Search This Blog

Monday, 15 August 2022

सिरपूर धरण


Watch Full Video👇
 
Sirpur Dam Video Click Here

नमस्कार मित्रांनो आज आपण महाराष्ट्र राज्यातील गोंदिया जिल्यातील एक महत्वाचे धरण पाहणार आहोत ते म्हणजे सिरपूर धरण  या धरणाला सिरपू देवरी असेही म्हंटले जते


हे धरण महाराष्ट्र आणि छत्तीसगड ह्या दोन राज्यांच्या सीमेवर आहे 



या धरणाचा Project Identification Code MH09MH0228 आहे 


हे धरण देवरी तालुक्यात सिरपूर गावाजवळ आहे 


 सिरपूर हे धरण गोंदिया शहरापासून 71 किलोमीटर अंतरावर तसेच 

देवरी शहरापासून 11 किलोमीटर अंतरावर आहे


 सिरपूर हे धरण वैनगंगेची उपनदी बाग या नदीवर1970 साली बांधण्यात आले 


 सिरपूर धरणाची उंची 24.69 मीटर म्हणजेच 81 फूट आहे

या  धरणाची लांबी 2840 मीटर म्हणजेच 9317 फूट आहे

 सिरपूर या धरणाची पाणी साठवण्याची एकूण क्षमता 7.20 टीएमसी म्हणजेच 7200 दशलक्ष घनफूट इतकी असून या धरणाची उपयुक्त क्षमता 6.80 टीएमसी म्हणजेच 6800 दशलक्ष घनफूट आहे

महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या एकूण जलसाठा असलेली धरणांच्या यादीमध्ये सिरपूर धरणाचा 50 वा क्रमांक येतो


तसेच महाराष्ट्रातील उपयुक्त जलसाठा असलेल्या धरणांच्या यादीमध्ये   सिरपूर धरणाचा 47 वा क्रमांक येतो



या धरणाला 7 दरवाजे आहेत

Location👇


Monday, 8 August 2022

मांजरा धरण





👉 Dam Location Click Here

 नमस्कार मित्रांनो आज आपण महाराष्ट्र राज्यातील बीड आणि उस्मानाबाद अर्थात धाराशिव या दोन जिल्ह्यांच्या सीमेवर असलेले एक महत्वाचे धरण पाहणार आहोत ते म्हणजे मांजरा धरण


या धरणाचा Project Identification Code MH09MH0946 आहे


मांजरा हे धरण धाराशिव शहरापासून 60 किलोमीटर अंतरावर तसेच

बीड शहरापासून 90 किलोमीटर अंतरावर आहे

हे धरण धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुक्याच्या ठिकाणापासून 20 किलोमीटर अंतरावर तसेच 

बीड जिल्ह्यातील कैज तालुक्याच्या ठिकाणापासून 30 किलोमीटर अंतरावर आहे


मांजरा हे धरण गोदावरीची उपनदी मांजरा किंवा मंजिऱ्या या नदीवर 1982 साली बांधण्यात आले


मांजरा धरणाची उंची 25 मीटर म्हणजेच 82 फूट आहे

या  धरणाची लांबी  4203 मीटर म्हणजेच 13789 फूट आहे 

मांजरा या धरणाची पाणी साठवण्याची एकूण क्षमता 7.91 टीएमसी म्हणजेच 5350 दशलक्ष घनफूट इतकी असून या धरणाची उपयुक्त क्षमता 6.25 टीएमसी म्हणजेच 6250 दशलक्ष घनफूट आहे

या धारणाला 18 दरवाजे आहेत


या धरणातुन २ कालवे जातात ह्या कालव्यांचा शेतीसाठी उपयोग होतो 


मांजरा धरण manjara dam,manjara dam dam song,manjara dam dam song telugu,manjara dam dam song dj,manjara dam dhanegaon,manjara dam sangareddy,manjara dam mela mela,manjara dam latur,manjara dam 2022,manjara dam news,manjara dam water level today,manjara dam address,manjara dam arizona,manjara dam auto,ali dam dam manjara dam dam

Friday, 5 August 2022

बेंबळा धरण यवतमाळ

 

बेंबळा धरण
 बेंबळा धरण

For Full Video Click Image👆


नमस्कार मित्रांनो आज आपण महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील एक महत्वाचे धरण पाहणार आहोत ते म्हणजे बेंबळा धरण

 

