नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत भारतातील सर्वात ज्यस्त क्षेत्रफळ असलेली ५ राज्य आणि त्या राज्यांची माहिती प्रथमच आपल्या मराठी भाषेत
05 जम्मू अँड काश्मीर
- ϖ भारतातील सर्वात ज्यस्त क्षेत्रफळ असलेले ५व्या क्रमांकाचे राज्य आहे जम्मू आणि काश्मीर
जम्मू आणि काश्मीर चे एकूण क्षेत्रफळ आहे २२२२३६ चौरस किलोमीटर
- ϖ जम्मू आणि काश्मीर हे भारतातील सर्वात उत्तरेकडे असलेले राज्य आहे.
या राज्याला भारताचा मुकुट असेसुद्धा म्हणतात.
या राज्याच्या पश्चिमेला पाकिस्तान तर उत्तर व पूर्व दिशांना चीन हे देश आहेत, तर दक्षिणेला हिमाचल प्रदेश हे राज्य आहे.
जम्मू-काश्मीरची लोकसंख्या १,२५,४८,९२६ एवढी आहे.
काश्मिरी व उर्दू ह्या येथील प्रमुख भाषा आहेत. राज्याची साक्षरता ६८.७४ टक्के आहे. तांदूळ, गहू व मका ही येथील प्रमुख पिके, सफरचंद हे प्रमुख फळ व पर्यटन हा येथील प्रमुख व्यवसाय आहे. काश्मीरला भारताचे नंदनवन म्हणतात.
जम्मू-काश्मीरच्या २ राजधान्या आहेत उन्हाळी काश्मीर तर हिवाळी जम्मू असते
जम्मू-काश्मीरराज्याची स्थापना २६ ऑक्टोबर १९४७ साली झाली
जम्मू-काश्मीरमध्ये एकूण २२ जिल्हे आहेत
जम्मू काश्मीर राज्याला विशेष दर्जा आहे
तेथे ३७० तसेच ३५ अ कायदा लागू आहे
जम्मू काश्मीरचा स्वतंत्र झेंडा तसेच स्वतंत्र शिक्का देखील आहे
जम्मू काश्मीर राज्याचा बराचसा भाग हा हिमालयाने व्यापलेला आहे
या भागात बऱ्याच ठिकाणी बर्फवृष्टी होते म्हणून हे राज्य पर्यटकांना नेहमीच आकाशात करते
ह्या राज्यातून बऱ्याच नद्या वाहतात त्यापैकी इंडस अर्थात आपली सिंधू झेलम सतलज चेनाब रवी ह्या प्रमुख नद्या जम्मू आणि काश्मीर मधून वाहतात
जम्मू काश्मीर राज्यात छोटी मोठी मिळून ९ धरणे आहेत
04. उत्तर प्रदेश
भारतातील सर्वातज्यस्त क्षेत्रफळ असलेले 4 थ्या क्रमांकाचे राज्य आहे उत्तर प्रदेश
उत्तर प्रदेश हे भारताचे उत्तरेकडील एक प्रमुख राज्य आहे.
उत्तर प्रदेशची लोकसंख्या १९,९५,८१,४७७ एवढी आहे. लोकसंख्येनुसार उत्तर प्रदेश भारताचे पहिल्या क्रमांकाचे राज्य ठरते. उत्तर प्रदेशाचे क्षेत्रफळ २,४०,९२८ चौरस किलोमीटर एवढे आहे.
हिंदी व उर्दु ह्या येथील प्रमुख भाषा आहेत.
लखनौ ही उत्तर प्रदेशाची राजधानी तर कानपूर हे तेथील सर्वात मोठे शहर आहे.
उत्तर प्रदेशाची साक्षरता ७९.१२ टक्के आहे.
तांदूळ, गहू, मका व डाळ ही येथील प्रमुख पिके आहेत.
