Search This Blog

Sunday, 23 March 2025

स्वामी नारायण मंदिर, पुणे

 नमस्कार मित्रांनो! आज आपण पुण्यातील एका अद्भुत आणि भव्य ठिकाणी आलो आहोत. हे ठिकाण म्हणजे BAPS श्री स्वामीनारायण मंदिर! हे मंदिर पुणे शहरातील सर्वात मोठे मंदिर आहे हे मंदिर नऱ्हे गावाशेजारी आंबेगाव बुद्रुक मध्ये पुणे बंगलोर हायवे शेजारी आहे


पूर्ण माहितचा व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा स्वामी नारायण मंदिर, पुणे व्हिडिओ

हे मंदिर बघून तुम्ही नक्कीच थक्क व्हाल! हे केवळ 24 महिन्यांत बांधले गेले आहे आणि त्याची भव्यता बघण्यासारखी आहे. 

श्रीस्वामीनारायण यांना समर्पित असलेले हे विलक्षण सुंदर मंदिर फेब्रुवारी २०१७ मध्ये पूर्ण झाले

ह्या मंदिराचा परिसर खूपच स्वच्छ आणि छान आहे 

संध्याकाळच्या वेळी हे मंदिर अत्यंत सुंदर दिसते 

या मंदिराची सर्वात खास गोष्ट म्हणजे ते पूर्णपणे दगडात कोरलेले आहे, त्यात स्टीलचा वापर अजिबात केलेला नाही. मंदिरात गुलाबी सँडस्टोन आणि लाल दगड वापरलेले दिसतात

राजस्थानमधील कुशल कारागिरांनी ही सुंदर शिल्पकला तयार केली आहे. मंदिराची रचना प्रसिद्ध सोमपुरा स्थापत्यशैलीत केली आहे. इथे 140 कोरीव खांब, 109 सुंदर तोरण आणि 10,269 हून अधिक कोरीव शिल्पे आणि मूर्ती आहेत, जी आपल्या भारतीय संस्कृतीची आणि महाराष्ट्राच्या समृद्ध वारशाची साक्ष देतात. 

हे मंदिर BAPS संस्थेने बांधले आहे. या संस्थेने जगभरात ३,८५० हून अधिक केंद्रे स्थापन केली आहेत. लाखो स्वामीनारायण अनुयायी पूजा, ध्यान, शुद्ध आहार आणि सेवाभावाने जीवन जगतात. ते दारू, व्यसन, मांसाहार आणि अशुद्ध वागणूक टाळतात. 

BAPS श्री स्वामीनारायण मंदिर हे केवळ एक धार्मिक स्थळ नाही, तर ते भारतीय वास्तुकला आणि संस्कृतीचे एक सुंदर प्रतीक आहे. 

मंदिराची वेळ सकाळी 7:00 ते दुपारी 12:00

दुपारी 4:00 ते रात्री 8:30


मंदिर परिसरात लहान मुलांना खेळण्यासाठी काही खेळणी देखील आहेत

तुम्ही पुण्यात असाल, तर या मंदिराला नक्की भेट द्या. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, हे कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका! धन्यवाद!

प्रशांत अरविंद दरेकर

मराठी नॉलेज वर्ल्ड यूट्यूब चॅनल / प्राचीन मंदिरे (Prachin Mandire) Ancient Temples

यूट्यूब चॅनेल वर जाण्यासाठी लोगोला क्लिक करा👇


श्री क्षेत्र तुळापूर: शौर्य, श्रद्धा आणि बलिदानाचा त्रिवेणी संगम

 श्री क्षेत्र तुळापूर: शौर्य, श्रद्धा आणि बलिदानाचा त्रिवेणी संगम


पूर्ण माहितचा व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा तुळापूर व्हिडिओ

महाराष्ट्राच्या मातीत इतिहासाच्या अनेक पाऊलखुणा दडलेल्या आहेत. त्यापैकीच एक महत्त्वाचं स्थान म्हणजे तुळापूर. जिथे शौर्य, श्रद्धा आणि बलिदानाचा त्रिवेणी संगम पाहायला मिळतो. भीमा, भामा आणि इंद्रायणी नद्यांच्या संगमावर वसलेल्या या पवित्र भूमीला ऐतिहासिक आणि धार्मिक महत्त्व आहे.