या धरणाचा (प्रकल्प ओळख कोड) Project Identification Code MH09HH2138 आहे


बाभूळगाव तालुक्यातील खडक सावंगा गावाजवळ आहे


बेंबळा हे धरण यवतमाळ शहरापासून 27 किलोमीटर अंतरावर तसेच

बाभूळगाव तालुक्याच्या ठिकाणापासून 8 किलोमीटर अंतरावर आहे


बेंबळा हे धरण गोदावरीची उपनदी वैनगंगा आणि वैनगंगेची वर्धा नदीची उपनदी बेंबळा या नदीवर 2007 साली बांधण्यात आले


बेंबळा धरणाची उंची 35.80 मीटर म्हणजेच 117 फूट आहे

या  धरणाची लांबी  297 मीटर म्हणजेच 974 फूट आहे

बेंबळा या धरणाची पाणी साठवण्याची एकूण क्षमता 11.37 टीएमसी म्हणजेच 11370 दशलक्ष घनफूट इतकी असून या धरणाची उपयुक्त क्षमता 10.69 टीएमसी म्हणजेच 10690 दशलक्ष घनफूट आहे

या धारणाला 20 दरवाजे आहेत


या धरणातुन 1 कालवा जातात ह्या कालव्याचा शेतीसाठी उपयोग होतो 



bembla dam yavatmal,bembla dam yavatmal status,bembla dam yavatmal news,bembla dam yavatmal 2022,bembla dam yavatmal death,bembla dam yavatmal news today,bembla dam yavatmal live,bembla dam yavatmal news live,bembla dam yavatmal information,bembla dam yavatmal pur,bembla dam yavatmal accident,bembla dam yavatmal bus,bembla dam yavatmal comedy,bembla dam yavatmal choir,bembla dam yavatmal english subtitles,bembla dam yavatmal hd,bembla dam

Tuesday, 2 August 2022

महाराष्ट्र राज्यातील उपयुक्त जलसाठा असलेली ५ धरणे

 नमस्कार मित्रांनो आज आपण महाराष्ट्र राज्यातील उपयुक्त जलसाठा असलेली ५ धरणे पाहणार आहोत 


1 कोयना धरण




नमस्कार मित्रांनो आज आपण महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातील एक महत्वाचे धरण पाहणार आहोत ते म्हणजे कोयना धरण


कोयना धरण भारतातील सर्वातज्यास्त वीजनिर्मिती करणारे धरण आहे

तसेच हे धरण महाराष्ट्रातील सर्वातज्यास्त उपयुक्त पाणीसाठा असलेले धरण आहे 

आणि कोयना हे धरण महाराष्ट्रातील सर्वात उंच धरण देखील आहे 


हे धरण पाटण तालुक्यातील कोयनानगर गावाजवळ आहे


कोयना हे धरण सातारा शहरापासून 84 किलोमीटर अंतरावर आहे

हे धरण पाटण शहरापासून 24 किलोमीटर अंतरावर आहे


कोयना हे धरण कृष्णेची उपनदी कोयना ह्या नदीवर बांधण्यात आलेले आहे 


ह्या धरणाचे बांधकाम 1956 ते 1964 मध्ये पूर्ण करण्यात आले 


कोयना याधरणाची उंची 103.2 मीटर  म्हणजे 339 फूट आहे 

या धरणाची लांबी 807.2 मीटर  म्हणजे 2648 फूट आहे 

कोयना या धरणाची पाणी साठवण्याची  एकूण क्षमता 105.26 टीएमसी 

म्हणजेच 105260 दशलक्ष घनफूट इतकी आहे


कोयना या धरणाची पाणी साठवण्याची उपयुक्त क्षमता 100.14  टीएमसी 

म्हणजेच 100140 दशलक्ष घनफूट इतकी आहे


या धरणाला 6 दरवाजे आहेत 


या धरणाच्या जलाशयाला शिवसागर जलाशय असे म्हणातात

कोयना याधरणावर 20 मेगावॉट चे 2 टर्बाईन 

70 मेगावॉट चे 4 टर्बाईन

75 मेगावॉट चे 4 टर्बाईन

80 मेगावॉट चे 4 टर्बाईन

250 मेगावॉट चे 4 टर्बाईन

असे एकूण 10

टर्बाईन बसवलेले आहेत त्यावरून एकूण 1960 मेगावॉट इतकी वीजनिर्मिती केली जाते त्यामुळे हा प्रकल्प भारतातील सर्वात मोठा सध्याचा पहिल्या क्रमांकाचा  जलविद्युत प्रकल्प आहे 

