरवाच्या हातात राक्षसाचे मुंडके आहे.

देवटाके : तानाजी स्मारकाच्या मागून डाव्या हाताच्या छोटा तलावाच्या बाजूने डावीकडे गेल्यावर हे प्रसिद्ध असे देवटाके लागते. या टाक्याचा उपयोग पिण्याचे पाणी म्हणून होत असे व आजही होतो. महात्मा गांधी जेव्हा पुण्यास येत तेव्हा मुद्दाम ह्या टाक्याचे पाणी मागवत असत.

कल्याण दरवाजा : गडाच्या पश्चिमेस हा दरवाजा आहे. कोंढणपूरवरून पायथ्याच्या कल्याण गावातून वर आल्यास ह्या दरवाजातून आपला प्रवेश होतो. हे एकामागोमाग असे दोन दरवाजे आहेत. यापैकी वरच्या दरवाज्याच्या दोन्हीकडील बुरुजांच्या भिंतीत अर्धवट बाहेर आलेला हत्ती व माहूत अशी दगडी शिल्पे होती. श्रीशालिवाहन शके १६७२ कारकीर्द श्रीमंत बाळाजी बाजीराव पंडित प्रधान असा शिलालेख आढळतो.

उदेभानाचे स्मारक : दरवाजाच्या मागच्या बाजूस वर असलेल्या टेकडीवर यावे. येथे जो चौकोनी दगड आहे तेच उदेभान राठोडचे स्मारकचिन्ह म्हणून ओळखले जाते. मोगलांतर्फे उदेभान हा सिंहगडचा अधिकारी होता. झुंजारबुरूज : झुंजारबुरूज हे सिंहगडचे दक्षिण टोक होय. उदयभानूच्या स्मारकापुढून समोरची टेकडी उतरून या बुरुजावर येता येते. येथून समोरच टोपीसारखा राजगड, त्याच्याच उजवीकडे तोरणा हे गड दिसतात तर खाली पानशेतचे खोरे दिसते. पूर्वेकडे लांबवर पुरंदर दिसतो.

डोणगिरीचा उर्फ तानाजी कडा : झुंजारबुरूजावरून मागे येऊन तटाच्या भिंतीच्या बाजूने पायवाटेने तानाजीच्या कडाकडे जाता येते. हा कडा गडाच्या पश्चिमेस आहे.येथूनच तानाजी मावळ्यांसह वर चढला.

राजाराम स्मारक : राजस्थानी पद्धतीची रंगीत देवळासारखी जी घुमटी दिसते तीच छत्रपती राजाराम महाराज यांची समाधी. मोगली फौजेला सतत ११ वर्षे टक्कर देणाऱ्याा राजाराम महाराजांचे वयाच्या अवघ्या ३०व्या वर्षी शनिवार दि.२ मार्च इ.स.१७०० या दिवशी सिंहगडावर निधन झाले. पेशव्यांतर्फे या स्मारकाची उत्तम व्यवस्था ठेवली जायची.

तानाजीचे स्मारक : अमृतेश्वराच्या मागच्या बाजूने वर गेल्यावर डाव्या बाजूस सुप्रसिद्ध तानाजीचे स्मारक दिसते. ‘तानाजी स्मारक समितीच्या’ वतीने हे बांधण्यात आले आहे. माघ वद्य नवमी दि. ४ फेब्रुवारी १६७२ या दिवशी झालेल्या लढाईत तानाजी मारला गेला. दरवर्षी माघ नवमीस येथे मंडळातर्फे तानाजीचा स्मृतिदिन साजरा केला जातो.

गडावर जाण्याच्या वाटा[संपादन]
सिंहगड हा किल्ला पुण्यापासून २० किलोमीटर अंतरावर आहे. स्वारगेट बसस्थानकापासून सारसबाग किंवा नेहरू क्रीडांगणाकडून जाणारा ह्या रस्त्याने सिंहगड अंदाजे ३५ कि.मी.वर आहे.