उत्तर प्रदेशात लोकसभेच्या सर्वात जास्त ८० जागा आहेत. त्यामुळे राजकीयदृष्ट्याही हे राज्य अतिशय महत्वाचे समजले जाते. उत्तर प्रदेशात सर्व धर्मांची अनेक पवित्र स्थळे आहेत, त्यामुळे हे राज्य अतिशय संवेदनशील आहे.
उत्तर प्रदेश मध्ये एकूण ७५ जिल्हे आहेत
उत्तर प्रदेश मधील अलाहाबाद उच्च न्यायालय हे प्रसिद्ध आहे
उत्तर प्रदेश राज्याची स्थापन २६ जानेवारी १९५० साली झाली
उत्तर प्रदेश राज्याज्यातून गंगा यमुना घागरा तसेच गोमती ह्या प्रमुख नद्या वाहतात
उत्तर प्रदेश राज्यात एकूण छोटेमोठे मिळून ९ धरणे आहेत त्यापैकी रिहांड हे भारतातील सर्वातमोठ्या जलसाठा असलेल्या धरणांमधील ३ऱ्या क्रमांकाचे धरण आहे
आपणास भारतातील सर्वात मोठी ५ धरणे माहित नसतील तरी विडिओ च्या उजव्या बाजूला कार्ड मध्ये किंवा खाली डिस्क्रिपेंशन मध्ये लिंक आहे ती नक्की पहा
03. महाराष्ट्र
भारतातील सर्वातज्यस्त क्षेत्रफळ असलेले 3 ऱ्या क्रमांकाचे राज्य आहे महाराष्ट्र
क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्र भारतातील तिसरे व लोकसंख्येच्या बाबतीत दुसरे मोठे राज्य आहे.
महाराष्ट्र राज्याचे क्षेत्रफळ ३,०७, ७१3 चौरस किलोमीटर आहे
महाराष्ट्र हे भारतातील सर्वांत विकसनशिल राज्यांपैकी एक आहे. महाराष्ट्र राज्याची सीमा गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगढ, तेलंगणा, कर्नाटक, गोवा आणि दादरा आणि नगर-हवेली या केंद्रशासित प्रदेशांशी जोडलेली आहे. राज्याच्या पश्चिमेला अरबी समुद्राची किनारपट्टी आहे. जवळपास ११ कोटी लोकसंख्या असलेल्या महाराष्ट्राची राजधानी मुंबई आहे. मुंबईत साधारण १.८ कोटी लोक राहतात. नागपूर शहर महाराष्ट्राची उपराजधानी आहे. चीन व मध्ययुगीन महाराष्ट्र सातवाहन राजवंश राष्ट्रकूट राजवंश, पश्चिम चालुक्य, मुघल आणि मराठ्यांच्या साम्राज्याचा समावेश आहे. महाराष्ट्र हा फुले-शाहू-आंबेडकरांचा पुरोगामी महाराष्ट्र म्हणून ओळखला जातो. कारण महाराष्ट्राला या तीन समाजसुधारकांचा वैचारिक वारसा लाभलेला आहे.
महाराष्ट्र राज्याची स्थापन १ मे १९६० साली झाली
महाराष्ट्राची अधिकृत भाषा मराठी आहे
महाराष्ट्र राज्य आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेतले नाही तर महाराष्ट्राची माहिती पूर्णच होऊ शकत नाही
- ϖ महाराष्ट्राची आन बाण शान छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कर्तबगारीचा महाराष्ट्रच नव्हे तर संपूर्ण भारत देश अभिमान बाळगतो
- ϖ महाराष्ट्रात सर्वातज्यस्त म्हणजेच १८२१ छोटे मोठे मिळून डॅम आहेत
- ϖ त्यामध्ये भारतातील २ ऱ्या क्रमांकाचे सर्वातज्यस्त वीजनिर्मिती करणारे कोयना हे धारण महाराष्ट्रातच आहे तर उजनी जायकवाडी आणि अशी अनेक धरणे महाराष्ट्रात आहेत
- ϖ जगप्रसिद्ध अजेंटा वेरूळ लेणी देखील महाराष्ट्रातच आहेत महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाण पर्यटकांना आकर्षित करते
- ϖ महाराष्ट्रात 36 जिल्हे आहेत.
