रसिक प्रेक्षकहो नमस्कार आज आम्ही तुमच्या साठी घेऊन आलो आहोत ऐतिहासिक नैसर्गिक तसेच भौगोलिक दृष्ट्या संपन्न असलेल्या भारत देशातील सर्वात लांब तसेच महत्वाच्या 10 नद्या
- मित्रांनो आपल्याला सर्वप्रथम हे सांगायचे आहे कि भारतामधून वाहणाऱ्या सर्वात लांब नद्या आपण सांगणार नाही
आपण सर्वात ज्यास्त अंतर भारतातून वाहणाऱ्या नद्यांबद्धल सांगणार आहोत हे लक्ष्यात ह्या
मात्र ही यादी आम्ही विडिओ च्या शेवटी दिली आहे त्यामुळे हा विडिओ आपण शेवट पर्यंत पाहावा म्हणजे आपणास दोन्हींमधील फरक समजेल
10 तापी नदी
- भारतातील सर्वात लांब नद्यांच्या यादीमध्ये १० व्या क्रमांकाची नदी आहे तापी नदी
- या नदीला ताप्ती असेही म्हणतात
- तापी नदीचा उगम मध्यप्रदेश राज्यात बैतुल जिल्ह्यात मुल्ताई येथे होतो
- हि नदी मध्यप्रदेश, महाराष्ट्र, गुजरात या ३ राज्यातून वाहते
- या नदीचे एक वैशिष्ट्य आहे कि भारतातील पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहणाऱ्या ३ प्रमुख नद्यांपैकी हि एक आहे
- ही नदी ७२४ किलोमीटर वाहते
- तापी नदी सुरत शहरा शेजारी गल्फ ऑफ खांबात याठिकाणी अरबी समुद्राला जाऊन मिळते
- या नदीवर प्रमुख ३ धरणे आहेत ती म्हणजे उकाई धरण, काकरापार धरण, हतनूर धरण
- तापी नदीच्या पूर्णा, गिरणा नदी, वाघूर ह्या तीन उपनद्या आहेत
09 ब्रह्मपुत्रा नदी
- भारतातील सर्वात लांब नद्यांच्या यादीमध्ये 9 व्या क्रमांकाची नदी आहे ब्रह्मपुत्रा नदी
- खरतर भारतातील हि दुसऱ्या क्रमांकाची नदी आहे पण ती भारतातून फक्त ७२५ किलोमीटर वाहते व बाकी तिबेट व बांगलादेशातून वाहते म्हणून हि भारतातून वाहणाऱ्या नद्यांच्या यादीमध्ये ९ व्य क्रमांकाची नदी आहे
- हि नदी तीन देशात मिळून एकूण २९०० किलोमीटर वाहत जाते
- ब्रह्मपुत्रा हिमालय पर्वतरांगेतील तिबेटच्या बुरांग जिल्ह्यामध्ये त्सांगपो किंवा यारलुंग झांबो ह्या नावाने उगम पावते. तेथून पूर्वेकडे वाहत येऊन ब्रह्मपुत्रा भारताच्या अरुणाचल प्रदेश राज्यामध्ये प्रवेश करते. अरुणाचल व आसाममधून नैर्ऋत्य दिशेने वाहत जाऊन ब्रह्मपुत्रा बांगलादेशामध्ये शिरते. बांगलादेशमध्ये तिला जमुना ह्या नावाने ओळखले जाते. बांगलादेशात ब्रह्मपुत्रेला प्रथम पद्मा ही गंगेपासून फुटलेली नदी व नंतर मेघना ह्या दोन प्रमुख नद्या मिळतात. गंगेच्या त्रिभुज प्रदेशामध्ये येऊन ब्रह्मपुत्रा बंगालच्या उपसागराला मिळते.