मार्ग
स्वारगेट - आनंदनगर - वडगांव - खडकवासला - सिंहगड पायथा.
स्वारगेट पासून ५० ते ५६ क्रमांकाच्या बस या मार्गावर धावतात. शिवाय, सहा आसनी किंवा खासगी वाहनाने सिंहगडाच्या पायथ्यापर्यंत जाता येते. ज्यांना गडावर चालत जायचे नसेल त्यांच्यासाठी पायथ्यापासून गडावर जाण्यासाठी खासगी वाहने साधारण दर ३०-६० मिनिटांनी मिळतात.


https://www.youtube.com/watch?v=DTPDKc-039Y

Wednesday, 17 January 2018

शनिवार वाडा

शनिवार वाडा

शनिवार वाडा (बोली मराठीत शनवारवाडा) ही महाराष्ट्रातील पुणे शहरातील ऐतिहासिक वास्तू आहे. इ.स.च्या १८व्या शतकात हा वाडा मराठा साम्राज्याचे पंतप्रधान, अर्थात पेशवे यांचे निवासस्थान व कार्यालय होते. भारत सरकारने शनिवारवाड्याला दिनांक १७ जून, इ.स. १९१९ रोजीमहाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेले आहे.[१]

शनिवारवाड्याच्या पायाभरणीचे काम १० जानेवारी १७३० रोजी सुरू झाले, तर २२ जानेवारी १७३२ रोजी शनिवारवाड्याची वास्तुशांत करण्यात आली. १७३२ नंतरही या वाड्यात वारंवार नवीन बांधकामे, बदल होत राहिले. बुरुजाचे दरवाजाचे काम होण्यास १७६० हे वर्ष उजाडले. १८०८, १८१२, १८१३ या वर्षी छोट्या-मोठ्या आगी लागल्याच्या नोंदी सापडतात, तर १७ नोव्हेंबर १८१७ ला वाड्यावर ब्रिटिशांचे निशाण लागले. त्यानंतर येथे काही काळ पुण्याचा पहिला कलेक्‍टर हेन्‍री डंडास रॉबर्टसन राहत होता. त्यानंतर वाड्यात तुरुंग, पंगुगृह, पोलिसांची निवासस्थाने होती. १८२८ मध्ये वाड्यास मोठी आग लागली व आगीत बहुतेक सर्व इमारती जळाल्या. पुढे तब्बल ९० वर्षांनी वाड्याची दुरवस्था संपण्याचा योग आला. १९१९ मध्ये वाडा संरक्षित स्मारक म्हणून जाहीर झाला व वाड्याचे उत्खनन करण्यास सुरुवात झाली. त्या काळी वाड्यात कोर्टासाठी वापरण्यात येणारी इमारत १९२३पूर्वी उत्खननासाठी पाडण्यात आली.
शनिवारवाड्यासंबंधी अनेक घटना, दुर्घटना आहेत. वाड्यातील पेशव्यांच्या कार्यालयात अनेक वीर आणि मुत्सद्दी येत. राजकारणाचे येथे फड रंगत; पेशव्यांचा दरबार येथेच होता. पेशव्यांच्या घरांतील मुलामुलींची लग्ने याच वाड्यात होत. शनिवारवाड्यासमोरील पटांगणात मोहिमेला जाणारे सैन्य जमे. पुढे जाहीर सभा होऊ लागल्या. आचार्य अत्र्यांनी संयुक्त महाराष्ट्राची चळवळ याच पटांगणातून लढवली. वाड्याच्या पटांगणातील मारुतीस सभामंडप होता. हे मंदिर लॉइड्ज पूल (हल्लीचा नवा पूल किंवा शिवाजी पूल) बांधणार्‍या केंजळ्यांनी बांधले. मंदिरात १९ मार्च १९२४ रोजी मारुतीची मूर्ती बसविण्यात आली. हा मारुती बटाट्या मारुती म्हणून प्रसिद्ध आहे.

