तोतलाडोह धरण
नमस्कार मित्रांनो आज आपण महाराष्ट्र राज्यातील नागपूर जिल्ह्यातील एक महत्वाचे धरण पाहणार आहोत ते म्हणजे तोतलाडोह धरण
महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या एकूण जलसाठा असलेली धरणांच्या यादीमध्ये 41.21 टी.एम.सी पाणीसाठ्यासह तोतलाडोह धरणाचा पाचव्या क्रमांक येतो
तसेच महाराष्ट्रातील उपयुक्त जलसाठा असलेल्या धरणांच्या यादीमध्ये 35.91 टी. एम. सी सह तोतलाडोह धरणाचा चौथ्या क्रमांक येतो
तोतलाडोह धरण नागपूर जिल्ह्यातील रामटेक तालुक्यात रामटेक पासून 38 किलोमीटर अंतरावर असून
महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश ह्या दोन राज्यांच्या सीमेवर आहे
*
तोतलाडोह धरण नागपूर शहरापासून 80 किलोमीटर अंतरावर आहे
नागपूर जिल्ह्यातील पेंच नदीवर तोतलाडोह धरण १९८९ साली बांधण्यात आले
तोतलाडोह याधरणाची उंची 74.5 मीटर म्हणजे 244 फूट आहे
या धरणाची लांबी 680 मीटर म्हणजे 2230 फूट आहे
तोतलाडोह या धरणाची पाणी साठवण्याची एकूण क्षमता 41.21 टीएमसी
म्हणजेच 41210 दशलक्ष घनफूट इतकी आहे
तोतलाडोह या धरणाची पाणी साठवण्याची उपयुक्त क्षमता 35.91 टीएमसी
म्हणजेच 35910 दशलक्ष घनफूट इतकी आहे
या धरणाला 14 दरवाजे आहेत
तोतलाडोह याधरणावर 160 मेगावॉट वीजनिर्मिती केली जाते
Comments
Post a Comment