शनिवारवाडा: पुणे शहरातील ऐतिहासिक वैभव नमस्कार मित्रांनो! पुणे शहरातील एका प्रसिद्ध ऐतिहासिक ठिकाणी आपले स्वागत आहे - शनिवारवाडा . समोर दिसणारा हा भव्य पुतळा थोरले बाजीराव पेशवे यांचा आहे. त्यांचे पूर्ण नाव बाजीराव बाळाजी भट किंवा बाजीराव बल्लाळ असे आहे. विशेष म्हणजे, हा शनिवारवाडा याच बाजीराव बल्लाळ यांनी बांधला. मस्तानी दरवाजा आणि प्रवेश आत्ता आपण शनिवारवाड्याच्या उजव्या बाजूने आत प्रवेश करत आहोत. हा जो समोर दरवाजा दिसतो आहे, तो मस्तानी दरवाजा आहे. मस्तानी या वाड्यात राहत असताना तिच्यासाठी हा स्वतंत्र दरवाजा बनवला गेला होता. या दरवाजाच्या आतील बाजूला मस्तानीचा महाल होता. भारतीय पुरातत्व विभागाने लावलेल्या माहिती फलकानुसार, शनिवारवाडा आतून पाहण्यासाठी २० रुपयांचे तिकीट फक्त ऑनलाइन वेबसाइटवरूनच काढावे लागते. इथे रोख रक्कम स्वीकारली जात नाही. वाड्याच्या परिसरातील महत्त्वाची ठिकाणे वाड्याच्या समोरील पटांगणात हे बटाट्या मारुती मंदिर आहे. वाड्याच्या पटांगणातील मारुतीला सभामंडप होता. हे मंदिर लॉइड्ज पूल (हल्लीचा नवा पूल किंवा शिवाजी पूल) बांधणाऱ्या केंजळ्यांनी बांधले. मंदिरात...
नमस्कार मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनेल आहे आणि ह्या ब्लॉग मार्फत आपणास टेक्स्ट आणि विडिओ स्वरूपात माहिती देण्याचा प्रयत्न आहे