इमारत[संपादन]

शनिवारवाड्याची इमारत २१ फूट उंच होती आणि चारही बाजूने एकूण ९५० फूट लांबीची तटबंदी भिंत होती. ही भिंत आणि बुरूज आजही पुण्यातील मध्यवस्तीत दिमाखाने उभे आहेत. वाड्याभोवतालच्या भिंतीला पाच मोठे दरवाजे व नऊ बुरूज आहेत. येथून जवळच मुठा नदी वाहते. तटाला ९ बुरूज असून सर्वांवर तोफा बसवण्याची सोय केलेली आहे. यांपैकी 'पागेचा बुरूज' आतून पोकळ असून त्याच्या पायथ्याशी मध्यभागी बांधून काढलेला एक गोल खड्डा आहे. त्यात तोफांचे गोळे ठेवत असत संदर्भ हवा ]. तटबंदीला पाच दरवाजे असून त्यांना अनुक्रमे दिल्लीअलीबहाद्दार किंवा मस्तानीखिडकीगणेशनाटकशाळा ऊर्फ जांभूळ दरवाजा ही नावे आहेत. सर्व दरवाजे टोकदार कमानींमधे असून मोठे अणुकुचीदार लोखंडी खिळे व जाडजूड पट्ट्या ठोकून ते भक्कम केलेले आहेत. यांत दिल्ली दरवाज्याची उंची २१ फूट असून रुंदी १४ फूट आहेसंदर्भ हवा ]. हाच सर्वांत मोठा दरवाजा आहे. वाड्याच्या सर्व तटांवर मिळून २७५ शिपाई, रात्रंदिवस ५०० स्वार व वाड्यातील अंतर्गत बंदोबस्तासाठी १०००हून अधिक नोकर होतेसंदर्भ हवा ].
दिल्ली-दरवाज्यावर नगारखाना आहे. आगीच्या प्रलयातून वाचलेला अस्सल पेशवेकालीन शाबूत असलेला भाग हा एवढाचसंदर्भ हवा ]. देवडीच्या भिंतीवर शेषशायी विष्णू, गणपती या दैवतांची चित्रे काढली आहेत. ती आता बरीच खराब झाली आहेत. वाड्याच्या आतल्या भागांमध्ये काय चालले आहे, हे बाहेरच्या माणसांना दिसू नये म्हणून दिल्ली दरवाजा, देवडी आणि आतला चौक नागमोडी रचनेत आहे.
एक मुसलमान सरदार पत्रात लिहितो: "बाहेरून पाहता वाडा नरकासारखा भासतो. मात्र आत स्वर्गासारखा दिसतो."संदर्भ हवा ].

गणेश रंगमहाल[संपादन]

शनिवारवाड्यातील गणेश रंगमहाल हा नानासाहेब पेशव्यांनी १७५५मध्ये बनवून घेतला. गणेशोत्सव भव्य दिव्य प्रमाणात साजरा करता यावा हा त्यामागचा उद्देश होता. येथे एका वेळीशंभर नर्तकी नृत्य करू शकत असत. महालाच्या एका टोकाला सोन्याचा पत्रा असलेली संगमरवरी गणेशमूर्ती होती, तर दुसर्‍या टोकाला कारंजी व सुंदर फुलबाग होती. फुलांचा सुगंध व कारंज्यांचा नाद यामुळे महालात बसणे हा सुखद अनुभव असे..

सांगलीचे कवी साधुदास यांनी केलेले शनिवारवाड्याचे वर्णन[संपादन]