08 कावेरी नदी
भारतातील सर्वात लांब नद्यांच्या यादीमध्ये 8 व्या क्रमांकाची नदी आहे कावेरी नदी
- कावेरी नदीचा उगम तळकावेरी याठिकाणी कर्नाटक राज्यामध्ये होतो
- ही नदी 765 किलोमीटर वाहते
- हि नदी कर्नाटक, तमिळनाडू या दोन राज्यमधून वाहते
- या नदीवर प्रमुख 2 धरणे आहेत ती म्हणजे कृष्णराजसागर धरण, मेत्तूर धरण
- कावेरी नदीच्या 11 उपनद्या आहे त्या पुढीलप्रमाणे शिमशा, हेमवती, अर्कावती, होन्नुहोळे, लक्ष्मणतीर्थ, काबिनी, भवानी, नोय्याल नदी, अमरावती नदी सिरपा, लोकपावनी,सुवर्णावती
- कावेरी नदी बंगालच्या उपसागराला तामिळनाडू मध्ये मिळते तेथे भारतातील सर्वात सुपीक त्रिभुज प्रदेश निर्माण होतो
07 महानदी
भारतातील सर्वात लांब नद्यांच्या यादीमध्ये 7 व्या क्रमांकाची नदी आहे महानदी
- ही नदी 858 किलोमीटर वाहते
- महानदी छत्तीसगड आणि ओडिसा या दोन राज्यांमधून वाहते
- महानदीचा उगम सिहवा रायपुर छत्तीसगढ़ याठिकाणी होतो
- महानंद आणि नीलोटापाल हि देखील महानदीचीच नावे आहेत
- परंदी, सोंदुर, शिवनाथ, हस्देव, अर्पा, लीच, तेल इत्यादी महानदीच्या मुख्य उपनद्या आहेत.
- रुद्री, गंगरेल तथा हीराकुंड ही तीन धरने महानदीवर आहेत यमधील हीराकुड हे जगप्रसिध धरण आहे
- हीराकुड हे धरण जगातील सर्वात लांब धरण आहे
06 सिंधु नदी
भारतातील सर्वात लांब नद्यांच्या यादीमध्ये 6 व्या क्रमांकाची नदी आहे सिंधु नदी
सिंधु नदी ही तिबेट, भारत व पाकिस्तानातून वाहणारी प्रमुख नदी आहे
सिंधु नदीचा उगम मानसरोवर, तिबेट, चीन याठिकाणी होतो
- ही नदी एकूण 3180 किलोमीटर वाहते
- ही नदी भारतातून 1000 किलोमीटर वाहते
भारतातून वाहणाऱ्या नद्यांच्या यादीमध्ये खरत तर हि पहिल्या क्रमांकाची नदी पण हि भारतातून कामही आणि पाकिस्तान मधून ज्यास्त वाहते म्हणून हि नदी ६ व्या क्रमांकाची नदी आहे
यानदीला हिंदू धर्मात नगण्य साधारण महत्व आहे
हि नदी कराची पाकिस्तान येथे अरबी समुद्रास मिळते
तरबेला, गुड्डु बंधारा ही दोन धरने सिंधु नदीवर आहेत
गिलगिट, काबुल, सतलज, बियास, चिनाब, झेलम, रावी ह्या ७ नद्या सिंधू नदीच्या उपनद्या आहेत
सिंधू नदी इंडस नावाने देखील प्रसिद्ध आहे
05 नर्मदा नदी
भारतातील सर्वात लांब नद्यांच्या यादीमध्ये ५ व्य क्रमांकाची नदी आहे नर्मदा
ही नदी भारताच्या मध्य प्रदेश, महाराष्ट्र, आणि गुजरात या तीन राज्यांतून वाहते.
नर्मदा नदी हि एकूण १३१२ किलोमीटर वाहते
यामध्ये मध्य प्रदेश राज्यात १०७८ कि.मी ,महाराष्ट्र राज्यात ७२-७४ कि.मी, गुजरात १६० कि.मी वाहते
नर्मदा भारतीय उपखंडातील पाचव्या क्रमांकाची मोठी नदी असून सर्वांत मोठी पश्चिम वाहिनी नदी आहे.
नर्मदेला रेवा असेही एक नाव आहे.
नर्मदा गुजरातच्या पश्चिम समुद्र किनाऱ्यावरील भरूच शहराजवळ खंभायतच्या आखातास म्हणजेच अरबी समुद्रास मिळते.
नर्मदा नदीवर महत्वाचे ३० धरणे आहेत यामध्ये महत्वाचे म्हणजे भारतातील सर्वातमोठा जलसाठा असलेले धरण इंदिरा सागर धारण आहे तर सरदारसरोवर हे देखील महत्वाचे धारण आहे
हिंदू धर्मामध्ये नर्मदा नदीला पवित्र स्थान आहे बरेचसे भाविक नर्मदा परिक्रमा करतात
०४ यमुना नदी
भारतातील सर्वात लांब नद्यांच्या यादीमध्ये ०४ थ्या क्रमांकाची नदी आहे यमुना
ही नदी भारताच्या उत्तराखण्ड, उत्तर प्रदेश, हरियाणा राज्यांतून वाहते.