तेहरी प्रकल्प जेव्हा पूर्ण क्षमतेने काम करेल तेव्हा कोयना २ ऱ्या क्रमांकावर येईल

नेहरू मेमोरियल पार्क

प्रकल्पाचे काम पूर्णत्वाच्या जवळ असताना 10 एप्रिल 1960 रोजी भारताचे तत्कालीन पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांनी कोयना प्रकल्पाला भेट दिली. या कार्यक्रमाच्या स्मरणार्थ कोयना धरणाच्या उजव्या बाजूच्या टेकडीवर त्यांच्या कृपाळू हस्ते एका झलकचे अनावरण करण्यात आले. या प्रकल्पामुळे हे ठिकाण आणि हा कार्यक्रम एक सुंदर उद्यान बांधून त्याला "नेहरू मेमोरियल पार्क" असे नाव देण्याची कल्पना आली. हे उद्यान पर्यटकांचे प्रमुख आकर्षण आहे. या बागेतून धरणाचे वरच्या बाजूचे दृश्य दिसते. 'यशोगाथा' (अर्थ: यशाची कहाणी) नावाचे एक सभागृह आहे जे अभियंते आणि प्रकल्पाशी संबंधित कामगारांनी घेतलेल्या प्रचंड प्रयत्नांचा एक छोटासा घटक आहे.


महाराष्ट्रातील सर्वात मोठे कोयना धरण

सातारा जिल्ह्यातील कोयना धरण भारतातील सर्वातज्यास्त वीजनिर्मिती करणारे आणि

महाराष्ट्रातील सर्वात उंच धरण देखील आहे 


हे धरण पाटण तालुक्यातील कोयनानगर गावाजवळ आहे


कोयना हे धरण सातारा शहरापासून 84 किलोमीटर अंतरावर आहे

हे धरण पाटण शहरापासून 24 किलोमीटर अंतरावर आहे


कोयना हे धरण कृष्णेची उपनदी कोयना ह्या नदीवर 

1956 ते 1964 मध्ये बांधण्यात आले 


याधरणाची उंची 103.2 मीटर म्हणजे 339 फूट तसेच 

लांबी 807.2 मीटर  म्हणजे 2648 फूट आहे 

कोयना या धरणाची पाणी साठवण्याची  एकूण क्षमता 105.26 टीएमसी 

म्हणजेच 105260 दशलक्ष घनफूट  तसेच  उपयुक्त क्षमता 100.14  टीएमसी 

म्हणजेच 100140 दशलक्ष घनफूट इतकी आहे


या धरणाला 6 दरवाजे आहेत 


या धरणाच्या जलाशयाला शिवसागर जलाशय असे म्हणातात



********************************************************************************************************************************

2 जायकवाडी धरण



नमस्कार मित्रांनो आज आपण महाराष्ट्र राज्यातील औरंगाबाद जिल्यातील  एक महत्वाचे धरण पाहणार आहोत ते म्हणजे जायकवाडी धरण


आपण महाराष्ट्रातील उपयुक्त जलसाठा असलेल्या धरणांची यादी केल्यास जायकवाडी धरण २ ऱ्या क्रमांकावर येते 

तर महाराष्ट्रातील एकूण जलसाठा असलेल्या धरणांची यादी केल्यास हे धरण ३ ऱ्या क्रमांकावर येते


हे धरण पैठण तालुक्यातील पैठण गावाजवळ आहे


जायकवाडी हे धरण अहमदनगर आणि औरंगाबाद जिल्ह्यांच्या सीमेवर आहे 


जायकवाडी हे धरण औरंगाबाद शहरापासून 54 किलोमीटर अंतरावर तसेच 

हे धरण पैठण शहरापासून 2 किलोमीटर अंतरावर आहे


जायकवाडी हे धरण गोदावरी नदीवर बांधले आहे.