, वैद्यखाना, कबूतरखाना, कोठी इत्यादी कारखान्यांची योजना वेगवेगळ्या चौकांतून करण्यात आली होती. कात्रज येथे तलाव बांधून त्यातून पाणी शहरात आणून ते वाड्यात सर्वत्र खेळविले होते. वर्णन सांगलीचे प्रसिद्ध कवि साधुदास यांनी आपल्या ‘पौर्णिमा’ नामक कादंबरीत केले आहे. त्यावरून वाड्याचे समग्र चित्र डोळ्यांसमोर उभे रहाते. "सभोवार एक प्रचंड तट राखून वाड्याचे बांधकाम केले होते. वाड्याकरिता आणि भोवतालच्या बागेकरिता मिळून तीन बिघ्याहून अधिक जागा गुंतली होती. वाडा उत्तराभिमुख असून त्याला एकंदर पाच दरवाजे होते. उत्तरेकडेचा दिल्ली दरवाजा, ईशान्येकडचा मस्तानी (अल्लीबहाद्दराचा) दरवाजा, दक्षिणेकडे आग्नेय व नैर्ऋत्य या दिशांस असलेले गणेश आणि नारायण या नावांचे दरवाजे, आणि पूर्वेचा जांभळी दरवाजा, अशा नावांनी हे दरवाजे प्रसिद्ध होते. सर्व दरवाज्यांवर अष्टौप्रहर गारद्यांचा जागता पहारा असे.
"दिल्ली दरवाजातून आत गेल्याबरोबर एक प्रचंड वाटोळा बुरूज लागे. या बुरुजाच्या माथ्यावर तोफांचा गोल रचला होता. आणि त्याच्या मध्यभागी महाराष्ट्राचे जरीपटक्याचे भगवे निशाण फडकत असे. बुरुजाच्या आत तीन मोठया कमानी असून त्या कमानींवर नगारखान्याची माडी होती. कमानींतून आत गेल्यावर एक विस्तीर्ण पटांगण लागे. या पटांगणाच्या पूर्व बाजूस व पश्चिम बाजूस दोन दोन लहान चौक असून दक्षिणेच्या बाजूस वाड्याची मुख्य इमारत होती. ही इमारत सहा मजली असून तिचे चार मोठमोठे चौक होते. आग्नेयेकडील चौकास लाल चौक असे नाव होते, पण तो बाहेरील चौक या नावानेही ओळखला जाई. नैर्ऋत्येकडील चौकास मोतीचौक असे म्हणत. त्या चौकाला बाईंचा (गोपिकाबाई) चौक असेही म्हणत. वायव्येकडील चौकास हिरकणी चौक असे नाव असून तो मधला चौक या नावाने ओळखला जात असे. शेवटच्या म्हणजे ईशान्येकडील चौकास माणिकचौक ही संज्ञा असून त्याला हौदाचा चौक म्हणत.
"या मोठया चौकांशिवाय फडाचा चौक, ताकचौक, मुदपाकचौक, पक्कान्नचौक इत्यादि अनेक पोटचौक होते. त्यांपैकी फडाचा चौक हा हिरकणी चौकात असून त्यांत पेशवे सरकारांची कचेरी भरत असे. या सर्व चौकांत मिळून गणपतीचा रंगमहाल, नानांचा दिवाणखाना, नवा आरसेमहाल, जुना आरसेमहाल, दादासाहेबांचा दिवाणखाना, थोरल्या रायांचा जुना दिवाणखाना, खाशांचा दिवाणखाना, हस्तिदंती दिवाणखाना, नारायणरावांचा महाल, अस्मानी महाल इत्यादी अनेक महाल व दिवाणखाने होते. नारायणरावांचे देवघर, रावसाहेबांचे देवघर, दादासाहेबांचे देवघर इत्यादी अनेक देवघरे होती. याशिवाय जामदारखाना, जिन्नसखाना, दप्तरखाना, पुस्तकशाळा, गोशाळा, पीलखाना, उष्ट्रखाना, शिकारखाना, शिलेखाना
"वाड्याचे सर्व चौक उत्तम चिरेबंदी बांधलेले असून त्यांच्या मध्यभागी अनेक हौद व कारंजी असत. त्यांच्यापैकी हिरकणी चौकातले हजारी कारंजे कमलाकृती असून त्याचा घेर सुमारे ऐशी फूट होता. त्त्यात सोळा पाकळया असून प्रत्येक पाकळीत सोळा याप्रमाणे सर्व पाकळ्यांत मिळून दोनशे छप्पन्न कारंजी उडण्याची सोय केली होती. वाड्याचे सुतारकाम उत्तम सागवानी लाकडाचे असून त्यांतील दिवाणखान्यांचे व महालांचे नक्षीकाम फारच प्रेक्षणीय होते. दिवाणखाने कलमदानी आकाराचे असून त्यामध्ये एक मोठा सभामंडप व चारी बाजूंस चार दालने काढलेली होती. सभामंडपाचे काम सुरूदार नक्षीचे असून त्याच्यावर नक्षीदार लाकडी कमानी होत्या. त्यांच्यावर पक्षी, फळे, वेलबुट्टी वगैरे चित्रे कोरलेली होती.. विशेषतः हिरकणी चौकांतल्या गणपती महालाचे चित्रकाम फारच प्रेक्षणीय होते. त्यांत रामायण-महाभारतातील अनेक कथांची चित्रे होती. जयपुराहून भोजराज नावाच्या चित्रकारास बोलावून आणून त्याजकडून हे चित्रकाम तयार करून घेण्यात आले होते. यावरून हा वाडा सजविण्यासाठी किती पैसा खर्च करण्यात आला असेल याचा वाचकांनी अंदाज करावा."