- ϖ महाराष्ट्रात 33 जिल्हा परिषदा, 27906 ग्रामपंचायती व 355 हून अधिक तालुके आहेत. महाराष्ट्रातील पंचायत समित्यांची संख्या 351 एवढी आहे. महाराष्ट्रात 26 महानगरपालिका आहेत
- ϖ महाराष्ट्रास 720 की.मी लांबीचा समुद्र किनारा लाभलेला आहे. महाराष्ट्र राज्याचा दक्षिणोत्तर विस्तार 720 की.मी. असून पूर्व-पश्चिम विस्तार 800 की.मी. आहे
देशातील बारा ज्योतिर्लिंगा पैकी महाराष्ट्रात पाच ज्योतिर्लिंगाचा समावेश महाराष्ट्रात होतो. पुढील पाच ज्योतिर्लिंग महाराष्ट्रात स्थित आहेत.
·भीमाशंकर------------------------------पुणे
·परळी वैज्यनाथ------------------------बीड
·औंढा नागनाथ------------------------हिंगोली
·त्र्यंबकेश्वर-----------------------------नाशिक
·घृष्णेश्वर------------------------------औरंगाबाद
महाराष्ट्रातील राष्ट्रीय उद्याने
महाराष्ट्रात पाच राष्ट्रीय उद्यानाचा समावेश होतो.
·तडोबा राष्ट्रीय उद्यान------------------------चंद्रपुर
·नवेगाव राष्ट्रीय उद्यान----------------------गोंदिया
·पेंच राष्ट्रीय उद्यान---------------------------नागपुर
·गुगामल राष्ट्रीय उद्यान---------------------अमरावती
·संजय गांधी राष्ट्रीय उद्यान-----------------बोरीवली (मुंबई)
महाराष्ट्रातील सर्वातमोठे शिखर कळसुबाई आहे
महाराष्ट्रातील पेंच राष्ट्रीय उद्यान महाराष्ट्रातील सर्वात मोठे राष्ट्रीय उद्यान आहे.
- ϖ महाराष्ट्रात छत्रपतींनी जिंकलेले व बांधलेले जवळपास ३५० किल्ले महाराष्ट्राची शोभा वाढवतात
- ϖ महाराष्ट्र राज्यातून साधारण ८२ नद्या वाहतात त्यामध्ये गोदावरी कृष्णा ह्या प्रमुख २ नद्या स्वतंत्रपने बंगालच्या उपसागरास जाऊन मिळतात
कृष्णा नदीच्या उपनद्या डाव्या बाजूच्या भीमा, दिंडी, पेड्डावेगु, मुशी, पालेरू, मुन्नेरू तसेच उजव्या बाजूच्या वेण्णा कोयना पंचगंगा दूधगंगा ह्या प्रमुख नद्या महाराष्ट्रातुन वाहतात
गोदावरी नदीच्या उपनद्या डाव्या बाजूच्या बाणगंगा कावडा शिवना पूर्णा कडम प्राणहिता इंद्रावती
उजव्या बाजूच्या नासर्डी दारणा प्रवरा सिंदफणा मंजिऱ्या ह्या देखील नद्या महाराष्ट्रातुन वाहतात
02. मध्यप्रदेश
भारतातील सर्वातज्यस्त क्षेत्रफळ असलेले 2 ऱ्या क्रमांकाचे राज्य आहे मध्यप्रदेश
- ϖ मध्यप्रदेश राज्याचे एकूण क्षेत्रफळ आहे 3,08, 245 चौरस किलोमीटर
- ϖ मध्यप्रदेश हे भारत देशामधील क्षेत्रफळानुसार दुसऱ्या क्रमांकाचे राज्य आहे व २०११ च्या जनगणनेनुसार लोकसंख्येत ६ व्या क्रमांकावर आहे. ह्याला भारताचे ह्रदय देखील म्हटले जाते, कारण ते भारत देशाच्या मध्यावर आहे. मध्य प्रदेशात वाघांची संख्या भारतात सर्वाधिक आहे. म्हणून या राज्याला टायगर स्टेट या नावाने सुद्धा ओळखले जाते. फार फार पूर्वी अवंती महाजनपद म्हणून हा प्रदेश ओळखला जात होता. त्याकाळी त्या प्रदेशाची राजधानी उज्जैन होती.