जायकवाडी धरणाचे बांधकाम 1965 ते 1976 साली झाले


या धरणाच्या जलाशयाला नाथसागर जलाशय असे म्हणतात 


जायकवाडी धरणाची उंची 41.30 मीटर म्हणजेच 135 फूट आहे

या धरणाची लांबी 9998 मीटर म्हणजेच 32802 फूट आहे 


या धरणाला 27 दरवाजे आहेत


जायकवाडी या धरणाची पाणी साठवण्याची एकूण क्षमता 102.73 टीएमसी म्हणजेच 102730 दशलक्ष घनफूट इतकी आहे


 या धरणाची पाणी साठवण्याची एकूण उपयुक्त क्षमता 76.67 टीएमसी म्हणजेच 76670 दशलक्ष घनफूट इतकी आहे


या धरणातून दोन कालवे जातात डावा आणि उजवा कळवा 


उपयुक्त जलसाठा आणि एकूण जलसाठा असलेली महाराष्ट्रातील सर्वातमोठी धरणे  अनुक्रमे 

प्रथम क्रमांकावर कोयना 100.14 टी. एम. सी 

दुसऱ्या क्रमांकावर जायकवाडी 76.67 टी. एम. सी 

आणि तिसऱ्या क्रमांकावर उजनी 53.58 टी. एम. सी 


एकूण जलसाठा असलेली महाराष्ट्रातील सर्वातमोठी धरणे  अनुक्रमे 

प्रथम क्रमांकावर उजनी 117.25 टी. एम. सी 

दुसऱ्या क्रमांकावर कोयना 105.26

आणि तिसऱ्या क्रमांकावर जायकवाडी 102.73 


उपयुक्त पाणीसाठा आणि एकूण पाणीसाठा म्हणजे 

धरणातील जेवढा पाणीसाठा प्रत्यक्ष वापरात येतो त्या पाणीसाठ्याला उपयुक्त पाणीसाठा म्हणतात आणि राहिलेला पाणी साथ आहे त्याला डेड म्हणजेच मृद पाणीसाठा म्हणतात 

उपयुक्त आणि मृद पाणीसाठा मिळून जो संपूर्ण धरणाचा पाणीसाठा होतो तो म्हणजेच एकूण पाणीसाठा 

म्हणूनच मित्रांनो धरणाने मोजमाप करताना एकूण आणि उपयुक्त साठा दोन्हीचा विचार केला जातो 


६० किलोमीटरची लांबी आणि दहा किलोमीटरची रुंदी इतका मोठा पसारा असलेल्या या नाथसागराची आशिया खंडातलं सर्वात मोठं मातीचं धरण अशी ओळख आहे





जायकवाडी धरणाची उंची 41.30 मीटर म्हणजेच 135 फूट आहे

या धरणाची लांबी 9998 मीटर म्हणजेच 32802 फूट आहे 


या धरणाला 27 दरवाजे आहेत

जायकवाडी या धरणाची पाणी साठवण्याची एकूण क्षमता 102.73 टीएमसी म्हणजेच 102730 दशलक्ष घनफूट 

तसेच उपयुक्त क्षमता 76.67 टीएमसी म्हणजेच 76670 दशलक्ष घनफूट इतकी आहे



********************************************************************************************************************************

3 उजनी धरण




नमस्कार मित्रांनो आज आपण महाराष्ट्र राज्यातील सोलापूर जिल्ह्यातील एक महत्वाचे धरण पाहणार आहोत ते म्हणजे उजनी धरण सोलापूर महाराष्ट्र 



महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या एकूण जलसाठा असलेली धरणांच्या यादीमध्ये  117.25 टी.एम.सी पाणीसाठ्यासह उजनी धरणाचा पहिला क्रमांक येतो 


तसेच महाराष्ट्रातील उपयुक्त जलसाठा असलेल्या धरणांच्या यादीमध्ये  53.58 टी. एम. सी सह उजनी धरणाचा तिसरा क्रमांक येतो 


उजनी धरण सोलापूर जिल्ह्यातील म्हाडा तालुक्याच्या टेम्भूर्णी गावापासून ११ किलोमीटर अंतरावर आहे

उजनी धरण सोलापूर शहरापासून १०१ किलोमीटर अंतरावर असून पुणे शहरापासून १५५ किलोमीटर अंतरावर आहे 


हे धरण इंदापूर शहरापासून १३ किलोमीटर अंतरावर असून


उजनी धरण पुणे आणि सोलापूर जिल्ह्यांच्या सीमेवर कृष्णेची उपनदी भिमा या नदीवर 1969 ते 1980 साली बांधन्यात आले

या धरणाच्या जागेचे भूमिपूजन महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले होते.