तुळापूरचं मुख्य आकर्षण म्हणजे संगमेश्वर मंदिर. यादव आणि मराठा स्थापत्यशैलीचा उत्कृष्ट नमुना असलेलं हे शिवमंदिर १६३३ मध्ये सरदार मुरार जगदेव यांनी बांधलं. मंदिरातील कोरीव खांब, नंदीमंडप आणि शांत वातावरण मनाला शांती देतं. महाशिवरात्री आणि त्रिपुरी पौर्णिमेला येथे मोठी यात्रा भरते.

या त्रिवेणी संगमावर स्नान केल्याने पुण्य मिळतं, अशी भाविकांची श्रद्धा आहे. अनेक साधुसंतांनी येथे तपश्चर्या केली आहे. संगमावर दानधर्म केल्याने हजारो पटींनी पुण्य मिळतं, असं मानलं जातं.

१६८९ साली याच पवित्र भूमीवर स्वराज्याचे दुसरे छत्रपती, धर्मवीर संभाजी महाराजांनी आपल्या प्राणांचं बलिदान दिलं. औरंगजेबाने त्यांना क्रूरपणे या ठिकाणी मारलं. त्यांच्या बलिदानाने महाराष्ट्राला नवी प्रेरणा दिली.

संगमेश्वर मंदिराच्या जवळच एका टेकडीवर हे विष्णू महाबल्लाळेश्वर मंदिर आहे. नावात विष्णू असले तरी, हे मंदिर प्रामुख्याने भगवान शंकराला समर्पित आहे.

स्कंद पुराणानुसार, भगवान विष्णूंनी महाबल आणि अतिबल या राक्षसांचा वध करून येथे शिवलिंगाची स्थापना केली.

हे मंदिर मराठा स्थापत्यशैलीचा उत्कृष्ट नमुना आहे. मंदिरातील नंदी मंडप, भव्य सभामंडप आणि कोरीव खांब भक्तांना आध्यात्मिक शांती देतात.

मंदिराच्या शांत आणि पवित्र वातावरणात भाविक तल्लीन होतात आणि त्यांना एक वेगळाच आध्यात्मिक अनुभव मिळतो.

तुळापुरात रामेश्वर, विष्णू, कोटेश्वर अशी अनेक प्राचीन मंदिरे आहेत. मंदिराच्या परिसरात सुंदर घाट आहे, जिथे बसून ध्यानधारणा करता येते.

तुळापूर हे केवळ एक तीर्थक्षेत्र नाही, तर ते शौर्य आणि बलिदानाचा इतिहास आहे. येथे आल्यावर मन शांत आणि प्रसन्न होतं. हा इतिहास आणि श्रद्धा यांचा अनोखा संगम आहे.



प्रशांत अरविंद दरेकर

मराठी नॉलेज वर्ल्ड यूट्यूब चॅनल / प्राचीन मंदिरे (Prachin Mandire) Ancient Temples

यूट्यूब चॅनेल वर जाण्यासाठी लोगोला क्लिक करा👇










Wednesday, 19 March 2025

दरेकर घराण्याचा इतिहास

🚩सरदार दरेकर घराण्याचा इतिहास 🚩


ऐतिहासिक कार्य:- कऱ्हे पठारावरील अनेक कर्तबगार घराण्याप्रमाणे दरेकर घराणे शिवकाळापासून सरदारकी करून कार्यरत होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या हशम मावळे पायदळाचे सरदारांच्या यातील दरेकरांचे चार सरदार होते. १)गणोजी दरेकर 2) येसाजी दरेकर (3) बाळाजीराव (बाजीराव) दरेकर (4) राणोजी दरेकर यांचे वारस सुभानजी, गोरखोजी, मानाजी ,गोरोजी यांना अनेक गावांचे मोकासे होते.