- ϖ मध्य प्रदेश हे राज्य, भाषावार प्रांतरचनेनंतर १ नोव्हेंबर इ.स. १९५६ला बनवले गेले. त्यानंतर, १ नोव्हेंबर इ.स. २०००ला पुन्हा त्यातून छत्तीसगढ हा विभाग वेगळा होऊन त्याचे स्वतंत्र्य राज्य निर्माण केले गेले.
- ϖ मध्य प्रदेश राज्याची राजधानी भोपाळ आहे.
- ϖ मध्य प्रदेश राज्यात 52 जिल्हे आहेत
- ϖ इंदोर हे मध्य प्रदेश राज्याचे सर्वातमोठे शहर आहे
- ϖ मध्यप्रदेश राज्यात महत्वाची १७ धरणे आहेत त्यामध्ये भारतातील सर्वात मोठा जलसाठा असलेले धरण इंदिरासागर धरण मध्य प्रदेश राज्यातच आहे
- ϖ मध्यप्रदेश राज्यातुन अनेक नद्या वाहतात त्यात गंगेच्या उपनद्या बेटवा, चंबळ, सोने तसेच गोदावरी नदीच्या उपनद्या कान्हा , पेंच, वैनगंगा व नर्मदा व तापी नदीचा उगम मध्यप्रदेश राज्यातच होतो
01. राज्यस्थान
भारतातील सर्वातज्यस्त क्षेत्रफळ असलेले 1 ल्या क्रमांकाचे राज्य आहे राज्यस्थान
- ϖ राज्यस्थान राज्याचे एकूण क्षेत्रफळ आहे ३४२२३९ चौरस किलोमीटर
- ϖ क्षेत्रफळानुसार राजस्थानचा भारतात प्रथम क्रमांक लागतो
- ϖ जयपूर ही या राज्याची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.. येथील लोकसंख्या ६,८६,२१,०१२ एवढी आहे व लोकसंख्येनुसार राजस्थानचा भारतात ७ वा क्रमांक लागतो.
- ϖ राजस्थान राज्यात ३३ जिल्हे आहेत
- ϖ राज्यस्थान हे उत्तर भारतातील एक राज्य आहे. हे राज्य आपल्या प्राचीन इतिहासाची व ऐतिहासिक किल्यांची भूमी म्हणून प्रसिद्ध आहे.
- ϖ हिंदी व राजस्थानी या येथील प्रमुख बोलल्या जाणार्या भाषा आहेत. राजस्थानची साक्षरता ६७.०६ टक्के एवढी आहे.
- ϖ उष्ण वाळवंट व कमी पाऊस यामुळे येथे शेतीचे प्रमाण कमी आहे. ज्वारी, मका, हरबरा व गहू ही येथील प्रमुख धान्य पिके, तर ऊस, तेल व तंबाखू ही येथील प्रमुख नगदी पिके आहेत. या भागातून बनास, लुनी, घग्गर व चंबळ या नद्या वाहतात. राजस्थानचे मारवाड व मेवाड असे दोन विभाग आहेत.