उजनी याधरणाची उंची 56.4 मीटर  म्हणजे 185 फूट आहे 

या धरणाची लांबी 2532 मीटर  म्हणजे 8314 फूट आहे 

उजनी या धरणाची पाणी साठवण्याची  एकूण क्षमता 117.25 टीएमसी 

म्हणजेच 117250 दशलक्ष घनफूट इतकी आहे


उजनी या धरणाची पाणी साठवण्याची उपयुक्त क्षमता 53.58  टीएमसी 

म्हणजेच 53580 दशलक्ष घनफूट इतकी आहे


या धरणाला 41 दरवाजे आहेत 


या धरणाच्या जलाशयाला यशवंतसागर जलाशय असे म्हणातात

उजनी याधरणावर 12 मेगावॉट वीजनिर्मिती केली जाते


तुम्हाला फ्लेमिंगो या परदेशी पक्षाचे निरीक्षण करायचे असेल तर हा पक्षी हिवाळ्यात या जलाशयावर येतो. या धरणाचा फुगवटा हा खूप मोठा आहे. जवळपास दौंड पर्यंत हा पसरलेला आहे. या उजनी जलाशयाच्या पाणी साठ्याच्या आत तुम्हाला पळसनाथ हे मंदिर जेवहा पाणीसाठा कमी होईल तेव्हा बघायला मिळेल. 


पळसदेव मंदिर यादवकालीन आहे. या ठिकाणी पक्क्या विटांनी बांधलेली शिखरे पाहता येतात. मंदिर आवारात सतीशिळा, वीरगळ, भंगलेला घोडा, मारुतीची मूर्ती, दीपमाळेचे अवशेष्भक्कम विटांची भग्न ओवरी असे अनेक गोष्टी धरणातील पाणी कमी झाल्यावर पाहायला मिळतात.


या धरणात मत्स्य व्यवसाय मोठ्या प्रमाणावर केला जातो 


उजनी धरण इतके मोठे आहे, की ते बांधताना 29 गावे पाण्याखाली गेली होती. धरणातील पाण्याचा पुणे,सोलापूर आणि अहमदनगर या तीन जिल्ह्यांतील शेतीला भरपूर फायदा होत आहे.


या धरणातून २ कालवे जातात यामधी डावा कालवा १२६ किलोमीटर पर्यंत जातो तर दुसरा उजवा कालवा ११२ किलोमीटर पर्यंत वाहत जातो




********************************************************************************************************************************

4 तोतलाडोह धरण



नमस्कार मित्रांनो आज आपण महाराष्ट्र राज्यातील नागपूर जिल्ह्यातील एक महत्वाचे धरण पाहणार आहोत ते म्हणजे तोतलाडोह धरण


महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या एकूण जलसाठा असलेली धरणांच्या यादीमध्ये  41.21 टी.एम.सी पाणीसाठ्यासह तोतलाडोह धरणाचा पाचव्या क्रमांक येतो


तसेच महाराष्ट्रातील उपयुक्त जलसाठा असलेल्या धरणांच्या यादीमध्ये  35.91 टी. एम. सी सह तोतलाडोह धरणाचा चौथ्या क्रमांक येतो 


तोतलाडोह धरण नागपूर जिल्ह्यातील रामटेक तालुक्यात रामटेक पासून 38 किलोमीटर अंतरावर असून

महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश ह्या दोन राज्यांच्या सीमेवर आहे 

*

तोतलाडोह धरण नागपूर शहरापासून 80 किलोमीटर अंतरावर आहे 



नागपूर जिल्ह्यातील पेंच नदीवर तोतलाडोह धरण १९८९ साली बांधण्यात आले



तोतलाडोह याधरणाची उंची 74.5 मीटर  म्हणजे 244 फूट आहे 

या धरणाची लांबी 680 मीटर  म्हणजे 2230 फूट आहे 

तोतलाडोह या धरणाची पाणी साठवण्याची  एकूण क्षमता 41.21 टीएमसी 

म्हणजेच 41210 दशलक्ष घनफूट इतकी आहे


तोतलाडोह या धरणाची पाणी साठवण्याची उपयुक्त क्षमता 35.91 टीएमसी 

म्हणजेच 35910 दशलक्ष घनफूट इतकी आहे


या धरणाला 14 दरवाजे आहेत



तोतलाडोह याधरणावर 160 मेगावॉट वीजनिर्मिती केली जाते


********************************************************************************************************************************