खजिना[संपादन]

पुण्यातील पेशवे दफ्तरात पेशव्यांच्या खजिन्याची मोजदाद दिलेली आहे. या कागदपत्रांनुसार पेशव्यांच्या शनिवारवाड्यातील रत्नशाळेत ५१४०२ हिरे, ११३५२ माणके, २७६४३ पाचू, १७६०११ मोती, ४३५ नीलम, ४३२ वैडुर्य, ४१७ पुष्कराज, ७५ गोमेद, ४४४ पोवळी, ३७८ करड्या, १५६२ पिरोजा, १९१२ करिपोला (कोरल), ४९७ लसण्या असे मौल्यवान खडे होते. यातील बहुतांशी खजिना इंग्रजांनी चोरून नेला. उरलेला खजिना दुस-या बाजीरावांनंतर त्याचा दत्तक पुत्र नानासाहेब (दुसरे) यांना मिळाला. कानपूर आणि विठूर-ब्रह्मावर्तमध्ये पराभव झाल्यानंतर त्यांना हा खजिना सोबत नेणे शक्य नव्हते. अतिमौल्यवान जडजवाहीर सोडून राहिलेला खजिना त्यांनी तेथील एका विहिरीत लपवला. इंग्रजांना हेरांकडून त्याची माहिती मिळाली. त्यांनी तो खजिना बाहेर काढला. कर्नल गॉर्डन अलेक्झांडर याने लिहून ठेवलेल्या पुस्तकात त्याचा उल्लेख आहे. त्यात ३० लाख रुपयांची सोन्या-चांदीची नाणी, ताटे, वाट्या, इतर भांडी, कित्येकशे शेर वजनाची चांदीची अंबारी आणि ७० लाख रुपयांचे दागिने, जडजवाहिरे असा एकूण एक कोटी रुपयांचा खजिना त्या वेळी ब्रिटिशांना मिळाला होता.

पुस्तके[संपादन]

शनिवारवाड्याचा इतिहास आणि अंतर्गत रचना सांगणारी अनेक पुस्तके मराठीत आहेत, त्यांतली काही अशी:-
  • पुण्याचा शनिवारवाडा : लेखक रमेश जि. नेवसे
  • पौर्णिमा (कादंबरी) : लेखक साधुदास
  • शनिवारवाडा : लेखक डॉ. गणेश हरी खरे
  • शनिवारवाडा : लेखक प्र.के. घाणेकर
  • शनवारवाडा (प्रभाकर भावे)
  • शनिवारवाडा (ललित कादंबरी) : लेखक वा.ना. शहा