- ϖ राजस्थान हे भौगोलिक दृष्ट्या अतिशय वैविध्यपूर्ण आहे. थरचे वाळवंट व अरवली पर्वत हे राजस्थानच्या भूभागाचे वैशिष्ट्य आहे. अरवली पर्वत राज्याच्या अग्नेय ते नैर्ऋत्य दिशांना पसरलेला आहे व त्याची एकूण लांबी ८५० किमी इतकी आहे. अबू डोंगरावर गुरु शिखर हे अरवली पर्वताचे राजस्थानमधील सर्वात उंच शिखर आहे. अरवलीने राजस्थानचे पूर्व राजस्थान व पश्चिम राजस्थान असे दोन भाग केलेले आहेत.
- ϖ पूर्व राजस्थानात व पश्चिम राजस्थानात हवामानाचा मोठा फरक असून पश्चिम राजस्थान हा अतिशय कोरडा रेताळ प्रांत आहे. पश्चिम भाग हा प्रामुख्याने थर वाळवंटात मोडतो. थर वाळवंट पाकिस्तानात देखील शेकडो किमी पर्यंत आहे. बिकानेर हे सर्वाधिक लोकवस्तीचे शहर आहे. पावसाचे प्रमाण पश्चिमेकडे कमी कमी होत जाते. सरासरी फक्त ४० सेमी इतका वार्षिक पाऊस या भागात पडतो. तापमान वर्षभर उच्च असते. उन्हाळ्यात तापमान ४५ अंशापेक्षाही जास्त जाते, तर हिवाळ्यात तापमान शून्याच्याही खाली जाते. गंगानगर हे भारतातील सर्वाधिक उष्ण शहर उत्तर राजस्थानात आहे
- ϖ भौगोलिक विविधता, रोमांचक इतिहास व ऐतिहासिक स्थळे, नैसर्गिक सौंदर्य व विविधरंगी संस्कृती यामुळे राजस्थान पर्यटकांना मोठ्या प्रमाणात आकर्षिक करते. पर्यटकांमध्ये देशी तसेच विदेशी पर्यटकांचा मोठा समावेश असतो. जयपूर, उदयपूर, जोधपूर, जेसलमेर, अजमेर, बिकानेर ही ऐतिहासिक पर्यटन स्थळे आहे. जयपूर हे पर्यटकांचे सर्वाधिक आवडते शहर आहे. जयपूर शहराला येथील इमारतींच्या रंगांमुळे गुलाबी शहर असे म्हणतात. जयपूर शहरातील पर्यटन स्थळांमध्ये जंतर-मंतर, हवा महल, नियोजित जयपूर शहर व अंबरचा किल्ला ही प्रसिद्ध स्थळे आहेत. उदयपूर येथील तळ्यातील महाल जगप्रसिद्ध आहे. उदयपूर शहराजवळील चित्तोडगडचा किल्ला पहाण्याजोगा आहे. हा किल्ला क्षेत्रफळाने अशियातील सर्वात मोठा किल्ला मानला जातो.
- ϖ राजस्थान हे राज्य प्राचीन इतिहासासाठी प्रसिद्ध आहे. पुरातन सिंधू संस्कृती ही राजस्थानच्या काही भागात विकसित झाली होती. सिंधू संस्कृती ही भारतीय संस्कृतीचा पाया समजली जाते. या संस्कृतीतील काही महत्त्वाची शहरे राजस्थानमध्ये होती. सिंधू नदीची लुप्त झालेली प्रमुख उपनदी सरस्वती राजस्थानच्या मधोमध वाहत होती. आजही अनेक पुरातत्त्वीय खुणा राजस्थानच्या या भागात सापडतात. डांगी, बिश्नोई, रजपूत, यादव, जाट, भील, गुज्जर, मीना व अनेक आदिवासी समूह हे राजस्थानमधील निवासी आहेत. त्यांचा आजच्या राजस्थानच्या जडणघडणीत मोठा सहभाग आहे. राजस्थानचा इतिहास हा राजेरजवाडे, लढाया, वीरस्त्रिया, धार्मिक संत महात्मे यांनी अजरामर केला आहे
Comments
Post a Comment