5 इसापूर धरण 




रसिकहो नमस्कार आज आपण महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ आणि हिंगोली ह्या दोन जिल्यांच्यासीमेवर असलेले इसापूर धरण पाहणार आहोत 


महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या एकूण जलसाठा असलेली धरणांच्या यादीमध्ये  45.17 टी.एम.सी पाणीसाठ्यासह इसापूर धरणाचा चौथ्या क्रमांक येतो


तसेच महाराष्ट्रातील उपयुक्त जलसाठा असलेल्या धरणांच्या यादीमध्ये  34.04 टी. एम. सी सह इसापूर धरणाचा पाचव्या क्रमांक येतो 



इसापूर हे धरण हिंगोली शहरापासून 35 किलोमीटर अंतरावर आहे

तसेच हे धरण यवतमाळ शहरापासून १३६ किलोमीटर अंतरावर आणि 

नांदेड शहरापासून ८८ किलोमीटर अंतरावर आहे

इसापूर हे धरण पैनगंगा नदीवर 1971 ते 1982 साली बांधण्यात आले 


पैनगंगा हि नदी वर्धा नदीची उपनदी आहे, वर्धा वैनगंगेला मिळते या प्रवाहास प्राणहिता म्हणतात प्राणहिता ही पुढे गोदावरीला मिळते


इसापूर धरणाची उंची 57 मीटर  म्हणजेच 187 फूट आहे

या  धरणाची   लांबी  4120 मीटर  म्हणजेच 13517 फूट आहे 


इसापूर या धरणाची पाणी साठवण्याची  एकूण क्षमता 45.17 टीएमसी 

म्हणजेच 45170 दशलक्ष घनफूट इतकी आहे


इसापूर या धरणाची पाणी साठवण्याची उपयुक्त क्षमता 34.04 टीएमसी 

म्हणजेच 34040 दशलक्ष घनफूट इतकी आहे



इसापूर धरणाला 15 दरवाजे आहेत 


इसापूर धरणातून २ कलवे  जातात या दोन कालव्याचा हिंगोली यवतमाळ आणि नांदेड ह्या ३ जिल्ह्यांना फायदा होतो 



इसापूर धरण

 इसापूर धरण 




रसिकहो नमस्कार आज आपण महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ आणि हिंगोली ह्या दोन जिल्यांच्यासीमेवर असलेले इसापूर धरण पाहणार आहोत 


महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या एकूण जलसाठा असलेली धरणांच्या यादीमध्ये  45.17 टी.एम.सी पाणीसाठ्यासह इसापूर धरणाचा चौथ्या क्रमांक येतो


तसेच महाराष्ट्रातील उपयुक्त जलसाठा असलेल्या धरणांच्या यादीमध्ये  34.04 टी. एम. सी सह इसापूर धरणाचा पाचव्या क्रमांक येतो 



इसापूर हे धरण हिंगोली शहरापासून 35 किलोमीटर अंतरावर आहे

तसेच हे धरण यवतमाळ शहरापासून १३६ किलोमीटर अंतरावर आणि 

नांदेड शहरापासून ८८ किलोमीटर अंतरावर आहे

इसापूर हे धरण पैनगंगा नदीवर 1971 ते 1982 साली बांधण्यात आले 


पैनगंगा हि नदी वर्धा नदीची उपनदी आहे, वर्धा वैनगंगेला मिळते या प्रवाहास प्राणहिता म्हणतात प्राणहिता ही पुढे गोदावरीला मिळते


इसापूर धरणाची उंची 57 मीटर  म्हणजेच 187 फूट आहे

या  धरणाची   लांबी  4120 मीटर  म्हणजेच 13517 फूट आहे 


इसापूर या धरणाची पाणी साठवण्याची  एकूण क्षमता 45.17 टीएमसी 

म्हणजेच 45170 दशलक्ष घनफूट इतकी आहे


इसापूर या धरणाची पाणी साठवण्याची उपयुक्त क्षमता 34.04 टीएमसी 

म्हणजेच 34040 दशलक्ष घनफूट इतकी आहे



इसापूर धरणाला 15 दरवाजे आहेत 


इसापूर धरणातून २ कलवे  जातात या दोन कालव्याचा हिंगोली यवतमाळ आणि नांदेड ह्या ३ जिल्ह्यांना फायदा होतो 


>छत्रपती शिवाजी महाराज: एक परस्परसंवादी गाथा

छत्रपती शिवाजी महाराज: एक परस्परसंवादी गाथा ...