  • व्हिडियो विडिओ पाहण्यासाठी खालील लिंक वर नक्की क्लिक करा 

Tuesday, 16 January 2018

पांडेश्वर मंदिर जेजुरी मोरगाव

पांडेश्वर मंदिर जेजुरी मोरगाव रस्त्यापासून पुण्यापासून 50 किमी अंतरावर आहे.
कदाचित एक मध्ययुगीन मंदिर आहे जे 10-12 व्या शतकामध्ये बांधले गेले, परंतु नंतर 18 व्या शतकात या शहराची पुनर्निर्मिती केली जशी आसपासची वास्तुशिल्पावरून दिसते.
जेजुरी मोरगाव मार्गावरील मंदिराकडे जाणारा रस्ता गडद असून हिरव्या शेतातून जातो. सासवडचा दुसरा रस्ता आहे.
कर्हा नदीजवळील अस्पष्ट गावात हे मंदिर लपलेले आहे. लोकसाहित्यानुसार, कर्हा नदी भगवान ब्रह्माच्या 'कामंदळ' या नावाने ओळखल्या जाणार्या 'कार' (कामंडलू हे पाणी साठविण्यासाठी एक लहान जहाज आहे, सामान्यत: देवदेवतांचा संबंध आहे आणि साधूंचा वापर करूनही). कर्हा नदीचे नाव या कारनामधून घेतले जाते.




लोकसाहित्य कथा पांडवस जोडते. जेव्हा पांडव या प्रदेशात राहतात तेव्हा त्यांनी महा यज्ञ (आध्यात्मिक अग्नी) करण्याची योजना आखली होती ज्यासाठी त्यांना भगवान ब्रम्हाची उपस्थिती हवी होती. प्रसंगोपात, नंतर भगवान ब्रह्मा सह्याद्री पर्वतावर ध्यान करीत होते.
भीमा, पांडव यांना पृथ्वीच्या निर्माणकर्त्याला आमंत्रित करण्याचे काम देण्यात आले, कारण यज्ञ सामर्थ्यवान बांधले भीमने सह्याद्रीस सहजपणे मोजले पण शिखरपर्यंत पोहचल्यावर तो त्याच्या विवेकबुद्धीने ब्रह्माला खोल चिंतनात विधीपूर्वक शोधून काढला.
भीमाने ईश्वरला आपल्या उत्तरातून बाहेर येण्याची आतुरतेने वाट पाहात, पण त्याचा काही उपयोग झाला नाही. म्हणून परिस्थितीची निकड लक्षात घेऊन भीमने ब्रह्माच्या कमांडलूतून ब्रह्माचे डोके वर पाणी उडवले. ब्रह्माच्या कारने वाहणार्या पाण्याने कर्हा नदी निर्माण केली.
गावकर्यांनी असाही आग्रह धरला की मंदिरास रात्री पांडवांनी बांधले. आपण हे स्पष्टपणे नमक चिमटासह घेऊ शकतो, कारण या विशिष्ट लोकसाहित्याचा महाराष्ट्रातील जवळजवळ प्रत्येक प्राचीन मंदिराशी संबंध आहे. परंतु वस्तुस्थिती ही बाब आहे की पांडवांनी पांडेश्वर असे नामकरण केल्यावर मंदिर ओळखले जाते. असेच होईल.












एक प्रवेशद्वारभोवती येतो तेव्हा, दरवाजाच्या दिशेने असलेल्या जय-विजय या दोन दगडाचे दोन दगडाचे लक्ष वेधून घेते. हे मंदिर या मंदिराच्या सर्वात आकर्षक वैशिष्ट्ये आहेत. ते सुशोभित केलेले आहेत आणि दोन्हीकडे दगड चॅट्री (छत्री) आहेत जे त्यांच्या डोक्यावर कोरलेले आहेत.





 या भिंतीमध्ये दंड स्वरूपाचे काम व कोरलेली तीर्थक्षेत्रे आहेत.
या भिंतीमध्ये काही नखे खिडक्या (एडीक्यूल्स) आहेत ज्यात देवदेवतांच्या मूर्ती (बहुतेक पार्वती अई) आहेत. लक्ष्मी आणि सरस्वती देवदेवतांच्या इतर मूर्ती आहेत.