यमुना नदीचा उगम उत्तरकाशी पासून ३० किलोमीटर अंतरावर यमुनोत्री या ठिकाणी होतो
यमुना नदी १३७६ किलोमीटर वाहते
या नदी किनारी जगप्रसिद्ध ताजमहाल यमुना नदी ची शोभा वाढवतो
या नदी च्या काठावर दिल्ली,आगरा,मथुरा व इटावा ही प्रमुख शहरे आहेत.
यमुना ही नदी गंगेस प्रयागराज याठिकाणी मिळते
03 कृष्णा नदी
भारतातील सर्वात लांब नद्यांच्या यादीमध्ये ०3 ऱ्या क्रमांकाची नदी आहे कृष्णा नदी
कृष्णा नदीचा उगम सह्याद्रीमध्ये महाबळेश्वरजवळ होतो
ही नदी भारताच्या महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश राज्यांतून वाहते.
कृष्णा नदी १४०० किलोमीटर वाहते
कृष्णा नदी हॅमसालादेवी ह्याठिकाणी आंध्रप्रदेश राज्यात बंगालच्या उपसागरास मिळते
वेण्णा, कोयना, वारणा, पंचगंगा, तुंगभद्रा, घटप्रभा, भीमा इत्यादी कृष्णा नदीच्या उपनद्या आहेत
कृष्णा नदीवरील महत्वाची धरणे धोम, अल्लमट्टी, श्रीशैलम, नागर्जुनसागर हि आहेत
02 गोदावरी नदी
भारतातील सर्वात लांब नद्यांच्या यादीमध्ये ०2 ऱ्या क्रमांकाची नदी आहे गोदावरी नदी
या नदीला दक्षिण गंगा असे हि म्हटले जाते
गोदावरी नदीचा उगम त्र्यंबकेश्वर या ठिकाणी ब्राम्हगिरी पर्वत रांगेतून होतो
गोदावरी नदी 1465 किलोमीटर वाहते
इंद्रावती, मंजिरा, बिंदुसरा इत्यादी गोदावरी नदीच्या उपनद्या आहेत
गोदावरी नदीवरील महत्वाची धरणे पैठण(औरंगाबाद) गंगापूर(नाशिक), नांदूर मधमेश्वर(नाशिक), डौलेश्वरम हि आहेत
01 गंगा नदी
भारतातील सर्वात लांब नद्यांच्या यादीमध्ये १ ल्या क्रमांकाची नदी आहे गंगा नदी
भागीरथी अर्थात गंगानदीचा उगम गंगोत्री पासून १८ किलोमीटर उत्तरेस तिबेटच्या सीमेजवळील गौमुख याठिकाणी हिमालयाच्या बर्फाच्छादित भातुन होतो
गौमुख हि जागा समुद्रस पाटीपासून ४,२६७ मी (१३,९९९ फूट) उंचीवर आहे
गंगा नदीला बांग्लादेशात पद्मा या नावाने ओळखले जाते ?
उगम स्थानापासून देवप्रयाग पर्यंत गंगा नदीला भागीरथी म्हणतात
अलकनंदा आणि भागीरथी ह्या दोन नद्यांचा संगम देवप्रयाग येथे होतो
खऱ्या अर्थाने गांचेची सुरवात देवप्रयाग पासून होते
गंगानदी उत्तराखंड, उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल या भारतातील चार राज्यातुन वाहते.
गंगा नदी आग्नेय दिशेला वाहत येते व उत्तर भारतातील गंगेच्या खोऱ्यातून वाहत वाहत बांगलादेशात प्रवेश करते. पुढे ती भ्रम्हपुत्रा नदीला जाऊन मिळते तिथून पुढे मेघना नदीला जाऊन मिळते आणि नंतर ती बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते. तेथे सुंदरबन हा जगातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश निर्माण होतो. सुंदरबनात बऱ्याच दुर्मीळ वनस्पती आणि बंगाली वाघ आढळतात.
गंगा नदीच्या प्रमुख उपनद्या यमुना, घागरा, गोमती आहेत
गंगा आणि यमुना नद्यांचा प्रयागराज याठिकाणी संगम होतो
भागीरथी नदीवर छोटीमोठी मिळून एकूण १७ धरणे आहेत ह्या मध्ये भारतातील सर्वात उंच तसेच वीजनिर्मिती मध्ये एक नंबरचे तेहरी हे धरण आहे
No comments:
Post a Comment