*२ एप्रिल १६६३ रोजी मोरो त्रिंबक पेशवे व निळोपंत सोनदेव यांनी शिवाजी महाराजांना सिंहगडावरील फितव्याबाबत सावधतेचा इशारा दिला. या पत्रात सिंहगडाच्या सुरक्षेसाठी दरेकर सरदारांचा तानाजी, कोंढाजी, कमळोजी यांच्यासह स्पष्ट उल्लेख आहे.*

*शके १६१४ (इ.स. १६९२) मध्ये छत्रपती राजाराम महाराजांनी रायगड हस्तगत मोहिमेसाठी दरेकर, जाऊळकर, मावळे व इतर पायदळांना थेट आज्ञा केली होती.*

*या आदेशातून दरेकर हे स्वराज्याच्या लष्करी मोहिमेत सक्रिय व विश्‍वासू सरदार होते, हे स्पष्ट होते.*


छत्रपती शाहू महाराजांनी सयाजी दरेकर यांना भोसरे, वडखळ, लोणी, महिमानगड, वर्धन गड तसेच खटाव

खातगुन आणि सुभान जी दरेकर यांना आंबळे हे वतन दिले होते 

दरेकर हे शाहूंच्या दरबारात हरी मोरेश्वर राजाज्ञा यांच्या सैन्यात शिलेदार होते. महाड च्या ठाण्यावर बंदोबस्तास बालकोजीराव यांना ठेवल्याचा उल्लेख आढळतो.


*इ. स. १७५६ मध्ये कर्नाटकातील कड्डपावर केलेल्या स्वारीपासून खंडेराव दरेकर यांचे नाव विशेष प्रसिद्धीस आले*

*कड्डपाचा नवाब मजीद खान याने खंडणी देण्यास नकार दिल्यामुळे सप्टेंबर १७५७ रोजी मराठ्यांनी किल्ल्यावर मोर्चे लावले*

*यावेळी पाऊस असतानाही, मराठ्यांच्या बाजूने सरदार खंडेराव दरेकर यांनी पराक्रमाची शर्थ केली.* 

*व मराठ्यांनी कड्डपा घेतला या युद्धात माजीदखान गोळी लागून ठार झाला* 

*यानंतर पानिपतच्या हालचाली सुरु झाल्या या मोहिमेत तरुण दादाजी दरेकर यांच्या नेतृत्वाखाली दरेकरांचे पथक होते. ते भाऊसाहेब पेशव्यांच्या अनेक सल्लामसलती मध्ये सहभागी होते पानिपतावर पराक्रमाची शर्थ करून दादाजी दरेकर यांनी पानिपतावर देह ठेवला.*


*इतिहासामध्ये प्रसिद्ध असलेले बारभाई (मराठा मंडळातील प्रमुख १२ सरदार) यात, दरेकर हे बारभाईकडे वळले होते.* 

*नारायणराव यांच्या हत्तेनंतर राघोबादादा आणि यांच्यात संघर्ष सुरू झाला. राघोबादादाचा पाठलाग सेनापती फडके यांनी केला, याच वेळी राघोबादादांच्या सरदारांनी आता राघोबा दादांच्या बरोबर जाण्यात अर्थ नाही असा सांगावा केला,*

*त्यानंतर सरलष्कर खंडेराव दरेकर, बजाबा पुरंदरे, अप्पा मेहंदळे हे सगळे आपापले सैन्य व तोफा घेऊन तापी तीरावर चांगदेव यागावी हरिपंत फडके यांना येऊन मिळाले.*