पांडेश्वराचे मंदिर भगवान शिव यांना समर्पित आहे. लोअर स्ट्रक्चर (विशेषत: सवमंडमंडप) 10-12 व्या शतकातील असल्याचे दिसते, आणि हेमाडपंथी-यादव शैलीत, काळ्या दगडापासून बनवले आहे,
तर गर्भग्रिहावरील शिखारा देवली-नागरा शैलीतील चुना आणि मलमपट्टीतून बनवलेला आहे, तर छतासारखे खिडक्या (मेघदामबारी शैलीमध्ये) आणि देवदेवतांची मूर्ती, सर्व तेजस्वी रंगांनी रंगवलेली आहेत.





शिखारा हे स्पष्टपणे नंतर खूप नंतर केले गेले होते, किंवा नंतर नंतर (आम्ही 18 व्या शतकात गृहीत धरून) renovated. हे स्पष्ट आहे की, शिखाराची बांधकाम साहित्य सभामंडपात वापरलेल्या साहित्यापेक्षा वेगळा आहे.




स्तंभातील सभामंडप मध्ये अनेक वेदिक (नखे खिडक्या) आहेत. आधी तेथे त्यांच्यामध्ये ठेवलेल्या मूर्ती होत्या पण सध्या ते रिक्त आहेत.




गर्भग्रिहामध्ये शिवलिंगाचे अस्तित्व आहे.




श्रीमण्डपापेक्षा वेगळे बांधण्यात आलेल्या आर्केड बांधणीच्या नंदीने गणपतीची मूर्ती,




जे मंदिराभोवतालच्या वक्र वक्र जात आहे.



भिंतींवर भिंतीवर कोरलेली पौराणिक महाकाव्यंमधील काही दृश्ये आहेत.




नंदीच्या रुंदीच्या बाजूला, एका छताच्या सीडीवर टेरेस येतो. हे इंडो सारैसिनीक शैलीमध्ये बांधले गेले आहे आणि चार कोनांमध्ये चार मिनर्स आहेत जे सहसा मस्जिद तयार करतात. खरोखर निधर्मी वास्तुकला (काही लोकांनी मला सांगितले आहे की मध्ययुगीन काळातील मंदिरे मुद्दामहून अंतराने मशिदीसारखी दिसण्यासाठी डिझाइन करण्यात आली आहेत, जेणेकरून मुस्लीम सैनिकांच्या विध्वंसच्या प्रयत्नांना धिक्कारणे). येथून संपूर्ण आर्केड संरचना आणि मुख्य मंदिर शिखर पाहायला मिळते.




परंपरागत 'तुळशी वृंदावन' याशिवाय मंदिराच्या परिसरात अनेक छोट्या व लहान मंदिरेही आहेत. अशाच एका मंदिराला भगवान गणेशाला समर्पित केलेले आहे तर काही जण कुंतीला समर्पित आहेत आणि किमान चार पांडव
अज्ञात कारणास्तव पाचवा पांडव (अर्जुन) हे मंदिर नागेश्वर नावाच्या दुसर्या मंदिरातील पांडेश्वर मंदिरापासून काही किलोमीटर अंतरावर स्थित आहे.




मंदिराच्या वर कोरलेली एक चिठ्ठी असलेली एक उंच पट्टी पोस्ट आहे. कर्हा नदीचे मुळ समांतर होते.




मंदिराच्या आवारात कर्हाचे पाणी टाळण्याकरता संपूर्ण मंदिराची बांधणी आहे, विशेषत: जेव्हा त्याचे स्तर पावसाळयात उगवते.




मंदिराच्या एका कोपर्यात मोदी स्क्रिप्टमध्ये एक शिलालख (दगड शिलालेख) ठेवलेला आहे, कदाचित 'जेरनोदधार' (नूतनीकरण) तपशीलाचा उल्लेख करणे.


हा ब्लॉग जर आवडला असेल तर कॉमेंट करा आणि ह्यमंदिराचा विडिओ आमच्या युट्यूब  वर उपलब्ध आहे नक्की पहा  लिंक खाली दिली आहे 
https://www.youtube.com/watch?v=yMIUetQZ6Zk 

>छत्रपती शिवाजी महाराज: एक परस्परसंवादी गाथा

छत्रपती शिवाजी महाराज: एक परस्परसंवादी गाथा ...