*खंडेराव दरेकर यांचा शिक्का

*||श्री चरणी तत्पर सयाजीसुत खंडेराव सरलष्कर ||*

 श्री खंडेराव दरेकर पानिपतच्या युद्धात मृत्यू पावलेल्या दादजी दरेकर यांचे नातू, व सयाजी दरेकर यांचे पुत्र होते*

खंडेराव दरेकर हे १७६८ ते १७९२ या पेशवे काळात २४ वर्ष सरलष्कर होते


सन १७९५ मध्ये निजामा बरोबर झालेल्या खर्ड्याच्या लढाईत खंडेराव दरेकर यांचे सुपुत्र हनुमंतराव दरेकर यांनी पराक्रम केला*

*खंडेराव दरेकर यांनी पिसाळलेल्या हत्तीपासून माधवराव पेशवे यांचा जीव वाचवला. पेशवे काळातच पानिपत, खर्डा, उदगीर, राक्षसभुवन, कर्नाटक खान्देश येथे झालेल्या मराठ्यांच्या लढायात प्रमुख सरदारमध्ये दरेकर यांचा समावेश होता. 


दरेकर यांचा सरंजाम:- दरेकरांकडे  इसवीसन सतराशे ९५ मध्ये एक लक्ष सोळा हजार ८५ रुपयांचा सरंजाम होता. यामध्ये त्यांच्याकडे मामले बीड व पाथरी येथील चौथाई अंमल आणि पुणे प्रांतातील आंबळे हा गाव इनाम मौजे जळगाव, उंडवडी तालुका बारामती तसेच नायगाव तालुका पुरंदर या तीन गावांचा मोकासा भडोच येथील अंबड पैकी चौथाई अमक, माळवा सागर परभणी येथील तरेपरड इत्यादी गावातील एकूण सरंजाम होता.*


दरेकर यांचा वाडा:- आजही आंबळे येथे सरदार दरेकर यांचा ऐतिहासिक वाडा आहे वाडा उत्तराभिमुख असून त्याची उंची 25 फूट आहे प्रवेशद्वाराची कमान आजही भक्कम स्थितीत असून शीसम लाकडाचा दरवाजा आहे. गडी सासवड पासून 16 किलोमीटर वर आहे वाड्याच्या दरवाज्या शेजारी दोन बुरुज असून समोरील बाजूस नगारखाना व दुमजली वाडा आहे वाड्याचे बुरुज व तटबंदी आजही मोठ्या प्रमाणात शिल्लक आहे येथे  तळघरात भाले आणि तलवारी सापडल्या त्या पुरातत्व खात्याकडे जमा केल्या,  तळघरात ध्यानमंदिर आहे दगडी कारंजे सापडले ते आजही मुख्य दरवाज्यात ठेवले आहे.

देऊळवाडा :

*मुख्य वाड्याच्या समोर पूर्वेस विस्तृत जागेत काही मंदिरे असून त्यांच्या भोवती तटबंदी होती प्रथम तुळजाभवानी व श्रीराम मंदिर लागते यातील मूर्ती पेशव्यांनी दरेकरांना दिल्या आहेत श्रीराम मंदिराच्या बाजूस श्री विष्णू व लक्ष्मी यांची गरुडा रूढ अशी एकत्र सुंदर व दुर्मिळ संगमरवरी मूर्ती आहे*

*अशाप्रकारे मराठेशाहीचे जहाज तरण्यासाठी व रक्षणासाठी दरेकर यांचे मोठे योगदान आढळते*


|| जय भवानी जय शिवराय ||


माहिती संकलन

सरदार दरेकर घराणे

स्वराज्य रथ आयोजक

सचिन वसंत दरेकर

प्रशांत अरविंद दरेकर

अश्विनी सूरज दरेकर


>छत्रपती शिवाजी महाराज: एक परस्परसंवादी गाथा

छत्रपती शिवाजी महाराज: एक परस्परसंवादी गाथा ...